जमदग्नी (संस्कृत: जमदग्नि) हा हिंदू पौराणिक कथांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी होता. विद्यमान मन्वंतरातील सप्तर्षींमध्ये तो सातवा मानला जातो. तो भृगूच्या कुळात जन्मला. रेणुका ही त्याची पत्नी होती. तिच्यापासून त्याला पाच पुत्र झाले. विष्णूचा अवतार मानला जाणारा परशुराम पाच पुत्रांमधील सर्वांत धाकटा होता.


सप्तर्षी Aum.svg
अत्रीभारद्वाजगौतमजमदग्नीकश्यपवसिष्ठविश्वामित्र