डॉ. दत्तात्रेय दि. पुंडे (जन्म : २६ डिसेंबर १९३४) हे मराठी भाषाविषयक पुस्तके लिहिणारे एक लेखक आहेत. ते पुण्याच्या मॉडर्न कॉलेजात मराठीचे प्राध्यापक होते.

पुंडेंची पुस्तके संपादन

द.दि. पुंडे यांची पुस्तके पुस्तक पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:

  • कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास
  • गंमत शब्दांची (मुलांसाठी)
  • गांवगाडा (नवीन आवृत्तीचे संपादन; पुस्तकाचे मूळ लेखक - त्रिंबक नारायण आत्रे)
  • ग्रंथदर्शन
  • भयंकर सुंदर मराठी भाषा
  • भारतीय साहित्याची संकल्पना (डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर गौरवग्रंथ, सहसंपादिका - पद्मजा घोरपडे)
  • भाषाविज्ञान परिचय (सहलेखक - डॉ. अंजली सरदेसाई, डॉ. स.गं. मालशे
  • मराठी वाङ्मयाची सद्यस्थिती (सहलेखिका - डॉ. विद्यागौरी टिळक)
  • महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार (संपादित, सहसंपादक - यशवंत सुमंत)
  • वाङ्मयेतिहास : एक मुक्त संवाद (सहलेखक - प्रा. गो.म. कुलकर्णी)
  • वाड्मयेतिहासाची संकल्पना (संपादित)
  • व्यावहारिक मराठी (अभ्यासक्रमातील पुस्तक, सहलेखक - डॉ. कल्याण काळे)

पुरस्कार संपादन

मराठी अभ्यास परिषदेचा प्रा. ना.गो. कालेलकर पुरस्कार