ख्रिस्तोफर कोलंबस
अमेरिका खंड शोधणारा [१]ख्रिस्तोफर कोलंबस (जन्म : ३१ ऑक्टोबर १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान. - २० मे १५०६) हा इटली देशाचा नागरिक असून, प्रदेशशोधक, दर्यावर्दी व वसाहतकार होता. त्याचा जन्म जेनोआ ह्या गणराज्यात (आजकालच्या इटलीचा वायव्य भाग) झाला.[२] स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली तो चारदा अटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे युरोपला अमेरिकी खंडांची ओळख होऊ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्न ह्यांनी स्पेनच्या नव्या जगाच्या आगामी वसाहत मोहिमांचा पाया घातला गेला.
ख्रिस्तोफर कोलंबस | |
---|---|
जन्म |
३१ ऑक्टोबर १४५१ च्या आधी जेनोआ, इटली |
मृत्यू |
२० मे १५०६, वय ५४ वर्षे |
पेशा | दर्यावर्दी, शोधक, वसाहतकार |
स्वाक्षरी |
युरोपीय साम्राज्यवाद व आर्थिक प्रतिस्पर्धा वाढत होत्या व युरोपीय राज्ये संपत्तीच्या शोधात नवनवीन व्यापारी मार्ग स्थापन करत होते. ह्या पार्श्वभूमीवर पूर्व दिशेला असलेला हिंदुस्थान देश हा पश्चिमी सागरमार्गाने गाठता येईल ह्या तर्कावर आधारलेल्या कोलंबसच्या मोहिमेला शेवटी स्पेनचा शाही पाठिंबा मिळाला. स्पेनच्या राजेशाहीला त्या मोहिमेत आशिया खंडातल्या अतिफायदेशीर मसाल्याच्या व्यापाराद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी दिसली. आपल्या १४९२ च्या पहिल्या सफरीत त्याच्या अंदाजाने कोलंबस जपानला पोचणार होता त्याऐवजी बहामा द्वीपसमूहावर पोहोचला. ज्या ठिकाणी त्यांचे जहाज लागले त्या जागेला कोलंबसने सॅल्व्हॅडोर हे नाव दिले. पुढच्या तीन मोहिमांत कोलंबस वेस्ट इंडीज ,व्हेनेझुएलाचा कॅरिबियन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहीर केले.
तुर्कानी काॅन्स्टॅन्टिनोपल जिंकल्याने युरोपीयांचे आशिया खंडाशी व्यापार करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी अमेरिगो व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे, कारण भारतातील लोक शेती करतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला अमेरिका असे नाव दिले गेले.
कोलंबस हा अमेरिकेला पोहोचणारा पहिला युरोपीय शोधक नव्हता. लिफ एरिकसनने ११व्या शतकात नोर्स मोहिमेखाली अमेरिका गाठली होती.[३] पण त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि त्यामुळे त्यातून टिकाऊ असा युरोप व अमेरिका संबंध अस्तित्वात आला नाही, तो कोलंबसच्या सफरींमुळे होण्यास सुरुवात झाली. पुढची काही शतके युरोपचा हा अमेरिका-शोध ताबा व वसाहतीकरण चालूच राहिले. त्याचा आधुनिक जगाच्या घडणीवरही बराच प्रभाव पडला. कोलंबसने ख्रिस्ती धर्माचा प्रसार ही स्वतःची मोठी कर्तबगारी मानली.[१]
आपण पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानात न पोचता युरोपीयांना अपरिचित असलेल्या खंडात पोचलो हे कोलंबसने कधी कबूल केले नाही. उलट जिथे तो पोचला त्या रहिवाशांना त्याने इंडियोस (स्पॅनिश भाषेत हिंदुस्थानी) असे संबोधले. [४] पुढे कोलंबसचे स्पेनचा राजा व त्याने नेमलेला अमेरिकी वसाहतीवरचा प्रशसक यांच्याशी संबंध बिघडले व त्याची परिणती इ.स. १५०० मध्ये कोलंबसच्या अटकेत व हिस्पनोलिआ बेटाच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होण्यात झाली. त्यावर कोलंबस व त्याचे वारसदार ह्यांनी आपल्याला राज्याकडून अपेक्षित हक्काचा लाभ मिळावा ह्यासाठी बरीच वर्षे कायदेशीर लढाई दिली.
पुतळे
संपादनअमेरिकत कोलंबसाचे अनेक पुतळे आहेत; त्यांपैकी बोस्टनमधल्या नॉर्थ एन्ड पार्कमधील कोलंबसच्या पुतळ्याचा शिरच्छेद केला गेला. रिचमंड (व्हर्जिनिया) येथे एका बागेतील कोलंबसच्या पुतळ्याला आंदोलकांनी जलसमाधी दिली. मिनेसोटात कोलंबसाचा पुतळा खेचून खाली पाडण्यात आला.
जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकाची अमेरिकी पोलिसांकडून विनाकारण हत्या होत असतानाचे चलचित्रमुद्रण पाहून संतापाची लाट उसळली. गावांत रस्त्यावर येऊन आंदोलन करत होते. या आंदोलनाला ‘दमनकारी इतिहासाच्या खुणा’ हटवण्यासाठी पुतळा-विरोधी वळण लागले, त्यांत या पुतळ्यांचा विनाश ओढवला.
कुसुमाग्रज
संपादन'कोलंबसाचे गर्वगीत' ही मराठी कवी कुसुमाग्रज यांची कोलंबसासंबंधीची कविता आहे. तिच्यातील पहिल्या काही ओळी : -
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या,
समुद्रा,डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे.
आणि शेवटच्या दोन प्रसिद्ध ओळी :
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला.
बालपण व तारुण्य
संपादनआशियाचा ध्यास
संपादनपूर्वपीठिका
संपादनभौगोलिक विचार
संपादनदर्यावर्दी विचार
संपादनमदतीचा शोध
संपादनस्पेनच्या राजाशी तह
संपादनसमुद्रवाऱ्या
संपादनपहिली समुद्रवारी
संपादनदुसरी समुद्रवारी
संपादनतिसरी समुद्रवारी
संपादनचौथी समुद्रवारी
संपादनराज्यपालपदाच्या काळात अत्याचार व संहार हे आरोप
संपादननंतरचे आयुष्य
संपादनआजार व मृत्यू
संपादनस्मारक
संपादनवारसा
संपादनशारीरिक ओळख
संपादनलोकप्रिय ओळख
संपादनसंदर्भ
संपादनटीपा
संपादनसंदर्भयादी
संपादन- ^ a b इंग्रजी विकिपीडियातल्या Chirstopher Columbus ह्या लेखावरून
- ^ ब्रिटानिका ज्ञानकोशातला कोलंबसवरचा लेख
- ^ "संग्रहित प्रत". 2008-12-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-05 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ http://books.google.co.uk/books?id=o-BNU7QuJkYC&pg=PA568&dq=columbus+indios+indians+India&hl=en&ei=i0zLS4mwFNijOJrTkaIG&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CD8Q6AEwAQ#v=onepage&q=columbus%20indios%20indians%20India&f=false [मृत दुवा]