चर्चा:महाराष्ट्रातील देवता

या लेखाचे नाव महाराष्ट्रात पूजली जाणारी हिंदू दैवते असे करावे.

मराठी हा शब्द अधिक व्यापक असून त्यात मराठीला मातृभाषा समजणारे मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन, जैन, इ. अनेक धर्मीयांचा समावेश होतो. त्यायोगे मराठी देव, देवी आणि देवता यांत हिंदवेतर धर्मीयांच्या दैवतांचाही समावेश होतो. प्रस्तुत लेखात हे अभिप्रेत नाही.

अभय नातू (चर्चा) ०४:५३, २५ जून २०१३ (IST)Reply


नुसते ’महाराष्ट्रात पूजिले जाणारी दैवते’ असे चालणार नाही. असे केले तर राम, विष्णू, लक्ष्मी, अल्ला, येशू, मेरी ही सगळीच अखिल भारतीय/जागतिक मंडळींची नावे यादीत घालावी लागतील. मराठी देव म्हणजे ज्यांच्याबद्दलच्या कहाण्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत, ज्यांतील स्थळे मराठी लोकांच्या परिचयाची आहेत, ज्यांच्या आरत्या बहुधा फक्त मराठीत आहेत, आणि जे देव अमराठी माणसाला अपवादानेच माहीत आहेत, असे देव.

पुन्हा, दैवत/देवता आणि देव-देवी यांच्या अर्थच्छटांत फरक आहे. दैवत म्हणजे विशिष्ट समूहाने किंवा व्यक्तीने पूज्य मानलेली विभूती. उदा० आंबेडकर हे दलितांचे दैवत आहे. कोष्टी समाजाची अमुक एक देवी आहे. आमच्या कुटुंबाचे ते कुलदैवत आहे, वगैरे. जो देव असतो, तो देवी नसतो, जे कुलदैवत असते तो कुलदेव नसतो. शारदा विद्येची देवता आहे, देव किंवा दैवत नाही. हे शब्द वापरताना एकाऐवजी दुसरा शब्द चालत नाही. देवतेचे काम मर्यादित असते, संपत्तीची देवता, बुद्धीची देवता, शक्तीची देवता, रंगभूमीची देवता वगैरे. येथे दुसरा शब्द चालत नाही.

मराठी देवांमध्ये ठिकठिकाणचे पीर येणारच आहेत.ज्यू, ख्रिश्चन आणि जैनादिकांचे काही खास महाराष्ट्रीय देव असतील तर त्यांनाही यादीत आणावे लागेल. कुणाला असे देव माहीत असतील तर त्यांनी यादीत तशी भर टाकावी....J (चर्चा) १४:१७, २५ जून २०१३ (IST)Reply

हिंदू देवता

संपादन

नुसते ’महाराष्ट्रात पूजिले जाणारी दैवते’ असे चालणार नाही.

J,
तुम्ही माझे लिखाण वाचले असता दिसेल की मी लेखाचे शीर्षक महाराष्ट्रात पूजली जाणारी हिंदू दैवते असे करण्यास सुचवले आहे. तरी तुम्ही लिहीलेली पहिली दोन वाक्ये व्यर्थ आहेत.
मराठी देव याची व्याख्या तुम्ही येथे केलीत, पण ही का ग्राह्य धरावी? आणि तशी केली असता, येशू, मोतमेरी पासून शहाशरीफ आणि तीर्थंकरांपर्यंतच्या सगळ्यांच्याच कहाण्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत, त्यांची स्थळे मराठी लोकांच्या परिचयाची आहेतच की?
आता आरत्या बहुधा फक्त मराठीत नाहीत म्हणून तुम्ही या देवांना हद्दपार करणार असाल तर मग तुमच्या व्याख्येचा संकुचितपणा अधिकच तीव्र होतो.

आणि जे देव अमराठी माणसाला अपवादानेच माहीत आहेत

मग विठ्ठलरावांना यात स्थान नाहीच!
आणि महाराष्ट्र म्हणजे काय? १ मे, १९६० रोजी घडलेला तो? की मुंबई, बेळगांव चांदा, बांदा, यांसह असलेला तो? की अटकेपार एकदा झेंडा लागल्यामुळे याची सीमा तेथपर्यंत वाढवावी?
दैवत/देवता यांतील अर्थच्छटांबद्दल तुम्ही म्हणलात ते योग्य आहे. माझा उद्देश शीर्षकाची लांबी कमी करण्याचा होता. देव, देवी, देवता यांसाठी एक शब्द असल्यास तो वापरावा.
लेखातील मूळ नोंद होती पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती जून २० रोजीचे हे टिपण आहे. आता तुम्ही ती बदलून असे कित्येक हिंदू आणि अन्यधर्मी देव, देवी आणि देवता अशी केलीत. म्हणजे माझे म्हणणे तुम्हांस काही अंशी पटले, मग वाद कशाला?!

कुणाला असे देव माहीत असतील तर त्यांनी यादीत तशी भर टाकावी

यायोगे आता प्रत्येक गल्लीबोळातील म्हसोबा, मारुती आणि गणपती यांना येथे आणावे लागेल. प्रत्येक ब्रह्मस्वरूप, जगद्गुरू, परमपूज्य आणि श्री श्री श्री यांनाही त्यांचे अनुयायी देवच मानतात ना? आता याला धरबंध कोणी व कोठे घालावा? मूळ यादीत घालण्यासाठीचा लावलेला निकष स्पष्ट नसल्यामुळे कोणत्या देवांना बाहेर ठेवावे कोणास आत येऊ द्यावे हे समजणे अगदी कठीण.
अभय नातू (चर्चा) १८:०१, २५ जून २०१३ (IST)Reply

हि दैवते लेखाच्या परीघात बसतात किंवा कसे ?

