रेणुका

रेणुका देवीची माहिती
Renuka (es); Renuka (hu); Renuka (is); Renuka (eu); Renuka (ast); Renuka (ca); Renuka (de); Renuka (sq); Renuka (da); Renuka (tr); رینوکا (ur); Renuka (rm); Renuka (sk); Ренука (uk); Renuka (nb); Renuka (ga); रेणुका (hi); ఎల్లమ్మ (te); Renuka (fi); ৰেণুকা (as); Renuka (eo); Renuka (cs); ரேணுகா (ta); Renuka (it); রেণুকা (bn); Renuka (fr); Renuka (uz); Renuka (et); ਰੇਨੂਕਾ (pa); Renuka (ro); Renuka (oc); Renuka (id); रेणुका (mr); Ренука (ru); ରେଣୁକା (or); Renuka (nl); Renuka (lv); Renuka (af); Renuka (lt); Renuka (sl); Renuka (pl); Renuka (pt-br); Renuka (sco); Renuka (lb); Renuka (nn); രേണുക (ml); Renuka (az); Renuka (cy); Renuka (pt); ರೇಣುಕ (kn); Renuka (an); Renuka (en); رنوكا (ar); Ρενουκά (el); Renuka (sv) nombre femenino (es); female given name (en-gb); prenume feminin (ro); 女性人名 (zh-hk); ženské krstné meno (sk); жіноче особове ім’я (uk); 女性人名 (zh-hant); 女性人名 (zh-cn); 여성의 이름 (ko); হিন্দু দেৱী (as); virina persona nomo (eo); ženské křestní jméno (cs); žensko ime (bs); হিন্দু দেবী (bn); prénom féminin (fr); žensko ime (hr); 女性人名 (zh-my); रेणुका देवीची माहिती (mr); žónske předmjeno (hsb); ହିନ୍ଦୁ ଦେବୀ (or); sieviešu personvārds (lv); vroulike voornaam (af); женско лично име (sr); nome próprio feminino (pt-br); 女性人名 (zh-sg); weibleche Virnumm (lb); kvinnenamn (nn); kvinnenavn (nb); also called in southern part of India ( Draupadi Amman) (en); اسم مؤنث معطى (ar); anv merc’hed (br); 女性人名 (yue); nome femenín (ast); prenom femení (ca); weiblicher Vorname (de-ch); enw personol benywaidd (cy); зудчун шен цӀе (ce); жаночае асабістае імя (be); իգական անձնանուն (hy); 女性人名 (zh); pigenavn (da); स्त्रीलिङ्गी नाम (ne); 女性の名前 (ja); weiblicher Vorname (de-at); שם פרטי נשי (he); praenomen femininum (la); हिंदू देवी (hi); naisen etunimi (fi); female given name (en-ca); இந்து பெண் தெய்வம் (ta); prenome femminile (it); naisenimi (et); nomu di battìu fimmininu (scn); žensko lično ime (sr-el); 女性人名 (zh-tw); γυναικείο όνομα (el); female gien name (sco); moteriškas vardas (lt); žensko osebno ime (sl); женско лично име (mk); نام‌های زنانه (fa); kadın ismidir (tr); nama perempuan feminin (id); imię żeńskie (pl); പുരാണകഥാപാത്രം (ml); vrouwelijke voornaam (nl); женско лично име (sr-ec); emër femëror (sq); weiblicher Vorname (de); nome próprio feminino (pt); Weiwanam (bar); kvinnonamn (sv); 女性人名 (zh-hans); 女性人名 (zh-mo) Renuka (nome propiu) (ast); യെല്ലമ്മ (ml); ରେଣୁ, ରେଣୁଗା (or)

रेणुका/'एकवीरा/यमाई/ येल्लुआई/ येल्लम्मा,( कन्नड: ಶ್ರೀ ಎಲ್ಲಮ್ಮ ರೇಣುಕಾ, तेलुगू: శ్రీ రేణుక/ ఎల్లమ్మ) ही आदिशक्तीचे प्रकट रूप म्हणून पूजली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू व काश्मीर ह्या राज्यात रेणुका देवीचे उपासक प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी रेणुकामाता यमाई, एकविरा, मोहटादेवी, पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. रेणुका देवीला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात. रेणुका माता ही क्षत्रिय, ब्राह्मण, आदिवासी व पतीतांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते. त्याचबरोबर कोळी, आगरी लोकांची आई म्हणून'तिचे एकवीरा हे रूप प्रसिद्ध आहे.

