अंबा

(अंबाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)

अंबा हे महाभारतातील एक पात्र आहे. ती काशीच्या राजाची मुलगी आणि अंबिकाअंबालिका यांची जेष्ठ बहीण असते.

चित्र:Bhisma fight in Swayamvara.jpg
अंबा, अंबिकाअंबालिका यांचे अपहरण करताना भीष्म.

मुली मोठ्या झाल्यावर काशीचा राजा त्यांच्या स्वयंवराचे आयोजन करतो. हस्तिनापूरचा राजा विचित्रवीर्य याचा सावत्र भाऊ भीष्म इच्छा असते की त्याचा विवाह अंबा, अंबिका व अंबालिका यांच्याशी व्हावा. मात्र जुन्या वितुष्टामुळे काशीचा राजा हस्तिनापूर साम्राज्याला स्वयंवराचे आमत्रण देत नाही. तेव्हा क्रोधित होऊन भीष्म स्वयंवरात जातो व तेथील उपस्थित राजांना पराजित करून अंबा, अंबिका व अंबालिकाला घेऊन हस्तिनापूरला घेऊन येतो. मात्र अंबाने मनोमन शाल्व राजकुमाराला आपला पती मानले असल्यामुळे विचित्रवीर्य तिला शाल्व राजाकडे पाठवून देतो. मात्र शाल्व राजकुमार तिचा स्विकार करत नाही. भीष्माने स्वयंवरात त्याला हरवून अंबेला जिंकले असल्यामुळे परत तिचा स्विकार करणे त्याला क्षत्रीयधर्माच्या विरोधात आहे असे वाटते.

अशाप्रकारे दोघांनीही तिचा स्विकार न केल्याने ती भीष्माकडे येते. भीष्माने तिला स्वयंवरात जिंकले असल्यामुळे आता त्यानेच तिच्याशी विवाह केला पाहिजे असे तिचे मत असते. पण भीष्माने आजीवन ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली असल्यामुळे तोसुद्धा तिला नकार देतो. यामुळे क्रोधित होऊन अंबा भीष्माला शाप देते की या जन्मात किंवा पुढील जन्मात ती भीष्माच्या मूत्यूचे कारण बनेल.

चित्र:Bhishma refuses to fight with Shikandi.jpg
भीष्म व शिखंडी युद्धात.

पुढील जन्मात अंबा द्रुपद राजाचा मुलगा शिखंडी याच्या रूपात जन्म घेते. महाभारताच्या अंतिम युद्धात भीष्माला मारण्यात शिखंडीचा मोठा हात होता.