संपादन

लेखाचा उद्देश आवाका/परीघ पुरेसा स्पष्ट नाही.म्हणजे केवळ महाराष्ट्रालाच परीचित किंवा ओरीजीन महाराष्ट्रात असलेली दैवते.का महाराष्ट्रात पुजली जाणारी सर्व दैवते.जर उद्देश केवळ महाराष्ट्रालाच परीचित किंवा ओरीजीन महाराष्ट्रात असलेली दैवते असेल तर

  • काळभैरव (कालभैरव)
  • झुलेलाल
  • महालक्ष्मी
  • दत्त
  • मारुती
  • आणि शंकराची गणपतीची विवीध नावांनी मंदीरे असली तरी हि दैवते महाराष्ट्रा बाहेर सुद्धा पुजली जातातच.

सदस्य 'जें'च्या विवीध यादी लेखातील मजकुराच्या उल्लेखनीयता,आवाका आणि परिघांच्या बद्दल उपस्थित होणाऱ्या शंकांचे कारण पुरेशा परिच्छेद लेखनाच्या अभावी यादी लेखनाची सुरवात होते आहे असे तर नाही ना अशी शंका वाटते.

वर अभय नातूंनी मांडलेले काही मुद्दे लक्षात घ्यावे असे वाटते. जे जे इश्वर निर्मीत ते ते महान या उदार अंत:करणाने न्याय केल्यास अस्तीत्वातील आणि होऊन गेलेला प्रत्येक सजीव/निर्जीव महान आहे आणि होता. पण ज्ञानकोशीय दखल पात्रतेचा परीघ एवढा मोठा करण्या विकिपीडिया एवढा महान आहे का ? मला वाटते नाही , विकिपीडियाच्या परीघाला ज्ञानकोशीय दखलपात्रतेच्या मर्यादाही आहेत आणि विशेषणांचे स्वागत खुल्या दिलाने करणे ज्ञानकोशांना नेहमीच जरा जड जाते, हे येथे लक्षात घेतले जावे असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:४०, २५ जून २०१३ (IST)Reply


महाराष्ट्राबाहेर मारुतीला हनुमान म्हणतात. आठवड्यातला मंगळवार हा दिवस त्याचा समजला जातो. महाराष्ट्रातल्या मारुतीचे दर्शन दर शनिवारी घ्यावे असा रिवाज आहे. त्यामुळे हनुमान आणि मारुती दिसायला सारखे असले तरी तरी त्यांतला एक अस्सल मराठी आहे.

दत्ताची बहुतेक क्षेत्रे महाराष्ट्रात आहेत. दत्त या देवतेविषयीचे ग्रंथ महाराष्ट्रात आणि मराठीत लिहिले गेले. दत्तसंप्रदाय प्रामुख्याने महाराष्ट्रात आहे, अशी माझी माहिती आहे. चुकीची असल्यास या यादीतून दत्ताला काढून टाकावे.

गणपतीला महाराष्ट्राबाहेर गणेश म्हणतात. गणपती नामक ’देवा’ने शेतकऱ्यांचे गण(Communes) पाडून त्यांचे अधिपत्य स्वीकारले, ते महाराष्ट्रात, असे मानले जाते. त्यामुळे गणपती हा महाराष्ट्राचाच देव आहे. तेच शंकराच्या बाबतीत. अ-मराठी लोकांचे शिव, महादेव, भोलानाथ, शिवशंकर, शंकरभोलेनाथ आणि मराठी लोकांचा शंकर हे एक नसावेत. कनकेश्वर, कुणकेश्वर ही शंकराची रूपे असली तरी, त्या त्या देवळातल्या देवाला शंकर म्हणत नाहीत, कनकेश्वर किंवा कुणकेश्वरच म्हणतात. त्याअर्थी ते स्वतंत्र देव आहेत. या विश्वात (असलाच तर) एकच देव आहे आणि त्याचीच सर्व नावे आहेत असे मानले तर, हिंदू धर्माचा पायाच नष्ट होईल. ज्याअर्थी ३३ कोटी देव आहेत असे मानणारा हा धर्म आहे, त्याअर्थी त्या देवांचे नाव, रूप आणि स्वभाव वेगळे असायला नकोत?

झुलेलाल मूळ मुंबई इलाख्यातल्या सिंध प्रांतातला असेल पण सध्या त्याची देवळे भारतात फक्त उल्हासनगर आणि पिंपरीत आहेत, अशी माहिती आहे.

’ळ’मराठीत आहे, त्याअथी काळभैरव मराठीच. बाळ ठाकरे हे मराठी होते हे सांगायला ’ळ’ पुरेसा असतो. महालक्ष्मीसुद्धा मराठीच. मुंबई आणि कोल्हापुरात अशी दोनच मुख्य देवळे. महाराष्ट्रात इतरत्र ती महाकाली आणि महासरस्वतींबरोबर असते. उत्तरी भारतात तर लक्ष्मी ही विष्णूबरोबरच असते. (अपवाद असतील!) महाराष्ट्रातील रखुमाईचे देऊळ अनेकदा स्वतंत्र असते, पंढरपुरातही तसेच आहे. द्वारकेत श्रीकृष्णाच्या देवळात रुक्मिणी नाही, तिचे देऊळ त्याच गावात पण बऱ्याच अंतरावर आहे.

