सप्टेंबर १९
दिनांक
(१९ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६२ वा किंवा लीप वर्षात २६३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८९३ - न्यू झीलँडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
विसावे शतक
संपादन- १९४४ - सोवियेत संघ आणि फिनलंडमध्ये संधी.
- १९५२ - इंग्लंडला गेलेल्या चार्ली चॅप्लिनला अमेरिकेने परतण्यास मुभा नाकारली.
- १९५७ - अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
- १९५९ - अमेरिकेने निकिता ख्रुश्चेव्हला डिस्नीलँड बघण्यास मनाई केली.
- १९७६ - तुर्कस्तानचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान देशाच्या दक्षिण भागात डोंगरांत कोसळले. १३५ ठार.
- १९८३ - सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य.
- १९८५ - मेक्सिको सिटीमध्ये भूकंप. ४०० इमारती कोसळल्या, हजारो मृत्युमुखी.
- १९८९ - यु.टी.ए. फ्लाइट ७७२ या विमानात दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा विमान नायजरवर असताना स्फोट. १७१ ठार.
एकविसावे शतक
संपादन- २००७ - ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेट खेळाडू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.
जन्म
संपादन- ८६ - अँटोनियस पायस, रोमन सम्राट.
- ८६६ - लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट.
- १५५१ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
- १९११ - सर विल्यम गोल्डिंग, नोबेल पुरस्कार विजेते ब्रिटिश लेखक.
- १९२७ - डिक वेस्टकॉट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - वेन क्लार्क, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - नईमुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३३९ - गो-दाइगो, जपानी सम्राट.
- १७१० - ओले ऱ्यॉमर (Ole Rømer), डॅनिश खगोलशास्त्रज्ञ.
- १८८१ - जेम्स गारफील्ड, अमेरिकेचा २०वा राष्ट्राध्यक्ष.
- १९३५ - कॉन्स्टान्टीन त्सियाल्कोव्स्की, रशियन रॉकेटशास्त्रज्ञ.
- १९३६ - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.
- १९८७ - आयनार गेऱ्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान.
- २००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
- २००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
- २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- सेना दिन - चिले.
- स्त्री मतदान हक्क दिन - न्यू झीलँड.
- स्वातंत्र्य दिन - सेंट किट्स आणि नेव्हिस.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर महिना