क्वीन्स स्पोर्ट्स क्लब
(क्वीन्स स्पोर्ट्स क्लब या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब हे बुलावायो, झिम्बाब्वे येथील एक मैदान आहे. मुख्यतः ते क्रिकेट स्पर्धांसाठी वापरले जाते. मैदानाची कमाल प्रेक्षकक्षमता १३,००० इतकी आहे. वर्तमान लोगान स्पर्धेचे विजेते माताबेलेलॅंड टस्कर्स या टीमचे ते घरचे मैदान आहे. बुलावायोमध्ये बुलावायो ॲथलेटिक क्लब हे आणखी एक क्रिकेटचे मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | पार्क व्ह्यू, बुलावायो |
स्थापना | १८९० |
आसनक्षमता | १२,४९० |
मालक | बुलावायो नगर परिषद |
प्रचालक | झिम्बाब्वे क्रिकेट |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
२०-२४ ऑक्टोबर १९९४: झिम्बाब्वे वि. श्रीलंका |
अंतिम क.सा. |
१-५ नोव्हेंबर २०११: झिम्बाब्वे वि. न्यू झीलंड |
प्रथम ए.सा. |
१५ डिसेंबर १९९६: झिम्बाब्वे वि. इंग्लंड |
अंतिम ए.सा. |
२४ ऑक्टोबर २०१५: झिम्बाब्वे वि. अफगाणिस्तान |
प्रथम २०-२० |
११ मे २०१३: झिम्बाब्वे वि. बांगलादेश |
अंतिम २०-२० |
१२ मे २०१३: झिम्बाब्वे वि. बांगलादेश |
यजमान संघ माहिती | |
माटाबेलेलॅंड टस्कर्स (२००९ - सद्य) | |
शेवटचा बदल २५ जुलै २०१६ स्रोत: ईएस्पीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
हरारे स्पोर्ट्स क्लबनंतर क्वीन्स स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वेमधले दुसरे मैदान आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागात असून आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट्साठीच्या अतिशय सुंदर अशा मैदानांपैकी एक समजले जाते. ह्याचे जुने पॅव्हेलियन वृक्षांनी वेढलेले आहे, त्यामुळे मैदानातील प्रेक्षकांना सावली मिळते. ऑक्टोबर १९९४ मध्ये क्वीन्स स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वेचे तिसरे कसोटी ठिकाण बनले.