विठ्ठलाची महाराष्ट्रात दोनच मुख्य देवळे, एक पंढरपूरचे आणि दुसरे मुंबईतल्या शिवडीचे. तसे पुण्यात रविवारातला पासोड्या विठोबा, नाना पेठेतला निवडुंग्या विठोबा, आकुर्डीतले विठ्ठल मंदिर, निगडीतले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर वगैरे आहेत, पण तेथे भक्तांचा वर्षभर राबता नाही. विठ्ठल कर्नाटकातून आला असे मानले जाते. पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती परकीय आक्रमणाच्या वेळी अनेकदा कर्नाटकात हलवली आणि परत आणली असा इतिहास आहे. पण विठ्ठल जसे अख्ख्या महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत आहे, तसे ते कर्नाटक राज्याचे नाही.

या लेखात दिलेल्या यादीतल्या प्रत्येक देवावर किमान एक लेख नक्की लिहिता येईल.त्या दृष्टीने हा लेख म्हणजे अनुक्रमणिका समजावी.

>>पुरेशा परिच्छेद लेखनाच्या अभावी यादी लेखनाची सुरवात होते आहे असे तर नाही ना<<. शक्य आहे. सुरुवातीचा परिच्छेद नंतरही लिहिता येतो. आधी पुस्तकातला पूर्ण मजकूर लिहावा आणि मग त्या पुस्तकाला प्रस्तावना जोडावी असा प्रघात आहे.

’मराठी देव’ म्हणजे ’१ मे १९६०साली जन्मलेल्या महाराष्ट्रातील देव’ नाहीत. मराठी देव म्हणजे बृहन्महाराष्ट्रातील देव. जिथे जिथे मराठी भाषक गेले आणि त्यांनी तिथे तिथे ज्या देवांची स्थापना केली ते देव....J (चर्चा) २३:१५, २५ जून २०१३ (IST)Reply

  • दत्त संप्रदाय महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांतून आणि मुख्यत्वे दक्षीणेतून वाढला असावा असा माझा कयास आहे. आपण म्हणता त्या प्रमाणे गुरुचरित्र ग्रंथ लेखन झाल्या पासून आणि गुरू परंपरेने तो महाराष्ट्रात प्रभाव टिकवून राखू शकला असावा.अर्थात दत्त संप्रदायाचे अभ्यासक यावर अधीक प्रकाश टाकू शकतील.
बाय द वे थोड असंबधीत विषयांतर अत्रीपूत्र दत्त आणि दाशरथी राम समकालीन असावयास नकोत का ? आणि असतील तर एकमेकांचा संबंध आल्याचे उल्लेख मात्र आढळत नाहीत असे का असावे ?
  • 'मराठी देव म्हणजे बृहन्महाराष्ट्रातील देव. जिथे जिथे मराठी भाषक गेले आणि त्यांनी तिथे तिथे ज्या देवांची स्थापना ' या वाक्यात थोडासा बदल केला 'सिंधीदेव म्हणजे बृहत्‌ सिंधातील देव. जिथे जिथे सिंधी भाषक गेले आणि त्यांनी तिथे तिथे ज्या देवांची स्थापना ' या न्यायाने झुलेलालांची मंदीरे महाराष्ट्रात असली तरी आपल्याच व्याख्येने ते दैवत पुरेसे मराठी ठरत नाही.
सिंध प्रांत ब्रिटीशांच्या मर्जी खातर मुंबई इलाख्याला जोडलेला होता किंवा सिंध मध्ये गेलेले मराठी लोकही झुलेलालना पुजत होते किंवा फाळणी उत्तर काळात सिंधी लोक महाराष्ट्रात आले ही कारणे आपल्या लेख परीघाच्या संदर्भाने पुरेशी राहतात किंवा कसे
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०६:४०, २६ जून २०१३ (IST)Reply

लेखातील हे वाक्य पुन्हा अभ्यासावे

संपादन

लेखातील सध्याचे खालील वाक्य संदर्भाची मागणीही करते आणि नवे तार्कीक प्रश्न उपस्थीत करते .

  • चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)

१) संदर्भ हवा

२) दगडाला शेंदूर फासून इतर देव कुणीही बनवू शकत नाही असे काही आहे काय ? तसे नसेल तर असा विशिष्ट वेगळा उल्लेख या विशिष्ट देवते बद्दल असण्या मागच्या भूमीकेचे स्वरूप स्पष्ट झाल्यास बरे वाटेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०६, २५ जून २०१३ (IST)Reply


>>..दगडाला शेंदूर फासून इतर देव कुणीही बनवू शकत नाही असे काही आहे काय ?<< बनवू शकतो. आणि त्याचे देऊळही बांधतो. पण अशा शेंदूर फासून बनविलेल्या देवांपैकी मारुतीचे, गणपतीचे, म्हसोबाचे, खैसोबाचे देऊळ असते, चेतोबाचे देऊळ असल्याचे ज्ञात नाही, म्हणून वेगळा उल्लेख केला..J (चर्चा) २२:०२, २५ जून २०१३ (IST).

:) मान्य चेतोबाच अस सामान्य रहाण त्याच असामान्यत्व दाखवत, मग नक्कीच उल्लेखनीय ठरत ! प्रतिसादा करता धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१९, २५ जून २०१३ (IST)Reply

अभय नातूंचे काही मुद्दे पटले. लेखाचे नाव फार मोठे आहे, ते बदलून ’मराठी लोकांचे देव’ असे केले तर? म्हणजे महाराष्ट्राची व्याख्या करायला नको, आणि यादीत अहिंदू देव आणायला मोकळीक मिळेल. देवाची व्याख्या करताना

  • त्याचे देऊळ (किंवा दर्गा-चर्च) असावे (म्हणजे सत्यसाईबाबा नाही!), देऊळ नसल्यास तो देव निदान शेंदूर लावलेला दगड असावा, आणि त्याचे उपासक असावेत.
  • त्याच्या नावाची जत्रा-यात्रा-उरूस असावा आणि
  • तो जिवंत माणूस, म्हणजे बुवा, स्वामी, ’श्री श्री श्री’, ’१०८ श्री’ नसावा. जर देवत्वाला पावले असतील तर गजाननमहाराज, आणि अनेक पीर यांचा अपवाद करावा. त्यामुळे ख्रिस्ती धर्मातील ’सेन्टां’चा यादीत समावेश करण्याचा विचारही करता येईल.

