आनंद विनायक जातेगावकर

आनंद विनायक जातेगावकर (६ जून, इ.स. १९४५ - २४ जानेवारी, इ.स. २०१६:ठाणे) हे एक मराठी कथालेखक व कादंबरीकार होते.

जातेगावकर यांच्या कथा सत्यकथा मासिकात प्रसिद्ध होत असत. सत्यकथा व मौज दिवाळी अंकांतून ७० ते ८० च्या दशकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या कथांचा मुखवटे हा पहिला संग्रह प्रसिद्ध झाला.

पंजाबराव कृषी विद्यापीठात अ‍ॅग्रिकल्चरल मॅथेमॅटिक्स हा विषयाचे त्यांनी अध्यापन केले असून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे.

पुस्तके

संपादन
  • अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ (सहलेखक सदाशिव अमरापूरकर)
  • अस्वस्थ वर्तमान (कादंबरी)
  • कैफियत (कादंबरी) : फ्रांज काफ्का’ यांच्या ‘ट्रायल’ या कादंबरीवर आधारित
  • ज्याचा त्याचा विठोबा
  • डॉ. मयंक अर्णव (कादंबरीे)
  • दोन जुने अभिजात अर्थशास्त्रीय निबंध (अर्थशास्त्रविषयक)
  • बाहू उभारून दोन (नाटक)
  • मी मी ऊर्फ सेल्फी (कादंबरी)
  • मुखवटे (कथासंग्रह)
  • व्यासांचा वारसा (ललित)
  • श्रीमंत गोपिकाबाईंची बखर (कादंबरी)

पुरस्कार

संपादन
  • ‘मुखवटे’ला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार (१९७५)
  • आदर्श प्राध्यापक पुरस्कार
  • ‘अस्वस्थ वर्तमान’ला मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार
  • ‘कैफियत’ला महाराष्ट्र सरकारचा २०११-१२ सालचा राम गणेश गडकरी पुरस्कार (एक लाख रुपये)