जेनोवा
(जेनोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
जेनोवा (इटालियन: Genova) ही इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशाची राजधानी व देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लिगुरियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले व सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले गेनोवा हे इटलीमधील सर्वात मोठे बंदर व युरोपातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या शहरांपैकी एक आहे.
जेनोवा Genova |
|||
इटलीमधील शहर | |||
| |||
देश | इटली | ||
प्रदेश | लिगुरिया | ||
क्षेत्रफळ | २४३.६० चौ. किमी (९४.०५ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ६६ फूट (२० मी) | ||
लोकसंख्या (डिसेंबर २०१२) | |||
- शहर | ६,०६,६५३ | ||
- घनता | २,४९०.७७ /चौ. किमी (६,४५१.१ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.comune.genova.it |
क्रिस्तोफर कोलंबसचे जन्मस्थान असलेल्या जेनोवामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तू आहेत ज्यांसाठी त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत २००६ साली स्थान मिळाले. जेनोवाच्या कला व संस्कृतीला मान देण्यासाठी २००४ साली हे शहर युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवडले गेले.
खेळ
संपादनफुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारे जेनोवा सी.एफ.सी. व यू.सी. संपदोरिया हे दोन क्लब येथेच स्थित आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
संपादनजुळी शहरे
संपादनखालील शहरे जेनोवाची जुळी आहेत:[१]
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2012-12-30 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |