महाराष्ट्रातिल रायगड जिल्ह्यात उरण तालुक्याच्या पुर्व विभागात सारडे गावात कोमनादेवी (Coordinates: १८°५०'०"उत्तर ७३°०'२७"पूर्व ) ही एक स्थान देवता असुन ती पाषाण रूपात पुजली जाते. हे देऊळ उरण शहरापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे. देवीची कोणतीही मुर्ती नसुन एक लहान पाषाण आहे. हे स्थान सारडे गावात असुन त्याच्या पुर्व दिशेला असलेल्या कोमनादेवी डोंगरावर वसलेले आहे. पिरकोन,पाले गावाच्या दक्षिणेला आहे. येथे पूर्वी दाट झाडी होती १९९० नंतर हळूहळू ती कमि झाली . सारडे गावात ही देवता पुजनीय असुन पिरकोन आणि पंचक्रोशित सुद्धा वंदनीय आहे. सध्या २०१५ मध्ये येथे विद्युतवाहिनीचे खांबांद्वारे येथे वीज आली आहे. बहुतेक सर्व व्यवस्था सारडे गावकीकडे किंवा ग्रामपंचायतिकडे आहे. पावसाळ्यात आठवडा अखेरीस हे स्थान आणि टेकडी पर्यंटक आणि स्थानिक तरुणाईने बहरलेले असते, सुर्यास्ताच्यावेळी येथुन उरण मधिल द्रोणागिरी डोंगराच्या पलीकडे सोनेरी प्रकाशांत दक्षिण मुंबई दिसते ,तसेच पावसाळ्यामध्ये काळ्या मेघांमधुन ही मुंबईचे दर्शन होते,तर सांयकाळी विद्युतप्रकाशात चमचमणारे उरण परिसर दिसतो. पावसाळ्यात येथे तरुणाई आणि किशोरवयीन मुले फुटबॉल खेळण्यात व्यस्त असतात. विशेष असा रस्ता अजुन बनविला नाही आहे,अजुन पायवाटेनेच येथे पोहचता येते. येथे विविध पाषाणांनी ही देवता व्याप्त आहे.ह्या पाषाणांत देखिल देवतांचे अंश आहेत असे मानले जाते.

घोलाच्या पश्चिमेला' कोमनादेवी डोंगरावर' 'कोमनादेवी' प्रगट झाली आहे जी पाषाण रूपात येथे निवास करते. गावाच्या आख्यायिकेनुसार देवी पिरकोन गावातील एका भक्ताच्या स्वप्नात आली होती तिने स्वप्नांत दृष्टांत देऊन सांगितले मला मुक्त राहु दे .त्यामुळे तेथे अजुन मंदिर बांधले गेले नाही,परंतु सारडे पिरकोन गावातिल भक्तांसाठी तिचे महत्त्व अपरंपार आहे.येथे येणारे पर्यटक देवीचे दर्शन जरुर घेतात.