संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | स्थिती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | +१.१७१ | सुपर सिक्स मध्ये बढती |
आयर्लंड | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +१.४७९ | |
संयुक्त अरब अमिराती | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -१.१७७ | |
नेदरलँड्स | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.७०९ | ७ ते १०व्या स्थानासाठी ढकलले |
पापुआ न्यू गिनी | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -०.८६५ |
क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८
क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये झिम्बाब्वे येथे पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये २०१९ क्रिकेट विश्वचषक मध्ये सामिल होणारे अंतिम २ संघ ठरवले गेले. ह्या स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज हे दोन अव्वल संघ २०१९ क्रिकेट विश्वचषक साठी पात्र ठरले आणि यजमान (इंग्लंड) व एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धातून विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरलेल्या ७ संघांना सामील होतील. अंतिम सामन्यात अफगाणिस्तानने विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.[१] अफगाणिस्तानाचा मोहम्मद शहजाद सामनावीर [२] तर झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला मालिकावीराचा पुरस्कार दिला गेला.[३]
क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार |
एकदिवसीय क्रिकेट लिस्ट-अ | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | झिम्बाब्वे | ||
विजेते | अफगाणिस्तान (१ वेळा) | ||
सहभाग | १० | ||
सामने | ३४ | ||
मालिकावीर | सिकंदर रझा | ||
सर्वात जास्त धावा | ब्रेंडन टेलर (४५७) | ||
सर्वात जास्त बळी |
सुफियान शरीफ (१७) मुजीब उर रहमान (१७) रशीद खान (१७) | ||
|
योजनेप्रमाणे ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये होणार होती. पण मे २०१७ मध्ये ही स्पर्धा दुसरीकडे खेळविण्याचे ठरले कारण बांग्लादेश विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरला. त्यानुसार ह्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यासाठी झिम्बाब्वे, संयुक्त अरब अमिराती, आयर्लंड आणि स्कॉटलंड या देशांनी बोली लावली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आय.सी.सी) ने ऑक्टोबर २०१७ मध्ये स्पर्धेचे यजमानपद झिम्बाब्वेकडे सुपुर्द केले.[४] जानेवारी २०१८ मध्ये आयसीसीने सामन्यांचे वेळापत्रक व स्थळांची नावे जाहीर केली. स्पर्धेच्या समारोपानंतर, नेदरलँड्स आणि या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या ३ संलग्न सदस्य संघांना २०२२ पर्यंत एकदिवसीय दर्जा देण्यात आला.
पात्र संघ
संपादन२०१५ क्रिकेट विश्वचषकापूर्वीसंमत केलेल्या ठरावानुसार २०१९ क्रिकेट विश्वचषक मध्ये संघांची संख्या १० ठेवण्यात आली आहे. त्यानुसार पात्रतेसाठी नवीन निकष लावले गेले. यात यजमान देश आणि ३० सप्टेंबर २०१७ रोजी असलेल्या क्रमवारीतील एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोच्च ७ संघांना नंतर विश्वचषकात आपोआप प्रवेश मिळेल, तर उर्वरीत २ जागा विश्वचषक पात्रता फेरीच्या अव्वल २ संघांसाठी राखून ठेवल्या जातील. अलीकडील प्रगती पाहून आयसीसीने अफगाणिस्तान व आयर्लंडला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धामध्ये सामील करून घेतले. जून २०१७ मध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंडला कसोटी दर्जा देण्यात आला. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कसोटी खेळणाऱ्या दोन सदस्य देशांना विश्वचषकात खेळण्यापासून मुकावे लागणार आहे.
एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धातील सर्वात खालचे ४ संघ, २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धातील अव्वल ४ संघ आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८तील अव्वल २ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. त्यामुळे किमान २ संलग्न संघ २०१९ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरतील किंवा एकही नाही जर कसोटी संघांनी त्यांना पराभूत केले.
पात्रतेचा मार्ग | तारीख | स्थळ | बर्थ | पात्र संघ |
---|---|---|---|---|
एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा (खालचे ४) | ३० सप्टेंबर २०१७ | अनेक (बदलते) | ४ | |
२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा | ८ डिसेंबर २०१७ | अनेक (बदलते) | ४ | |
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ | १५ फेब्रुवारी २०१८ | नामिबिया | २ | |
एकूण | १० |
योग्यता असलेले संघ
संपादनएकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा : बर्थ
संपादनएकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धातील खालच्या ४ संघांना (स्थान ९ ते स्थान १२) क्रिकेट विश्वचषक पात्रतेत खेळणे भाग आहे. ह्या मार्गाने स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची सुरुवात झाली ती विंडिजच्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभवाने. त्यानंतर अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे संघ ३० सप्टेंबर २०१७ च्या कट-ऑफ तारखेनंतर सहभागी झाले.