रेणुका 
रेणुका देवीची माहिती
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारदेवी,
conflation
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा, पद्माबिंका आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर या आदिवासीबहुल भागातील गावाजवळील माहूरगडावर आहे.

रेणुका ही इक्ष्वाकु वंशातील रेणु नावाच्या महाराजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते, त्यातील एक हे भगवान परशुराम आहेत. सप्त चिरंजीवांपैकी असलेले भगवान परशुराम हे अजूनही महेंद्र पर्वतावर गुप्त स्वरूपात तप करत आहेत अशी मान्यता आहे.

रेणुका देवी अवतार

संपादन

१. श्री यल्लम्मा देवी, सौंदत्ती

२. श्री यमाई देवी, औंध(मुळपीठ)

३. श्री एकविरा देवी, कार्ले

४. श्री अंबामाता देवी, अमरावती

५. श्री मोहटा देवी, मोहटा

६. श्री पद्माक्षी रेणुका, कावाडे(अलीबाग)

आख्यायिका

संपादन

आदिशक्ती जगदंबेने कुब्ज देशाच्या इक्ष्वाकू कुळातील महाराज रेणु ह्यांच्या घरी जन्म घेतला. महाराज रेणू ह्यांची कन्या ती रेणुका असे तिचे नाव ठेवले . शंकराचे अवतार असलेल्या महर्षि जमदग्नीसमवेत तिचे लग्न झाले.महर्षि जमदग्नि हे योग सिद्ध ऋषि व तपस्वी होते. अनेक देवी देवता त्यांच्या व माता रेणुकेच्या दर्शनास येत. एकदा देवराज इंद्र त्यांच्या कडे आला, महर्षि जमदग्नि या रेणुका मातेच्या आदर अतिथ्याने प्रसन्न होऊन इंद्राने स्वर्गातील इच्छापूर्ती करणारी दिव्य गाय कामधेनु ही महर्षि जमदग्नि ह्यांना भेट दिली. प्रारंभीस जमदग्नि ऋषींनी नम्रपणे नकार दिला, कारण ते स्वतः संन्यासी व विरक्त ऋषि होते. मात्र इंद्राने आग्रह करत त्यांना आश्रमातील सेवेसाठी तरी कामधेनु स्वीकार करण्याची विनंती केली. पुढे आश्रमात अनेक वर्षे येणाऱ्या अतिथि ह्यांची मनोकामना हे महर्षि जमदग्नि व माता रेणुका कामधेनू च्या सहाय्याने पूर्ण करीत. त्या वेळी एकदा राजा सहस्रार्जुन हा आपल्या विराट सैन्यासकट ह्या आश्रमात आला. राजाचे प्रेमाने स्वागत करून महर्षि व मातेने त्याला पंच पक्वान्न खाऊ घातले व सोबतच पूर्ण सैन्याच्याही भोजनाची उत्तम व्यवस्था केली. ह्या आदरतिथयाने सहस्रार्जुन चकित झाला. त्याने आश्चर्याने महर्षि जमदग्निंना विचारले की तुम्ही एवढ्या विशाल सैन्याची भोजन व्यवस्था कशी केलीत ? त्यावर महर्षींनी त्याला कामधेनु बाबत सांगितले. सहस्रार्जुनाच्या मनात लालसा उत्पन्न होऊन त्याने ऋषि जमदग्निंना ती गाय मागितली. मात्र ती इंद्राकडून भेट मिळाली असल्याने आलेली भेट ही दुसऱ्यास दिल्याने इंद्राचा अपमान होईल म्हणून महर्षि जमदग्निंनी नम्रपणे असहमती दर्शवली. त्यांनी सहस्रार्जुनाला इतर काहीही मागण्यास सांगितले. मात्र सहस्रार्जुन हा हट्टाला पेटला व वारंवार नकार देऊनही त्याने महर्षि जमदग्नि ह्यांचा अपमान केला व गाईस धरून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. कामधेनु ही महर्षि जमदग्नींचा आश्रम सोडण्यास काही तयार होईना. ती मोठ्याने हंबरू लागली. सहस्रार्जुन हा उन्मत्त व शीघ्रकोपी होता. त्याने महर्षि जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला. महर्षि जमदग्नि हे आपल्या योग सामर्थ्याने सहस्रार्जुनाला त्याच्या संपूर्ण सेने सकट नष्ट करू शकले असते, मात्र क्रोध त्यागाच्या प्रतीज्ञेमुळे त्यांनी प्रतिकार केला नाही व शेवटी सहस्रार्जुनाने निर्दयीपणे जमदग्नींना ठार मारले व रेणुका मातेवर २१ वेळ वार केले व पळून गेला. क्रुद्ध व अगतीक होऊन माता रेणुकेने आपल्या मुलाला, परशुरामाला हाक मारली. आईची आर्त हाक ऐकून तो त्वरित तेथे आला व मृत वडील व जखमी आईला पाहून हादरला. मग रेणुकेने घडलेला प्रकार त्याला सांगितल्यावर परशुराम क्रोधाने संतापला व त्याने अत्याचारी क्षत्रियांपासून पृथ्वी २१ वेळ निःक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली. भगवान परशुरामाने कोरी भूमी म्हणून दत्तक्षेत्र माहूर हे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. मातृ विराहाने व्याकूळ होऊन त्याने आपल्या आईस आर्त हाक मारली. त्यावेळेस आकाशवाणी झाली या रेणुका माता त्याला म्हणाली "बाळा, मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईन , पण तू मागे पाहू नकोस" मात्र काही वेळाने परशुरामाने आईच्या भेटीच्या कल्पनेने न राहवून मागे पाहिले तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते, मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला. ह्याच स्थानी आज माहूर चे रेणुका मंदिर बांधले आहे. जगदंबा रेणुका मातेच्या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात.