साईबाबांची देवळे असंख्य आहेत, आणि ते अखिल भारतीय भाषकांचे देव आहेत म्हणून वर्ज्य. गजानननहाराज यांची शेगाव व्यतिरिक्त फार तर आणखी दोन-चार गावांत देवळे असतील (निगडीत एक देऊळ असल्याचे वाचले आहे.), त्यामुळे ते चालतील. ते अखिल भारतीय झाले तर कटाप करावेत.

लेखाचे नाव काय ठेवावे यावर चर्चा जरूर व्हावी....J (चर्चा) १७:३४, २६ जून २०१३ (IST)Reply

  • ओके, आपणास अभिप्रेत संकल्पनेचा बोध होत आहे असे वाटते.मराठी संस्कृतीतल ओरीजीन किंवा मराठी संस्कृतीने आपल्याशा करून वेगळ मराठीपण जपलेल्या देव, देवी आणि देवता आणि पुजनीयता संकल्पना. आपली संकल्पना काहीशी (बृहन महाराष्ट्रीय) मराठी संस्कृतीशी सुद्धा निगडीत असावी असे वाटते.चपखल नावा करता चर्चा करण्यास हरकत नाही.नाव बदलण्याची खूपही घाई करावी असे मला वाटत नाही कारण लेख शीर्षक आणि मजकुर दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून जातात. लेख कसा विकसीत होतो ते ही कालौघात पाहूनही नंतरही नाव बदलता येईल.
  • आपण मांडलेल्या मुद्यांच्या संदर्भाने, इतर अजून एकदोन मुद्दांकडे लक्ष वेधावेसे वाटते.
  • काही संप्रदायात मुर्ती पुजे पेक्षा 'पादुका' पुजनास अधीक महत्व आहे.
  • काही अस्सल मराठी पुजनीयतांचे उत्सव घरा पर्यंत अथवा समुदायांपर्यंत मर्यादीत असतात त्यांचा या परिघात समावेश अभिप्रेत आहे किंवा कसे.
  • मराठी पुजनीयतांचे>>अखिल भारतीयकरण झाले तर कटाप<<एवजी त्या संदर्भाने वेगळा लेख बनवता आला तर पहावे असे वाटते.
प्रतिसादा करता धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२२, २६ जून २०१३ (IST)Reply

सिंध प्रात

संपादन

..सिंध प्रांत ब्रिटिशांच्या मर्जी खातर मुंबई इलाख्याला जोडलेला होता किंवा सिंध मध्ये गेलेले मराठी लोकही झुलेलालना पुजत होते किंवा फाळणी उत्तर काळात सिंधी लोक महाराष्ट्रात आले.... << तसे नसावे. ब्रिटिश इंडियात तीनच इलाखे होते, बॉम्बे, मॅड्रास आणि बेंगॉल. बाकी प्रदेशात संस्थानिकांची राज्ये होती. ती फार नंतरच्या काळात ब्रिटिश साम्राज्यात आली. त्यामुळे सिंध हा मुळातच मुंबई इलाख्यात होता, तो कृत्रिम रीतीने जोडला गेला नव्हता.

कराची आणि सिंध-हैदराबाद येथे मराठी संस्कृती होती (पहा सिंधी भाषा), आणि तिथले मराठी लोक झुलेलालला कदाचित मानीतही असावेत, नक्की माहीत नाही. तरीही सिंधी माणसे निर्वासित बनून महाराष्ट्रात आल्यावर ’मराठी’च झाली, त्यामुळे त्यांचे देव ते मराठी देव....J (चर्चा) १७:३४, २६ जून २०१३ (IST)Reply

:) ठिक, एका चांगल्या भूमीकेचे स्वागत आहे.फाळणी उत्तर काळात सिंधी लोकांनी तिथल्या तिथल्या प्रांताची देशाची ओळख स्विकारण्याच प्रमाण बरच आहे.झुलेलाल त्या अर्थाने महाराष्ट्रात न रहाता पश्चिम भारतात गुजरात आणि राजस्थानातही आणि परदेशातही पुजले जातात,पण आपण म्हणता तसे कदाचीत मंदीरे केवळ महाराष्ट्रातच आहेत हा मुद्दा गृहीत धरण्यास हरकत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२५, २६ जून २०१३ (IST)Reply

साचा

संपादन

@:

महाराष्ट्रातील गुढी इत्यादी लोकपरंपरा अभ्यासत मी महाराष्ट्राच्या लोक परंपरेतील देवतांपर्यंत पोहोचलो असे दिसते. महाराष्ट्रातील बोलीभाषा, लोकपरंपरा, लोकगीते इत्यादी बद्दल साचे बनवून झाले आहेत. महाराष्ट्राच्या लोक परंपरेतील देवतांचा उल्लेख -जसे मेसाई, मसोबा, राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मायराणी इत्यादी- सध्याच्या साचा:हिंदू देवता आणि साहित्य साचातच जोडणे बरे कि स्वतंत्र साचा करुन त्यात उल्लेख असणे अधिक बरे

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१०, २४ मार्च २०१७ (IST)Reply


मेसाई वगैरे

संपादन

मेसाई, मसोबा, राजराजेश्वरी (उत्तराखंड?), राजरा (?), मेसाई, मायराणी या नावांचे देव आहेत हे मला आधी माहीत नव्हते; संत काव्यांत आलेल्या मेसाई आणि मायराणी यांच्या नावांमुळे ते खरोखरच असल्याची खातरजमा करून घेतली.