२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा : बर्थ
संपादन२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धातील अव्वल ४ संघ क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र ठरतील. सहाव्या फेरीनंतर नेदरलँड्स व पापुआ न्यू गिनी हे संघ पात्र ठरले. तर सातव्या फेरीच्या निष्कर्षानंतर स्कॉटलंड व हाँग काँग आधीच्या २ संघांना येऊन मिळाले.
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ : बर्थ
संपादनआयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८चे विजेता व उपविजेता संघ पात्रता फेरी करता पात्र ठरतील.
संघ
संपादनअफगाणिस्तान | हाँग काँग | आयर्लंड | नेदरलँड्स | पापुआ न्यू गिनी |
---|---|---|---|---|
स्कॉटलंड | वेस्ट इंडीज | झिम्बाब्वे | नेपाळ | संयुक्त अरब अमिराती |
|
सराव सामने
संपादनगट फेरी
संपादनआय.सी.सी ने सामन्यांचे वेळापत्रक जानेवारी २०१८ मध्ये जाहीर केले.
सामन्यांची वेळ भारतीय प्रमाणवेळनुसार (यूटीसी+०५:३०)
गट 'अ'
संपादन ४ मार्च २०१८
१३:३० [ धावफलक] |
वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : जेसन कायला (पा.न्यू.गि.)
- पावसामुळे पापुआ न्यू गिनीला ३१ षटकांत १७५ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- मोहम्मद नावीद (सं.अ.अ.) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.
वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी.
- पावसामुळे नेदरलँड्सला ४१ षटकांत २४३ धावांचे लक्ष्य देण्यात आले
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- टोनी उरा (पा.न्यू.गि) याने पापुआ न्यू गिनीसाठी वैयक्तिक सर्वाधीक धावा काढल्या.
वि
|
||
- नाणेफेक : विंडिज, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : चिराग सुरी (सं.अ.अ.).
- क्रिस गेल (विं) ११ देशांविरुद्ध शतके ठोकणारा जगातील ३रा फलंदाज.
- शिमरॉन हेटमेयर (विं) याने एकदिवसीय सामन्यात पहिले शतक ठोकले.
- केमार रोच (विं) याने एकदिवसीय सामन्यातला १००वा बळी घेतला.
८ मार्च २०१८
१३:३० [ धावफलक] |
वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी
- कार्लोस ब्रेथवेट (विं) याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा पाच बळी घेतले.
- या सामन्याच्या निकालानंतर पापुआ न्यू गिनी सुपर सिक्स फेरीसाठी अपात्र ठरला, प्लेऑफ उपांत्य फेरीत पात्र ठरला.
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
- रोव्हमन पॉवेल (विं) याने पहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले.
- या सामन्याच्या निकालानंतर विंडिज सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरली.
वि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४८ षटकांचा करण्यात आला.
- नेदरलँड्सच्या डावावेळी परत आलेल्या पावसामुळे नेदरलँड्सला २८.४ षटकांत २२२ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- या सामन्याच्या निकालानंतर संयुक्त अरब अमिराती सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरला, तर नेदरलँड्स प्लेऑफसाठी ढकलले गेले.
वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती. गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
- पॉल स्टर्लिंग आणि विल्यम पोर्टरफील्ड यांची पहिल्या गड्यासाठीची २०५ धावांची भागीदारी आयर्लंडची पहिल्या गड्यासाठी केलेली सर्वोच्च भागीदारी होय.
- केव्हिन ओ'ब्रायन (आ) याने ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.
- या सामन्याच्या निकालानंतर आयर्लंड सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरला.
गट 'ब'
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | स्थिती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
झिम्बाब्वे | ४ | ३ | ० | १ | ० | ७ | +१.०३५ | सुपर सिक्स मध्ये बढती |
स्कॉटलंड | ४ | ३ | ० | १ | ० | ७ | +०.८५५ | |
अफगाणिस्तान | ४ | १ | ३ | ० | ० | २ | +०.०३८ | |
नेपाळ | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.८९३ | ७ ते १०व्या स्थानासाठी ढकलले |
हाँग काँग | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -१.१२१ |
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी
- रशीद खान (अ) याने अफगाणिस्तानसाठी कर्णधार म्हणून पदार्पण केले, तर रशीद हा लहान वयातच आंतरराष्ट्रीय संघाचा नेतृत्व करणारा युवा कर्णधार ठरला. (१९ वर्षे, १६५ दिवस)
- कॅलम मॅकलिओड आणि रिची बेरिंग्टन यांनी ३ऱ्या गड्यासाठी केलेली भागीदारी स्कॉटलंडसाठी कोणत्याही गड्यासाठी केलेली सर्वोत्तम भागीदारी होय. (२०८)
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी
- पारस खडका (ने) लिस्ट - अ क्रिकेटमध्ये १,००० धावा काढणारा नेपाळचा पहिलाच फलंदाज ठरला.
