श्रीपाद दामोदर सातवळेकर

(पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर (सप्टेंबर १९, इ.स. १८६७ - जुलै ३१, इ.स. १९६८) हे मराठी चित्रकार, संस्कृत पंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान, वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार व मराठी लेखक होते. चित्रकार माधव सातवळेकर त्यांचे पुत्र होते.

श्रीपाद दामोदर सातवळेकर
पूर्ण नावश्रीपाद दामोदर सातवळेकर
जन्म सप्टेंबर १९, इ.स. १८६७
कोलगाव, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जुलै ३१, इ.स. १९६८
पारडी, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र वेदाभ्यास, चित्रकला
प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
वडील दामोदर सातवळेकर
आई लक्ष्मीबाई सातवळेकर
पत्नी सरस्वतीबाई सातवळेकर
अपत्ये नारायण सातवळेकर,
वसंत सातवळेकर,
माधवराव सातवळेकर

वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ’वैदिक राष्ट्रगीत’ आणि ’वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’ या नावाचे लेख लिहिले होते. या दोन लेखांसाठी सातवळेकरांना इंग्रज सरकारने कारावासात धाडले.

धर्म विषयक विचारसंपादन करा

धर्माला मर्यादा नाही. जेथे मानव तेथे धर्म आहे. वेद-उपनिषदे –रामायण-महाभारत या ग्रंथात दिसणारी आपली संस्कृती जगावर प्रभाव पाडणारी आहे. ती जागती ठेवणे आवश्यक आहे.उपनिषदातील विचार प्रत्येक अवस्थेत मनुष्याला शांती, श्रेष्ठ आनंद व असीम धैर्य देतात.[१]

प्रकाशित साहित्य (एकूण सुमारे ४०० पुस्तकांमधली काही)संपादन करा

  • अथर्व वेद संहिता
  • आजच्या व्यवहारात वैदिक ज्ञानाची उपयुक्तता
  • आमची परळीची यात्रा
  • आरोग्य खंड
  • आरोग्यासाठी योगसाधन
  • ऋग्वेद संहिता
  • ईश उपनिषद
  • एकादशी उपवास आणि स्वास्थ्य (माहितीपर)
  • एकादशीचा उपवास
  • गीता खंड (अनेक भाग)
  • गृहस्थाश्रम
  • जीवनप्रकाश
  • दीर्घजीवन आणि आरोग्य
  • पुरुषार्थ प्रबोधिनी
  • पौराणिक गोष्टींचा उलगडा
  • प्रभातफेराची पदे, मनाचे श्लोक
  • बालकोंकी धर्मशिक्षा (हिंदी)
  • ब्रह्मचर्य हेंच जीवन
  • ब्रह्मविद्या प्रकरण
  • श्रीमद्‌भगवद्‌गीता
  • भगवद्गीता-निबंधमाला (अनेक भाग)
  • भारतीय संस्कृती (५० लेखांचा संग्रह)
  • मंगलमूर्ति श्री गणेश
  • मनुष्यांचे आयुष्य
  • मातृभूमि आणि स्वराज्यशासन
  • मेघाजनन, संगठन, विजय
  • योगसाधनेची तयारी
  • श्री रामायण महाकाव्य (अनेक भाग)
  • विद्यार्थी व त्यांचे आरोग्य
  • वेदकालीन समाजदर्शन (१२ पुस्तकांची मालिका)
  • वेदातील देवमंत्रांची ’दैवतसंहिता’
  • वेदामृत
  • वैदिक धर्म खंड (अनेक भाग)
  • वैदिक संस्कृतीचे स्वरूप
  • श्लोकार्धसूची
  • संध्या
  • संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)
  • सामवेद
  • स्पर्शास्पर्श

बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २)संपादन करा

या पुस्तिकांमध्ये माणसाच्या घडणीसाठी उपयुक्त असे विचार पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहेत आणि मुलांनी ते विचार पाठ करावेत असे त्यांनी सुचविले आहे.पण ते केवळ पाठांतर न होता, त्याचा आशय समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे या हेतूने या पुस्तिकांमध्ये त्या विचारांचा अर्थही जाणीवपूर्वक दिला आहे. तो समजला तर त्यानुसार आचरण करून स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करणे लहान वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना सोपे जाईल असा भाव यामध्ये नोंदविला आहे. मननाशिवाय नुसता शब्दोच्चार हा शब्दांचा ‘गोंगाट ‘ होईल . त्यामुळे त्या मननातून आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे” या हेतूने या पुस्तिकेमध्ये जे विचार दिले आहेत त्यांचे भाषांतर आणि आशय आवर्जून नोंदविले आहेत. प्रथम भागामध्ये प्रामुख्याने तैत्तिरीय उपनिषदातील विचारांचा समवेश आहे. त्याजोडीने यजुर्वेद आणि अथर्ववेद संहितेतील अनुक्रमे एकेक मंत्र समाविष्ट आहे. द्वितीय भागात, ऋग्वेद, यजुर्वेद या संहितांमधील,ऐतरेय ,शतपथ , गोपथ या ब्राह्मण ग्रंथातील , ईश, केन, कठ, बृहदारण्यक,श्वेताश्वतर या उपनिषदातील निवडक सुवचनांचा समावेश केलेला आहे. मुलांसाठी धर्म-शिक्षण असे म्हणत असताना धर्म म्हणजे संपूर्ण मानवी जीवनाचा एक विशेष प्रकारचा उच्च दृष्टीकोण. शिक्षण असे म्हणत असताना पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहे – नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य भारतीय अध्यात्मविद्येत आहे. वेदाने ते सांगितले आहे म्हणून ते अंतिम आहे असे मी मानीत नाही. ते मूळ आहे. सर्वानी त्यात वाढ करायची आहे आणि व्यक्ती-समाज-राष्ट्र उन्नतीचा मार्ग म्हणून त्यातील बोधही पहायचा आहे. [२]

पंडित सातवळेकरांवरील पुस्तकेसंपादन करा

वेदव्यास पं सातवळेकर (पु.पां. गोखले)कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ सातवळेकर श्री.दा.,१९५२,भारतीय संस्कृती (पूर्वार्ध) स्वाध्याय मंडळ , पारडी.
  2. ^ बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २) पं. सातवळेकर श्रीपाद, स्वाध्याय मंडळ पारडी.