मेसाई ही कदाचित म्हाळसाई असावी, किंवा मरीआई. मसोबा हा तिचा नवरा? 'म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा' या मराठीतल्या सुपरिचित म्हणीनुसार म्हसोबाचे लग्न झालेले नाही, तो मेसाईचा नवरा कसा असेल?

या देवांविषयी मिसळपाव'वर झालेली चर्चा येथे आहे. .... (चर्चा) २२:२४, २५ मार्च २०१७ (IST)Reply

उच्चार साधर्म्यामुळे इतर (तेलगु विकिपीडियनला) तसे वाटले असावे; म्हणीच्या संदर्भासाठी आभार-आता सुयोग्य दुरुस्ती केली आहे. बाकी मिसळपाव वरील चर्चा दिडएक वर्षापुर्वॉ मीच चालू केली होती. मैसम्मा नावाने नवसाला पावणारी लोकदेवता म्हणून तेलंगाणात अजूनही बऱ्यापैकी महत्व टिकवून आहे, महाराष्ट्रात प्रबोधनापुर्वी या देवतेचे बरेच प्रस्थ असावे. या देवतेचा गावात ओटा असे, (ओटा असलेल्या इतरही देवता महाराष्ट्रात होत्या‌) वारकरी संतांची नवसार्थ-बळी प्रथे विरोधी प्रबोधन चळवळ, आधुनीक वैद्यकीय उपचारांमुळे मृत्यूची भिती वाटणाऱ्या देवतांचे महत्व कमी होणे तसेच, फालोवर असलेल्या संप्रदायींची धर्मांतरे, आणि मुर्ती स्वरुपात पुरेशी मंदिरे नसणे यामुळे मेसाई देवी पाहता पाहता सामाजिक बऱ्यापैकी विस्मरणात गेली असावी. एनी वे महाराष्ट्रात एके काळी बऱ्यापैकी प्रस्थ असावे तेव्हा ज्ञानकोशीय दखल घेणे सयूक्तीक ठरते. उर्वरीत लोकदैवतां विषयी लेख लिहावयाचे आहेत म्हणून
महाराष्ट्राच्या लोक परंपरेतील देवतांचा उल्लेख -जसे मसोबा, राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मायराणी इत्यादी- सध्याच्या साचा:हिंदू देवता आणि साहित्य साचातच जोडणे बरे कि स्वतंत्र साचा करुन त्यात उल्लेख असणे अधिक बरे ? या बद्दल आपले मत हवे आहे,
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:०३, २६ मार्च २०१७ (IST)Reply
मेसाई आणि तेलंगाणातील मैसम्मा एक असण्याची शक्यता खूप अधिक असावी. पण ही स्वतंत्र देवता होती म्हाळसाईशी संबंध नसावा नाहीतर विस्मरणातही गेली नसती आणि संतटिकाही एवढी वाट्यास आली नसती. मरीआई तामीळनाडूपर्यंत सापडते, मेसाई आणि मरीआईचे उल्लेख ऐतिहासिक दस्तएवजात उपलब्ध व्हावयास हवेत मेसाई आणि मरीआई या देवता एक असण्याची अल्पशक्यता वाटलीतरी ऐतिहासिक दस्तएवज संदर्भ मिळत नाहीत तो पर्यंत त्या एक होत्या म्हणणे अवघड जाते, मेसाईची मुर्तीरुप मंदिरे कमी आहेत तर मरीआईची बरिच आहेत हा या दोन देवी मधला फरक दखल घेण्या जोगा वाटतो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:१८, २६ मार्च २०१७ (IST) ---Reply

ग्रामदेवता

संपादन

तुकारामाच्या बायकोच्या माहेरची जशी मंगळाई, तशीच ही मेसाई. या ग्रामदेवता शुद्ध मराठीच. राजराजेश्वरी उत्तराखंडातही आहे, पण ती मराठी राजराजेश्वरीपेक्षा वेगळी असावी.

मराठी आणि पर्यायाने हिंदू देवांच्या यादीत मेसाई वगैरेंचा समावेश होण्यास हरकत नसावी. ... (चर्चा) २२:५४, २६ मार्च २०१७ (IST)Reply

मूळ लेख

संपादन

ईश्वर हा सर्वव्यापी आहे, असे सर्व धर्मांत मानले जाते. असे असले तरी, प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. फक्त महाराष्ट्रात पूजले जाणारे असे कित्येक हिंदू आणि अन्यधर्मी देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती  :

