इ.स. १९७८
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ.स.१९७८ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९७५ - १९७६ - १९७७ - १९७८ - १९७९ - १९८० - १९८१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मार्च १ - स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
- एप्रिल १९ - लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- एप्रिल २० - सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एर फ्लाइट ९०२ हे बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
- एप्रिल २८ - अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद दाउद खानची हकालपट्टी व हत्या.
- मे १ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.
- मे १२ - झैरमध्ये अतिरेक्यांनी कोल्वेझी शहर जिंकले.
- मे १५ - नौरूच्या अध्यक्ष लागुमॉट हॅरिसचा राजीनामा.
- जून ९ - मॉर्मोन चर्चने श्यामवर्णीय पुरूषांना पादरी होण्याची परवानगी दिली.
- जून १९ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.
- जून २२ - प्लुटोचा उपग्रह खारॉनचा शोध लागला.
- जून २६ - एर कॅनडा फ्लाइट १८९ हे डी.सी.९ प्रकारचे विमान टोरोंटो येथे उड्डाण करताना कोसळले. २ ठार.
- जून २८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालीन प्रवेशप्रक्रियेत आरक्षण बेकायदा ठरवले.
- जून ३० - अमेरिकेच्या संविधानातील २६वा बदल संमत. मतदानाचे वय १८ वर्षे.
- जुलै ७ - सोलोमन आयलॅंड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- जुलै १० - मॉरिटानियात लश्करी उठाव.
- जुलै ११ - स्पेनमध्ये प्रवाहीकृत वायू घेउन चाललेल्या ट्रकला अपघात. २१६ ठार.
- जुलै २५ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊनचा इंग्लंडमधील लॅंकेशायर येथे जन्म.
- नोव्हेंबर १८ - जोन्सटाउन दुर्घटना - गयानाच्या जोन्सटाउन शहरात जिम जोन्सने आपल्या पीपल्स टेम्पल या पंथाच्या लोकांना विष पिउन आत्महत्या करण्यास सांगितले.
- डिसेंबर २७ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.
जन्म
संपादन- मे १२ - थॉमस ओडोयो, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १० - क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २९ - मोहिनी भारद्वाज, अमेरिकन जिम्नॅस्ट.
मृत्यू
संपादन- एप्रिल २८ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- मे ९ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान.
- जून ७ - रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- जून १२ - गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
- जून २८ - क्लिफर्ड ड्युपॉॅंट, ऱ्होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १० - जॉन डी. रॉकफेलर तिसरा, अमेरिकन उद्योगपती.
- सप्टेंबर २८ - पोप जॉन पॉल पहिला.
- नोव्हेंबर २७ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
- डिसेंबर ८ - गोल्डा मायर, इस्रायलची पंतप्रधान.