सोमपाल कामी

नेपाळी क्रिकेटपटू (जन्म १९९६)

सोमपाल कामी (२ फेब्रुवारी, १९९६:तुरांग, गुल्मी जिल्हा, नेपाळ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

हा नेपाळ प्रीमियर लीगमध्ये जगदंबा जायंट्स या संघाकडून खेळतो.

हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १६ मार्च, २०१४ रोजी हाँग काँगचा ध्वज हाँग काँगविरुद्ध खेळला.

बाह्य दुवे

संपादन