  1. अंचलेश्वर (चंद्रपूर) - अंचलेश्वर मंदिराची माहिती - []
  2. अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)
  3. अरण्येश्वर (पुणे)
  4. उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
  5. ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)
  6. कनकेश्वर (फोफेरी-अलिबाग, कुलाबा जिल्हा)
  7. कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)
  8. कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.)
  9. कल्याणेश्वर (तळेगाव दाभाडे)
  10. काळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.)
  11. काळभैरवनाथ (मावळ तालुक्याचे आराध्यदैवत आणि वडगाव गावाचे ग्रामदैवत). पिंपरी (पुणे) गावातही काळभैरवनाथाचे एक देऊळ आहे.
  12. कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
  13. कोनबाबा (जांभारी, रत्नागिरी जिल्हा)
  14. खडकेश्वर (तळेगाव दाभाडे)
  15. खंडोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
  16. खेमदेव (साखरोली गवळीवाडी खेड तालुका. रत्नागिरी जिल्हा)
  17. खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
  18. गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे आहे.)
  19. गणपती (हा खास मराठी देव आहे, महाराष्ट्राबाहेर याला गणेश म्हणतात!)
  20. गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
  21. भगवान जाहरवीर गोगादेव (मेहतर वाल्मीकी समाजाचा देव, सासवड.)
  22. गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)
  23. घृष्णेश्वर - (शिवाचे एक रूप.-औरंगाबादजवळ वेरुळ येथे मुख्य मंदिर आहे.)
  24. घोरवडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)
  25. जिव्हेश्वर (स्वकुल साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.)
  26. जीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.)
  27. ज्योतिबा
  28. चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)
  29. जबडेश्वर (माळेगाव-टाकवे बुद्रुक)
  30. झुलेलाल (सिंधी देव)- या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत. साधारणत: जेथे सिंधी समाजाची वसती आहे तेथे हा देव असतो. हिंदूच्या जलदेवतेशी(वरुण) साधर्म्य साधणारी ही देवता आहे. जेको चवन्दो झुलेलाल, तहिंजा थिंदा बेडा पार.(जो झुलेलाल म्हणतो(चा जप करतो), त्याचा बेडा पार होतो.)[]
  31. डोळसनाथ (तळेगाव स्टेशन भागात-पुणे जिल्हा)
  32. तेलंगराय बाबा (सारंगपुरी, वर्धा जिल्हा)
  33. त्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
  34. त्र्यंबकेश्वर
  35. दंडनाथ, (सांगली जिल्हा)
  36. दत्त (पूर्ण नाव दत्तात्रेय) . मुख्यत: महाराष्ट्रात आणि त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात पूजला जाणारा देव)
  37. दरीदेव
  38. दैत्यसूदन, लोणार (बुलढाणा जिल्हा)
  39. धनेश्वर (चिंचवडगाव-पुणे)
  40. धूतपापेश्वर (राजापूर, रत्‍नागिरी जिल्हा)
  41. नागनाथ
  42. नागेश्वर
  43. पंढरीनाथ
  44. पल्लीनाथ
  45. पांडुरंग
  46. पाताळेश्वर-मूलत:पूण्यातले एक शिव मंदिर, येथे पाताळेश्वराची लेणी आहेत. नागपूरच्या महाल भागातही याचे एक मंदिर आहे.[]
  47. पिंगळभैरव
  48. पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा (चाळीसगाव)
  49. पोटोबा महाराज (वडगाव-मावळ येथील देवस्थान)
  50. बनेश्वर (तळेगाव दाभाडे)
  51. बहिरीदेव उर्फ भैरव देव (सारडे-उरण, रायगड जिल्हा)
  52. बामोशी बाबा दर्गा (चाळीसगाव)
  53. बाळकृष्ण
  54. बिरदेव
  55. बिरोबा (मूळचा वीरभद्र). हा धनगर समाजाचा देव आहे. याची देवळे आरेवाडी (तालुका कवठेमहांकाळ), वडवणी (बीड जिल्हा), मिरी (तालुका पाथर्डी) वगैरे गावांत आहेत.
  56. बोल्हाई (या देवीचे देऊळ पिंपरी सांडस गावाजवळ आहे).
  57. भद्रेश्वर (वाई)
  58. भानोबा (कुसेगाव, तालुका दौंड-पुणे जिल्हा)
  59. भीमाशंकर
  60. भुलेश्वर
  61. भैरवनाथ (आगडगाव-अहमदनगर जिल्हा; आंबेगव्हाण-जुन्नर तालुका; सिन्नर-नाशिक जिल्हा; खडकवासला-पुणे)
  62. भैरीदेव (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
  63. मल्लारीखंडोबा
  64. मल्लारीमार्तंड
  65. मस्तानी अम्मा टेकडी दर्गा (चाळीसगाव)
  66. मारुती : ह्या देवाला महाराष्ट्राबाहेर हनुमान म्हणूनच ओळखले जाते. मारुती हा खास मराठी देव आहे.
  67. मार्तंडभैरव
  68. मुंजाबा (मुंजोबा?)  : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत.
  69. म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका, पुणे शहर ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत. साधारणतः रस्त्यास असलेल्या घाटात(डोंगर चढाय-उतरायला केलेला वळणावळणाचा रस्ता)याची देवळे असतात. वाहनचालक घाटात त्यांच्या वाहनाला अपघात होऊ नये म्हणून याची घाटात शिरतेवेळी/निघाल्यावर पूजा करतात. म्हसोबाला पत्नी नाही. त्यावरून मराठीत ’म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा!’ अशी म्हण आहे. हा खास मराठी देव आहे.
  70. म्हातोबा (कोथरूडचे ग्रामदैवत असलेल्या या देवाचे स्थान पुण्यातील कोथरूडच्या म्हातोबा गडावर आहे.)
  71. म्हादोबा
  72. म्हाळसाकांत
  73. रवळनाथ : मुख्यत्वे कोकणात - निरुखे गाव-कुडाळ तालुका; पणजी-गोवा; सातार्डे-सावंतवाडी तालुका; एडगाव (वैभववाडी), वगैरे. अधिक माहिती पु.रा. बेहेरे यांच्या ’श्री रवळनाथ आणि कोकणातील देवस्की’ या पुस्तकात.
  74. रायरेश्वर
  75. रूपनारायण
  76. रोकडोबा (शिरगाव-मावळ गावाचे ग्रामदैवत
  77. वटेश्वर (टाकवे बुद्रुक)
  78. वरदायिनी माता (वडगाव मावळ)
  79. वाकेश्वर (वाई)
  80. वाघेश्वर (चऱ्होली-पुणे जिल्हा)
  81. व्याघ्रेश्वर (याचे देऊळ गुहागर येथे आहे).
  82. वाळकेश्वर  : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव (अहमदनगर जिल्हा), दटषिवा (?), मुबई, पातूर (अहमदनगर जिल्हा), बांदा (सिंधुदुर्ग जिल्हा), वगैरे.
  83. विठ्ठल
  84. वीरभद्र
  85. वेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत. हा भुतांचा राजा आहे.
  86. वेताळेश्वर (तळेगाव दाभाडे)
  87. वेतोबा
  88. व्याघ्रेश्वर
  89. शंकर (याला महाराष्ट्राबाहेर शिव, शिवशंकर,गौरीशंकर, महादेव किंवा भोलेनाथ आदी नावांनी ओळखतात.)
  90. शकुंतेश्वर (वडुथ-सातारा जिल्हा)
  91. शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
  92. (हजरत गारपीर) शहावली बाबा (तळेगाव दाभाडे खिंड)
  93. शिवघाटेश्वर (शिंदेवाडी, टाकवे बुद्रुक)
  94. श्रीमाऊली
  95. साईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित)
  96. सिद्धिविनायक
  97. सिद्धेश्वर (मांडवगण-अहमदनगर जिल्हा; रायवुड(राई) लोणावळा; सोलापूर)
  98. सुवर्णेश्वर
  99. सोमेश्वर
  100. हजरत गफूरशाह हुसैनी कलंदर (पुण्यातील दारूवाला पुलावरचा पीर)
  101. हजरत मोहंमदशाह हुसैनी (पुण्यातील दारूवाला पुलावरचा दुसरा पीर)
  102. हरणेश्वर (हरणेश्वर टेकडी, तळेगाव दाभाडे)
  103. हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)