 
यल्लाम्मागुडी, सौंदत्ती, उत्तर कर्नाटक येथील रेणुका मंदिर

रेणुकामातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, प्रज्ञावान, चपळ आणि लाघवी होती. पुढे महर्षि अगस्ती ह्यांनी रेणु राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे महर्षि रुचिक आणि सत्यवती यांचे पुत्र होते, खडतर तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते. सोबतच देवतांचे आशीर्वाद सुद्धा संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका महर्षि जमदग्नी ह्यांना पूजाअर्चेत मदत करत असे.

माता रेणुका ही अत्यंत सुशील व सामर्थ्यवान होती। ती दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षि जमदग्नींसाठी पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती आश्रमात जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे.

एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप होऊन उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले.

पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि योगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले.[ संदर्भ हवा ] त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली.

रेणुका देवींना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रामभद्र. रामभद्र हा सर्वात कनिष्ठ व सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रामभद्र हा श्रीविष्णु ह्यांचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात.

जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही व त्यांना कडाडून विरोध केला. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी वर मागितला की आपल्या आई आणि भावांना पुनर्जीवित करून त्यांचे प्राण परत मागितले. त्याच क्षणी रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. घडलेला हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले. महर्षि जमदग्नि ह्यांना आपल्या हातून घडलेल्या अघोर व पापी कृत्याची जाणीव झाली व ते अत्यंत दुखी होऊन पश्चाताप करू लागले. हे पाहताच देवी रेणुकेने त्यांना शांत केले. घडलेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून महर्षि जमदग्नींनी आपल्या क्रोधाचा कायमचा त्याग करायची प्रतिज्ञा घेतली.

माता रेणुका देवीच शिरच्छेद झालेलं शिर श्रीबाग इथे अर्थात आताचे अलिबाग इथे आदळले आणि तिथे देवी नवीन रूपात प्रकट झाली व तिने कुंभासुर नामक राक्षसाचा वध करून तिथे पद्माक्षी रेणुका नावाने निवास केला.

येल्लम्मा

संपादन

रेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला, तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मधे आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्नींच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले.

रेणुकादेवी (माहूर)

 
रेणुकामातेचा तांदळा

हा मुखवटा सुमारे ५ फूट उंच असून ४ फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढविला आहे.या मंदिरामागे परशुरामाचे मंदिर आहे.

कालसापेक्षता

संपादन

परशुरामाचा जन्म त्रेता युगा पासूनचा आहे. त्रेता युगा नंतर द्वापाऱ्युग. द्वापार युगा नंतर कलियुग आले. भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यू नंतर कलियुगाचा जन्म झाला म्हणजेच या गोष्टीस जवळपास पाच हजार वर्षे झाली त्यामुळे भगवान परशुराम हे त्रेतायुग म्हणजेच राम जन्म च्या आधीपासून आहेत व आता चिरंजीव आहेत.

हेही पाहा

संपादन