- या सामन्याच्या निकालानंतर स्कॉटलंड सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरला.
वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी
- पावसामुळे अफगाणिस्तानला ४६ षटकांत २२६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- हाँग काँगचा आयसीसी संपूर्ण सदस्य देशाविरुद्धचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजयी होय.
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी
- या सामन्याच्या निकालानंतर झिम्बाब्वे सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरला.
वि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी
- लिस्ट - अ पदार्पण : सिमनदीप सिंग (हॉं.कॉं.)
- या सामन्याच्या निकालानंतर अफगाणिस्तान सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरला, तर नेपाळ आणि हाँग काँग प्लेऑफ मध्ये ढकलले गेले.
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- साफयान शरीफ (स्कॉ) याने एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.
प्लेऑफ
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
- या सामन्याच्या निकालानंतर नेपाळने २०२२ पर्यंत एकदिवसीय दर्जा प्राप्त केला, तर पापुआ न्यू गिनीने एकदिवसीय दर्जा गमावला.
वि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी
- या सामन्याच्या निकालामुळे हाँग काँगने एकदिवसीय दर्जा गमावला.
७/८ स्थानासाठी लढत
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी
९/१० स्थानासाठी लढत
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : सिमनदीप सिंग (हॉं. कॉं.)
- हा ४०००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.
सुपर सिक्स फेरी
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती\ | स्थिती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | ५ | ४ | १ | ० | ० | ८ | +०.४७२ | अंतिम सामन्यासाठी पात्र, क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी पात्र ठरले |
अफगाणिस्तान | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | +०.३०२ | |
झिम्बाब्वे | ५ | २ | २ | १ | ० | ५ | +०.४२० | |
स्कॉटलंड | ५ | २ | २ | १ | ० | ५ | +०.२४३ | |
आयर्लंड | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | +०.३४६ | |
संयुक्त अरब अमिराती | ५ | १ | ४ | ० | ० | २ | -१.९५० |
वि
|
||
- नाणेफेक : विंडिज, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : किमो पॉल (विं)
- मोहम्मद नाबी (अ) अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला.
- जेसन होल्डर (विं) विंडिजसाठी सामन्यांच्या बाबतीत एकदिवसीय सामन्यात १,००० धावा पूर्ण करणारा आणि १०० बळी घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला (७४).
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी
- या सामन्याच्या निकालामुळे संयुक्त अरब अमिराती अंतिम फेरी गाठू शकली नाही आणि विश्वचषकाला मुकले.
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, गोलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- शॉन विल्यम्स (झि) याने ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या
- ब्रेंडन टेलर (झि) याने एकदिवसीय सामन्यातले १०वे शतक ठोकले.
- हा पाठलाग एकदिवसीय सामन्यात विंडिजसाठी पाचवा यशस्वी पाठलाग होता.
वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण
- ह्या सामन्याच्या निकालामुळ वेस्ट इंडीज २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र.
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण
- संयुक्त अरब अमिरातीतर्फे १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा शैमन अन्वर हा पहिलाच फलंदाज ठरला.
- संयुक्त अरब अमिरातीचा पूर्ण सदस्याविरुद्ध हा पहिलाच एकदिवसीय विजय.
वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी
- ह्या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
संघांची अंतिम क्रमवारी
संपादनस्पर्धेच्या शेवटी संघांची अंतिम क्रमवारी खालीलप्रमाणे:[१]
स्थान | संघ
|
Result |
---|---|---|
१ले | अफगाणिस्तान | क्रिकेट विश्वचषक, २०१९ साठी पात्र |
२रे | वेस्ट इंडीज | |
३रे | झिम्बाब्वे | |
४थे | स्कॉटलंड | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा, २०२२ पर्यंत कायम |
५वे | आयर्लंड | |
६वे | संयुक्त अरब अमिराती | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा, २०२२ पर्यंत कायम |
७वे | नेदरलँड्स | |
८वे | नेपाळ | २०२२ पर्यंतसाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा मिळवला |
९वे | पापुआ न्यू गिनी | विभाग दोनमध्ये पाठवले आणि एकदिवसीय दर्जा गमावला |
१०वे | हाँग काँग |
टीप: इतर संघाचा एकदिवसीय दर्जा २०२२ पर्यंत कायम
संदर्भ
संपादन- ^ a b "अफगाणिस्तानला आयसीसी क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचे विजेतेपद". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "मुजीब, शाहझादमुळे अफगाणिस्तानची विजेतेपदासह स्वप्नवत कामगिरी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा सामनावीर: सिकंदर रझा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "२०१८ च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेचे यजमानपद झिम्बाब्वे कडे" (इंग्रजी भाषेत).
- ^ "विंडिजवर पात्रता फेरी खेळण्याची नामुष्की".