  1. अन्नपूर्णा
  2. अंबाबाई (आंबाबाई), अंबादेवी (अमरावती)
  3. अंबेजोगाई/(योगेश्वरी) (अंबाजोगाई)
  4. अमरजाई (अमरदेवी), शेलारवाडी (देहूरोड-पुणे)
  5. आंगलाई देवी (सज्जनगडावर)
  6. आसरा (सातीआसरा) (मावलाया)
  7. इंगलाई (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
  8. एकवीरा (कार्ल्याचा डोंगर-पुणे जिल्हा). जत तालुक्यातील डफळापूरपासून १ मैलावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत ’एकवीरा देवी मंदिर’ नावाचे गाव आहे.तसेच अमरावती येथेही एकवीरा देवीचे मंदिर आहे.
  9. कडजाईमाता (इंदोरी-मावळ)
  10. कनकंबादेवी, (करकंब)
  11. कळमजाई माता, (जुन्‍नर तालुक्यातील आळेफाट्याजवळील ’वडगाव आनंद’पाशी असलेला मोरदरा परिसर)
  12. कांगोरी देवी, (मंगळगड-रायगड जिल्हा).
  13. कानूबाई (पुणे). लाडशाखीय वाणी समाजाची देवी
  14. कासारदेवी (पुणे). त्वष्ठा कासार समाजाची देवी
  15. काळकाई (जांभारी-रत्नागिरी जिल्हा)
  16. काळबादेवी (मुंबई)
  17. काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीलाही काळूबाईचे एक देऊळ आहे.)
  18. काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव.
  19. कुंभळजाई
  20. कृष्णाई (घडशी समाजाची देवी), शुक्रवार पेठ(पुणे)
  21. केंजळाई, केंजळगड-सातारा जिल्हा
  22. केजू देवी (कोथरूड-पुणे)
  23. कोमनादेवी (सारडे-उरण, रायगड जिल्हा)
  24. खंबाळकालकाई
  25. खराळआई (खराळवाडी-पिंपरी, पुणे)
  26. खेडजाई
  27. गजगौरी
  28. गढीआई (मांडवगण, श्रीगोंदे तालुका-अहमदनगर जिल्हा)
  29. गामदेवी (मुंबई, दापवली, शिरवली, वगैरे अनेक गावांत)
  30. गावदेवी (मुंबई)
  31. चतुःशृंगी (पुणे)
  32. चंपावती
  33. चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते)
  34. चैत्रगौरी
  35. चौंडाई
  36. चंडिकादेवी (कुरनखेड, अकोला)
  37. जगदंबा
  38. जननीदेवी (ह्या देवीचे देऊळ मुळशी तालुक्यातल्या मुठा गावी आहे).
  39. जरा जिवंतिका
  40. जरीमरी (कुर्ला-मुंबई)
  41. जाखामाता देवी (तुंगार्ली-लोणावळा); (साखरोली गवळीवाडी खेड तालुका. रत्नागिरी जिल्हा)
  42. जानाई (निवखन पाटण, निमसोड)
  43. जिवंतिका (जिवती)
  44. जोगेश्वरी (पुणे शहरात काळी जोगेश्वरी आणि तांबडी जोगेश्वरी अशी दोन देवळे आहेत; प्रसिद्ध मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात अंबेजोगाई येथे)
  45. ज्येष्ठागौरी
  46. झोलाई
  47. तळजाई (पुणे शहर)
  48. तुकाई
  49. तुकादेवी
  50. तुळजाभवानी (तुळजाई)
  51. त्वरितादेवी (तलवाडा-बीड)
  52. तपोवनदेवी (रोहडा, चिखली तालुका)
  53. धानम्मा (गुड्डापूर, जत)
  54. नवलाई
  55. निनाई (चाफळ)
  56. पद्मावती, (पुणे) आणि अन्यत्र
  57. पाथरजाई
  58. पांडजाईदेवी (वाईच्या पांडवगडावर)
  59. पावणाई (निरुखे गाव-कुडाळ तालुका)
  60. पौडगादेवी
  61. प्रभादेवी
  62. पिंगळादेवी नेरपिंगळाई
  63. फिरंगाई
  64. बनशंकरी (महाराष्ट्र व कर्नाटक)
  65. बहिरीदेवी (गडहिंग्लज-कोल्हापूर जिल्हा)
  66. बाणाई
  67. बृहद्‌गौरी
  68. बोलाई
  69. भद्रकाली
  70. भवानी (तुळजापूर; निमसोड खटाव)
  71. भावकादेवी
  72. भेकराईमाता : या देवीचे देऊळ पुण्यातील फुरसुंगीजवळच्या भेकराईनगरात आहे.
