गौतम ऋषी

सप्तर्षींपैकी एक ऋषी

हे वैवस्वत मन्वंतरातल्या सप्तर्षींमधील एक ऋषी आहे. आकाशात दिसणाऱ्या सप्तषीं ताऱ्यांमध्ये ह्यांचे नाव नाही.

गौतमाच्या पत्नीचे नाव अहल्या (मराठी: अहिल्या) आहे. इंद्राने भ्रष्ट केल्याने ही गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा (पत्थर) झाली. पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती परत मनुष्यरूपात आली.

गौतमाच्या शापाने इंद्राच्या शरीराला सहस्र छिद्रे पडली. त्या छिद्रांचे उःशापामुळे डोळे झाले. या हजार डोळ्यांमुळे इंद्राला सहस्राक्ष म्हणतात.

गौतम ऋषी जयंती चैत्र शुक्ल प्रतिपदेला असते.

सप्तर्षी
अत्रीभारद्वाजगौतमजमदग्नीकश्यपवसिष्ठविश्वामित्र