सप्टेंबर २४
दिनांक
(२४ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६७ वा किंवा लीप वर्षात २६८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
सातवे शतकसंपादन करा
- ६२२ - मोहम्मद पैगंबरने मक्केहून मदिनाची हिजरत पूर्ण केली.
सतरावे शतकसंपादन करा
- १६६४ - नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे न्यू यॉर्क) इंग्लंडच्या हवाली केले.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८४१ - ब्रुनेईने सारावाक इंग्लंडच्या हवाली केले.
- १८६९ - जे गूल्ड आणि जेम्स फिस्कने संगनमत करून रचलेला सोन्याचा बाजार हस्तगत करण्याचा कट उधळून लावण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटने सरकारी तिजोरीतून सोने विकण्याचा हुकुम दिला. सोन्याचा भाव कोसळला.
- १८७३ - महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- १८९० - मोर्मोन चर्चने बहुपत्नीत्त्वाची प्रथा अमान्य केली.
विसावे शतकसंपादन करा
- १९०३ - एडमंड बार्टनने राजीनामा दिल्यावर आल्फ्रेड डीकिन ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९४८ - हॉन्डा मोटर कंपनीची स्थापना.
- १९५० - न्यू इंग्लंड आणि कॅनडात लागलेल्या वणव्यांनी त्या भागातील आकाश झाकोळून टाकले. काही दिवस सूर्यप्रकाश सुद्धा जमीनीवर पोचू शकत नव्हता.
- १९५७ - वर्णभेदाचा पुरस्कार करणाऱ्या जमावाविरुद्ध लिटल रॉक, आर्कान्सा येथे १०१वी एरबॉर्न डिव्हिजन तैनात.
- १९६२ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मिसिसिपी विद्यापीठाला श्यामवर्णीय विद्यार्थी जेम्स मेरेडिथला दाखल करून घेण्यास फर्मावले.
- १९७३ - गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९३२ - पुणे करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
- १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००५ - हरिकेन रिटा हे चक्रीवादळ अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या बोमॉँट शहराजवळ समुद्रातून किनाऱ्यावर आले. या वादळाने बोमॉँट शहर व जवळ असलेल्या नैऋत्य लुईझियानामध्ये अतोनात नुकसान केले.
- २००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
- २०१३ - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.
- २०१५ - सौदी अरेबियाच्या मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरी होउन ७१७ ठार तर ८००पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्या.
जन्मसंपादन करा
- १५ - व्हिटेलियस, रोमन सम्राट.
- १९१५ - प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.
- १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.
मृत्यूसंपादन करा
- ३६६- पोप लायबेरियस.
- १९९२ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
- २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, - शब्दकोशकार, अनुवादक.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर महिना