  73. मंगळग्रह (अंमळनेर)
  74. मंगळागौरी
  75. मंगाई
  76. मंडलाई
  77. मानाई
  78. मनुदेवी
  79. मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे.
  80. मसाई/मेसाई देवी (मसाई पठार, पन्हाळा-पावनखिंड पायवाट)
  81. महालक्ष्मी
  82. मळूदेवी. ही देवी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाळद गावची आणि अंदर मावळातल्या कशाळ गावची ग्रामदेवता आहे.
  83. मांढरदेवी
  84. मांढरादेवी
  85. मावलाया (आसरा) :
  86. मुंबादेवी (मुंबई)
  87. मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील ख्रिश्चन देवी)
  88. मोहटादेवी (थेरगाव-पुणे)
  89. मोहिमाता (मोहिमान, निमसोड)
  90. म्हाळसा
  91. महाकाली देवी (चंद्रपूर)
  92. यमाई (:औध-सातारा)
  93. यल्लमा (महाराष्ट्र, कर्नाटक)
  94. येलंबा
  95. योगेश्वरी (अनेक देवळे, पैकी प्रसिद्ध देऊळ अंबाजोगाई येथे)
  96. रत्नेश्वरी
  97. रंभाई (हिचे देऊळ जेजुरीला आहे.)
  98. रागाई
  99. राणुभवानी देवी
  100. रासाई देवी (अनेक देवळे - वडगावरासाई गावात आणि भीमा नदीवरील धरणाच्या पाण्यात (पुणे जिल्हा), नानगाव (ता. दौंड), आचिर्णे (वैभववाडी-फोंडा रस्ता, सिंधुदुर्ग जिल्हा), असळज (गगनबावडा तालुका) गावात, शेंडूर (कागल तालुका) गावात, सावर्डी (अमरावती तालुका) येथे, चाफेड (देवगड तालुका) गावात, दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी खंदकात, राधानगरी तालुक्यात केळोशी बुद्रुक परिसरात, लांजा गावात, वगैरे)
  101. रेडजाई
  102. रेणुका (माहुरगड - नांदेडपासून १३० लिमी)
  103. ललिता
  104. वडजाई देवी  : गावाची नावे- वडजल-माण (सातारा जिल्हा); पौड (पुणे जिल्हा); आरळे (सातारा); धुळे;
  105. वनदेवी
  106. वाघजाई
  107. वाळंजाई
  108. विंध्यवासिनी (चिपळूण, रत्‍नागिरी जिल्हा). याशिवाय उत्तर प्रदेशात एक मंदिर आहे.
  109. शाकंभरी
  110. शांतादुर्गा (गोवा)
  111. शांतेश्वरी
  112. शारदमणीदेवी
  113. शिरकाईदेवी (शिरकोली-पुणे जिल्हा; तारदाळ-कोल्हापूर जिल्हा; रायगड किल्ला: घोडशेत)
  114. शिवाई
  115. शीतला
  116. शेवताई (पवना धरणामुळे पुनर्वसन करावे लागलेल्या शेवता गावाचे ग्रामदैवत)
  117. सटवाई
  118. सप्‍तशृंगी (वणी-नाशिक जिल्हा)
  119. सातीआसरा
  120. सालबाई
  121. सोनादेवी
  122. सोमजाई
  123. हरणाई देवी (भूषणगड)
  124. हरतालिका
  125. हिंगलाची यक्षिणी
  126. हिंगलाई
  127. हिंगुळा (चौल-रायगड जिल्हा); अडूळ (रत्‍नागिरी जिल्हा)
  128. हिंगुळांबिका (सोलापूर)
  • -पुणे)
  • (पुणे)
  • (पुणे)
  • (पुणे)
  • (मुंबई)
  • (करकंब)
  • सातारा)
  • (पुणे)
  • -पुणे)
  • (मुंबई)
  • (कल्याण)
  • पायथा)
  • आहे.)
  • डोंगरी(मुबई)
  • नाशिक)
  • (परभणी)
  • (पिंपळगाव)

प्रताधिकार भंग मजकूर

संपादन

https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 यानुसार या लेखाला सुमारे ८०/ प्रताधिकार भंग आहे. हा लेख अद्ययावत करण्यापूर्वी या भंगाचा विचार करावा लागेल. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) १९:५८, २० फेब्रुवारी २०१९ (IST)Reply



पहा : हिंदू देवांमधल्या प्रमुख जाती



(अपूर्ण)

संदर्भ

संपादन
"महाराष्ट्रातील देवता" पानाकडे परत चला.