सारडे
सारडे हे कोकणातील रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे, हा आगरी समाज शूद्ध क्षत्रिय समाज आहे, जो राजा नहुष ह्याचे नातु राजा ययाति राजाचा वंशज बळिभद्र राजा व त्यांची पत्नी आगलिका यांचा पुत्र आगळा ह्यांचा वंशज आहे जो मुंगी, पैठण वरून क्रमाक्रमाने कोकणात आले तरी काही क्षत्रिय ७०० वर्षां पूर्वी बिंब राजाबरोबर क्षत्रिय सैन्य म्हणून उत्तर कोकणात आले होते व कायमस्वरुपी येथेच स्थायिक झाले, कालांतराने हे क्षत्रिय सैन्य मिठ, शेती, मासेमारी, फळभाजी उत्पादनाकडे वळले व आजपर्यंत येथे शेती करत आहेत, ज्याची हद्द पाताळगंगा नदी पर्यंत भिडलेली आहे, हे गाव ही नवी वस्ती आहे, ह्या गावाचे मुळ गाव वशिने हे गाव होते तर सारडे गाव हे त्याचा पूर्वी पाडा होता, पाडा म्हणजे उपविभाग शिलाहार साम्राज्याच्या काळात पाडा हा शब्द रुढ झाला.
?सारडे महाराष्ट्र • भारत | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पेण, उरण,
नवीमुंबई, खारकोपर, नाव्हाशेवा द्रोणगिरी,पनवेल,रसायनी मुंबई शहर |
प्रांत | महाराष्ट्र |
विभाग | कोकण विभाग |
जिल्हा | रायगड |
तालुका/के | उरण |
लोकसंख्या साक्षरता • पुरूष • स्त्री |
१,३८९ (२०११) ८१.५३ % • ८९.८७ % • ७३.०२ % |
भाषा | मराठी |
भौगोलिक स्थान आणि संस्कृती
संपादनगाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत.गावाच्या मध्यभागी दक्षिणेकडे श्रीराधाकृष्णाचे ब्रिटिशांच्या काळातील मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मुर्ती आहे,श्रीराधाकृष्णांची मुर्ती तेंव्हा राजस्थान राज्यातुन तत्कालीन मुंबई शहरातील बंदरामधून सारडे-वशेणीच्या तरीवरून सारडे गावात आणली गेली होती.१९२७ पूर्वी सारडे गावात राजस्थान मधील मारवाड मधिल काही मारवाडी व्यापारी राहत असे,ते तत्कालीन पनवेल येथून माल बैलगाडीतून आणत असे आणि सारडे गावात विक्री करीत असे पंचक्रोशीतील सारेजण येथे खरेदीसाठी येत असे, तेंव्हाच्या काळात गावात डांबरी रस्ते नव्हते फक्त पायवाटा होत्या, तत्कालीन गावात मारवाडी स्रिया ह्या श्रीकृष्ण भक्त होत्या मात्र गावात श्री कृष्णाचे मंदिर नव्हते,मारवाड्यांच्या मनात श्रीकृष्णाचे मंदिर गावात असावे अशी इच्छा निर्माण झाली, ही इच्छा त्यांनी गावकऱ्यांशी बोलुन दाखवली,गावकीने गावात श्रीकृष्णाचे मंदिर असावे असे ठरवले मात्र गावातील लोकांकडे त्याकाळी तेवढे पैसे नव्हते तेंव्हा मारवाड्यांनी मंदिरासाठी खर्च करण्याची तयारी दर्शवली मात्र प्रश्न होता जागेचा तर गावातील काही पुण्यवान दानविर लोकांनी श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी स्वतः च्या जमिनी दिल्या पुढे राजस्थानातून मुंबई आणि मुंबई मधुन समुद्रमार्गे आवरे गावातील मचव्यातर्फे सारडे गावात श्रीराधाकृष्णाच्या मुर्ती आणल्या गेल्या. श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण होते.
भंगारपाड्यात 'कराडी' समाजाची वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस 'श्री बहिरी देवाचे मंदिर' आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन पातळगंगा नदीच्या[ दुजोरा हवा] खाडीस जाऊन मिळते.
गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला 'कडापे' ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे 'तांदळांची शेती' मोठ्या प्रमाणात करतात.
येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला 'घोल' म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा देवकन्या वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक 'बाया' म्हणतात.
सांस्कृतिक परंपरा आणि सण
संपादनगोपाळकाला हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात.गोपाळकाला ह्या सणाच्या आधी सात दिवस सप्ताह नावाचा समारंभ गावातील मुख्य मंदिरात असतो.हा हरीनाम सप्ताह १९४८ पासून आतापर्यंत अखंडपणे चालू आहे, मंदिराची निर्मिती १९२७ साली झाली .
अर्थव्यवस्था
संपादनपूर्वेच्या व पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात 'तांदळांची शेती' करतात. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही न्हावा-शेवा बंदरात. तसेच येथील खाडीतून मासेमारी करून ती विकण्याचा उद्योग काही व्यक्ती करतात. त्यासाठी ते आसू, यंडी, वावरी, पाग या पारंपरिक जाळ्यांचा वापर करतात. तर काही जण उदरनिर्वाहासाठी मासेमारी करतात.
दळणवळणाची साधने आणि वाहतूक व्यवस्था
संपादनराज्य महामंडळाच्या बसने तसेच नवीमुंबई महानगर परीवहन सेवेने सारडे गाव नवीमुंबई , उरण , पेण, पनवेल, अलिबाग ह्या शहरांशी जोडलेले आहे मात्र बह्वंशी प्रवास खाजगी दुचाकी , चारचाकी, तसेच ऑटोरिक्षा द्वारे होतो.
जवळचे रेल्वेस्थानक:- सध्या नेरूळ-उरण उपनगरी रेल्वेचे खारकोपर रेल्वे स्थानक १९ कि.मी. व नवीन होणारे नाव्हाशेवा रेल्वे स्थानक ९.१ कि.मी अंतरावर आहे,तर कोकण रेल्वे चे हमरापुर रेल्वे स्थानक ११ कि.मी इतकं दूर आहे.
जवळचे विमानतळ:- तर नवीन होणारे दि.बा.पाटिल आतंरराष्ट्रीय विमानतळ, नवीमुंबई २५ कि.मी. इतकं दुर आहे , तर छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळ ५२.किमी. दुर आहे.
जवळचे बंदर :- जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय बंदर येथून गेट वे औफ इंडिया, मुंबई येथे जाण्यासाठी लौंच उभ्या असतात ,तर वशेनी येथे लहानशी तर आहे, मोरा येथुन भाउचा धक्का, मुंबई, तर करंजा येथुन रेवस, अलिबाग येथे जलवाहतूक देखिल सुरू आहे.
प्रशासन
संपादनआरोग्यसुविधा
संपादनगावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोर्स किंवा हॉस्पिटल नाही. आरोग्यविषयक बाबींसाठी गावकऱ्यांना इतरत्र जावे लागते.