सखाराम गंगाधर मालशे

(स.गं. मालशे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. स.गं. मालशे (जन्म : २४ सप्टेंबर १९२१; - ७ जून १९९२) हे मराठी लेखक, समीक्षक व संपादक होते.

सखाराम गंगाधर मालशे
जन्म २४ सप्टेंबर १९२१
मृत्यू ७ जून १९९२

एम.ए. झाल्यावर मालशे मराठीचे प्राध्यापक झाले. 'फादर स्टीफन्सकृत ख्रिस्त पुराण’ भाषिक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएच,डी केली. मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका आदी नियतकालिकांचे ते संपादक होते.

आपल्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीला स.गं. मालशे यांनी 'व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा ', हसा आणि लठ्ठ व्हा’ ही संपादने केली. त्यांच्या ललित लेखांचा संग्रहही ' ‘आवडनिवड’ या नावाने प्रसिद्ध झाला. 'नीरक्षीर' हा त्यांच्या नाट्यविषयक लेखांचा संग्रह. या संग्रहातून पाश्चात्त्य नाट्यकृतींसंबंधी व दिग्दर्शकांसंबंधीचे लेख आहेत. कालांतराने मालशे ऐतिहासिक दृष्टीने विचार करणारे संहिताभ्यासक, संपादक व समीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. 'केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित', 'सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता', 'लोकहितवादीकृत जातिभेद', 'दोन पुनर्विवाह प्रकरणे', स्त्री - पुरुष तुलना अशा अनेक संहितात्मक पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या.

मालशे यांनी धनंजय कीर यांच्या सहकार्याने जोतिबा फुलेकृत 'शेतकऱ्यांचा आसूड', 'महात्मा फुले समग्र वाङमय', 'झेंडूची फुले' हे सर्व ग्रंथ संपादन करून पुनःप्रकाशात आणले.

मालश्यांचे आणखी एक मोलाचे कार्य म्हणजे ऑस्टिन वाॅरेन आणी रेने' वॆलेक यांनी लिहिलेल्या 'थिअरी ऑफ लिटरेचर' या पुस्तकाचा 'साहित्य सिद्धान्त' असा अनुवाद केला. या ग्रंथातून साहित्यसमीक्षा, साहित्य संशोधन, साहित्योतिहास, साहित्यभासाच्या पद्धती यासंबंधी चर्चा केली आहे.

याशिवाय मालशे यांनी युजीन ओ'नीलच्या 'स्ट्रेंज इंटरल्यूड' या नाटकाचा अनुवाद 'सुख पाहता' असा केला. मालशे यांच्या एकूण लिखाणातून

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष इत्यादी
अध्यापक अत्रे संपादन सहलेखक : आचार्य अत्रे
आगळं वेगळं ललित
आवडनिवड ललित
ऋणानुबंधाच्या गाठी व्यक्तिचित्रे
केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित संपादित
गडकरी संपादन
चतुराईच्या गोष्टी बालसाहित्य
जादूवे स्वप्न बालसाहित्य
तारतम्य परचुरे प्रकाशन
दोन पुनर्विवाह प्रकरणे पुस्तिका
नाटकाची स्थित्यंतरे कृ.आ. गुरुजी यांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन
नीरक्षीर नाट्यविषक लेखन
प्र.के. अत्रे यांचे गडकरींविषयक लेख संपादन
भाषाविज्ञान परिचय भाषाशास्त्र पद्मगंधा प्रकाशन सहलेखक : डॉ. द.दि. पुंडे व डॉ.अंजली सोमण
भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषाशास्त्र पद्मगंधा प्रकाशन सहलेखक : डॉ. हे.वि. इनामदार व डॉ. अंजली सोमण
मराठी वाङ्‌मयाचा इतिहास दोन खंड, प्रत्येकी दोन भाग
लाडवा कादंबरी
लोकहितवादीकृत जातिभेद पुस्तिका
विधवा विवाहाची चळवळ १८००-१९०० वैचारिक सहलेखिका : नंदा आपटे
विलक्षण तंटे बालसाहित्य
व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथा संपादित
शोधनिबंधांची लेखनपद्धती माहितीपर
सयाजीराव गायकवाड चरित्र सहलेखक : व्ही.के. चावडा
सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता संपादित
साहित्य सिद्धान्त वैचारिक अनुवादित, मूळ इंग्रजी Theory of Literature
सुख पाहता नाटक अनुवादित, मूळ इंग्रजी युजीन ओ'नीलचे 'स्ट्रेंज इंटरल्यूड'
स्त्री-पुरुष तुलना समीक्षा
हंसा आणि लठ्ठ व्हा संपादित, मूळ लेखक - हरिश्चंद्र लचके