जेम्स गारफील्ड
जेम्स एब्राम गारफील्ड (इंग्लिश: James Abram Garfield) (१९ नोव्हेंबर, इ.स. १८३१ - १९ सप्टेंबर, इ.स. १८८१) हा अमेरिकेचा २०वा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८८१ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून १९ सप्टेंबर, इ.स. १८८१ रोजी शार्ल गीतो नावाच्या हल्लेखोराने याची हत्या करेपर्यंत अवघ्या २०० दिवसांएवढा अल्पकाळ हा राष्ट्राध्यक्षपदावर होता. पदारूढ असताना हत्या झालेल्या चार अमेरिकी राष्ट्राध्यक्षांपैकी हा दुसरा होता. राष्ट्राध्यक्ष बनण्याअगोदर हा सलग ९ वेळा ओहायोच्या १९व्या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून अमेरिकन प्रतिनिधिगृहात निवडून गेला होता.
जेम्स एब्राम गारफील्ड | |
सही |
---|
गारफिल्डाच्या अध्यक्षीय कारकिर्दीत शासनातील कार्यकारी यंत्रणेतल्या पदनियुक्त्यांसाठी अमेरिकन सेनेटपेक्षा अध्यक्षीय मतास प्राधान्य देण्याचा वादग्रस्त पायंडा रूढ झाला. त्याने अमेरिकी नौदलाच्या पुनर्रचनेस चालना दिली. राष्ट्रीय कर्जफेडीची समस्या पुढ्यात ठाकली असताना, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची वेळ न येऊ देता त्याने अमेरिकी अर्थव्यवस्थेस सोडवले.
बाह्य दुवे
संपादन- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2011-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी १२, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "जेम्स गारफील्ड: अ रिसोर्स गाइड (जेम्स गारफील्ड: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |