विश्वामित्र

सप्तर्षींपैकी एक ऋषी

२१व्या शतकात चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरात जे सप्तर्षी सांगितले आहेत, त्यांपैकी एक विश्वामित्र आहे. बाकीचे सहा - अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाजवसिष्ठ.

Varma - Vishvamitra Meditation.jpg

विश्वामित्रांनी खूप कडक तपश्चर्या केली, पण त्यांना महर्षिपद मिळू शकले नाही. ब्रह्मर्षी पदावर त्यांना समाधान मानावे लागले.

एका तप पूर्ण झाल्यावर विश्वामित्रांना खूप भूक लागली. खायला दुसरे काहीच न मिळाल्याने, त्याने मेलेल्या कुत्र्याची तंगडी चोखली.[ संदर्भ हवा ]

विश्वामित्रांच्या तपश्चर्येला घाबरून इंद्राने त्याच्या तपभंगासाठी मेनका अप्सरेला पाठवले. तपभंग झाला आणि विश्वामित्राला मेनकेपासून शकुंतला (कन्या) झाली.

विश्वामित्रांनी त्यांच्या तपोबलाच्या जोरावर त्रिशंकुला सदेह स्वर्गाला पाठवण्याचा बेत केला. इंद्राने तो हाणून पाडला. त्याला उत्तर म्हणून, अंतराळात ज्या ठिकाणी त्रिशंकू लटकत होता, त्याच्या आसपास विश्वामित्रांनी नवी सृष्टी, नवा स्वर्ग निर्माण केला. मात्र, तेथे नवा इंद्र निर्माण करायचा त्याचा प्रयत्न देवांनी विफल केला. हा त्रिशंकू अजूनही आकाशात एका ताऱ्याच्या रूपात लटकत आहे. इंग्रजीत या ताऱ्याला Crux म्हणतात. त्रिशंकुला The Upside Down King असेही म्हणतात.

त्रिशंकू या नावाची अनेक पुस्तके आहेत. भारतातील राज्याामध्ये किंवा परदेशातल्या एखाद्या देशात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण होते. इंग्लंडमध्ये २०१० साली अशी स्थिती आली होती; भारतात अनेकदा होते.

पुस्तकेसंपादन करा

  • ब्रह्मर्षी विश्वामित्र (पुस्तक; लेखक - भागवताचार्य शोकानंद महाराज)
  • विश्वामित्र (शुभांगी भडभडे)
  • विश्वामित्र (सुधाकर शुक्ल)

हे सुद्धा पहासंपादन करा

सप्तर्षी  
अत्रीभारद्वाजगौतमजमदग्नीकश्यपवसिष्ठविश्वामित्र