यमाई देवी मंदिर (औंध)

(यमाई या पानावरून पुनर्निर्देशित)

शिव-पार्वती यांचे एकत्रित पुजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्तीस्वरुपिनी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुकादेवीचा अवतार मानले जाते . महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे (मंदिरे) आहेत, परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्यपीठ आहे. त्यामुळेच या ठिकाणास मुळपीठ त्याचबरोबर देवीलाही यमाईदेवी व्यतिरिक्त मुळपीठदेवी म्हणून देखील ओळखले जाते.[]

श्री यमाई देवी (मुळपीठ)
स्थानिक नाव
Goddess of wealth and beauty
नाव
भूगोल
संस्कृती
स्थापत्य
इतिहास व प्रशासन

औंधासूर राक्षसाचा भक्तजणांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री जोतिबा दक्षिणेस(सध्याचे औंध) पर्वतावर चालून आले. परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली. दिव्यस्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमगले. तेव्हा जोतिबांनी आदिमायेस "ये माई" अशी साद घातली. जोतिबांनी घातलेली साद ऐकताच आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाईदेवीचा अवतार धारण केला. आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली भवानीमाता पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड्ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भात प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानेने व्याकूळ झालेला. आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधात होते. औंधसूराचे आणि देवीचे निकराचे तुंबळ युद्ध झाले. देवी प्रचंड क्रोधीत झाली होती. तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळत औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याने धड आणि डोके वेगळे केले. अशाप्रकारे मुळमाया यमाई देवीने औंधसूराचा वध केला आणि जनतेस भयमुक्त केले.

टेकडीच्या पायथ्यापासून सुरू होणाऱ्या पायऱ्या वापरून किंवा ऐवजी घाटाचा रस्ता वापरून कारने टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते. आता रस्त्यांची स्थिती पहिल्या पेक्षा चांगली सुधारल्याने वाहने वरपर्यंत पोहोचू शकतात. वरच्या बाजूला पार्किंग उपलब्ध आहे. काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास दोन मीटर उंच असून, पायाची मांडी अढी घालून बसलेल्या स्थितीत आहे. हे मंदिर मोठ्या संख्येने मराठी कुटुंबांचे कुळ-दैवत आहे. मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत. हे शहर आणि मंदिर अनेक शतकांपासून चालुक्य,यादव ,भोसले जगदाळे या शासकांशी गुरवघराणे कुंटूण्बाशी संबंधित आहे.अलीकडेच लोकवर्गनीतून देवीस या सोन्याचा कलश स्थापित केला आहे. टेकडीवरील मंदिरा व्यतिरिक्त यमाई देवीचं आणखी एक मंदिर खाली गावात आहे.[][]

श्री भवानी संग्रहालय

संपादन

मंदिर संकुलात औंधच्या महाराजांच्या आपल्या खाजगी संग्रहातून स्थापन केलेले श्री भवानी संग्रहालय देखील आहे. संग्रहालयाची इमारत मंदिराच्या टेकडीच्या मध्यभागी वसलेली आहे. अभ्यागत पायऱ्या आणि रस्त्याने संग्रहालयापर्यंत पोहोचू शकतात. संग्रहालयात एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय कलाकार जसे की एमव्ही धुरंधर, बाबुराव पेंटर, माधव सातवळेकर आणि राजा रवि वर्मा तसेच ब्रिटिश कलाकार हेन्री मूर यांच्या प्रसिद्ध मदर आणि चाइल्ड स्टोन स्ट्रक्चरची चित्रे देखील आहेत.[][][]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b "Yamai Devi: Legend behind the goddess and her temple in Aundh!". झी न्युज. Apr 17, 2017. April 21, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Pant, Apa (1974). A moment in time. Bombay Calcutta Madras New Delhi: Orient Longman. p. 20. ISBN 9780340147900. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ Bhagwat., Nalini. "M. V. Dhurandhar". indiaart.com. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ Chaitanya, Krishna (1994). A History of Indian Painting: The modern period. New Delhi: Abhinav Publications. pp. 273–274. ISBN 81-7017-310-8.
  5. ^ "Shivaji designs for stained-glass windows: the art of Ervin Bossanyi. - Free Online Library". Thefreelibrary.com. 2013-05-09 रोजी पाहिले.