मेसाई देवी
मेसाई/ मसाई ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे.
मैसम्मा, मेसाई | |
---|---|
मैसम्मा, मेसाई देवी (महबूब नगर -तेलंगाणा जिल्ह्यातील मंदिर) |
मंदिरे
संपादनकान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे चैत्र पौर्णिमेपासून श्री मेसाई देवीच्या यात्रेचे आयोजन केले जाते.[१]
- मसाई पठार जिल्हा कोल्हापूर
महबूब नगर जिल्ह्यातील मैसम्मा देवीचे पुजारी लमाणी अथवा बंजारा समाजातून असतात. तेलंगणाच्या महबूब नगर जिल्ह्यात [२] तसेच हैदराबाद येथे लोअर टॅंकबंड रोड येथे मैसम्मा देवीची मंदिरे आहेत.
मेसाई देवी मंदिर आरणी ता धाराशिव
संत साहित्यातील उल्लेख
संपादनसंत नामदेवाच्या पत्नी राजाई आपल्या नवऱ्याची संसारविरक्ति पाहून म्हणतात[३] -
घरधन्यांनी केला गुरू | बाई मी आतां काय करूं ||
असून नाही हा संसारू | चमत्कारू कृपेचा ||
धांव पाव गे मेसाई | कवणाचेंहि न चले काई||
सत्यपण तूझिये ठायीं | असून नाहीसें करी हें ||
मंत्र घेतलासे जैसा | घरी संताचा वोळसा ||
वोस पडो या हरिदासां | गेले न येती मागुती ||
काय सांगूं यांच्या रिती | सोसें पायवणी पिती ||
अवघे भांबरभुतें होती | नाचताती आनंदें ||
एकमेकांच्या पडती पायां | लौकिकांतुन गेले वाया ||
म्हणती ये गा पंढरिराया | ब्रह्मानंदें डुल्लती ||
भोळी सासु गोणाबाई | पांढरा स्फटिक व्याली काई ||
त्यानें जोडला शेषशायी | म्हणे राजाई काय करूं ||
-राजाई
संत एकनाथ, संत तुकाराम, संत शेख महंमद यांच्या अभंग साहित्यात मेसाई देवीचे उल्लेख भक्तांच्या अंधश्रद्धांबद्दल खासकरून प्राणी वाहण्याच्या नवस प्रथांबद्दल टिका करताना येताना दिसतात.[४][५] संत नामदेव अंभंग ६९ मध्ये सुद्धा मेसाई देवीचा उल्लेख येतो [६]
- देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चा करिती पाही ।।
- नैवेद्य वाहती नारळ । अवघा करिती गोंधळ ।।
- बळेंची मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ।।
- बळेंची आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ।।
- सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ।।
- एका जनार्दनी ऐसा देव । येथे कैसा अमुचा भाव ।।
- ~ संत एकनाथ गाथा २५८६; [७]
- प्रेमे पूजी मेसाबाई सांडोनीया विठाबाई
- काय देईल ती वोंगळा सदा खाय अमंगळा
- आपुलिये इच्छेसाठी मारी जीव लक्ष कोटी
- तैसी नोहे विठाबाई सर्व दिनाची ती आई
- न सांडिची विठाबाई एका जनार्दन पाही
- ~ संत एकनाथ गाथा २५८७; [७]
- सांडोनीया विठाबाई कां रे पूजीता मेसाई
- विठाबाई माझी माता चरणीं लागो इचे आता
- ...
- ~ संत एकनाथ गाथा २५८८.[७]
- तिजेस पूजी अनामिकांचे देव । काळकाई विणाईसी धरी भाव । म्हणे वो मेसाई मले पाव । तुले शूरण आलों कीं ॥१७॥
- ~ संत शेख महंमद [८]
गावे
संपादन- आरणी (मेसाई) ता. जि. उस्मानाबाद
- मेसाई जवळगा
- कान्हूर मेसाई
संदर्भ
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-20 रोजी पाहिले.
- ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1765-2012-10-25-13-53-56
- ^ http://www.transliteral.org/pages/z70611145246/view
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3229916.cms[permanent dead link]
- ^ http://www.transliteral.org/pages/z110506051627/view
- ^ a b c संत एकनाथ गाथा वेषधाऱ्याच्या भावना क्रमांक २५८६,२५८७ आणि २५८८ दिनांक २२ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १४वाजून ३० मिनीटांनी http://www.transliteral.org/pages/z100222113342/view संस्थळावर जसे प्राप्त झाले
- ^ दिनांक २२ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी १४वाजून ३० मिनीटांनी http://www.transliteral.org/pages/z150503062750/view[permanent dead link] संस्थळावर जसे प्राप्त झाले