सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा १२
साहाय्य विनंती
संपादन@Nitin.kunjir: @V.narsikar: @संतोष दहिवळ: @अभय नातू:
एका हिंदी विकिपीडियन ने बदल केल्या नंतर साचा:संकेतस्थळ स्रोत मध्ये काही गोंधळ झालेला दिसतो. ते साचा पान सार्वजनिक उपयोगासाठी अत्यंत सुलब्ध होते त्याची लिंक विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून पानात होती आणि विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून चा संदर्भ साहाय्य पान म्हणून साईट नोटीसवरुन जातो. यास नवागत सदस्यांना समजेअल असे रिस्टोअर करण्यात मदत करावी हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५२, २१ जानेवारी २०१७ (IST)
- @Nitin.kunjir: @Mahitgar: @अभय नातू:
- केले -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:२०, २१ जानेवारी २०१७ (IST)
- खूप खूप धन्यवाद मला वाटते नविन सदस्यांपासून त्या साचास सुरक्षीत करावे.
- ````
- @संतोष दहिवळ: @Mahitgar: @अभय नातू:
नवीन सदस्यांपासून साच्यास सुरक्षित करण्याच्या संतोष दहिवळ यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण असे साचे बर्याच लेखांशी जोडलेले असतात. - --नितीन कुंजीर (चर्चा) १३:१३, २३ जानेवारी २०१७ (IST)
- @Nitin.kunjir: @Mahitgar:
- नितिन,
- साच्याला सुरक्षित करण्याचे मत मी मांडलेले नाही. सदस्य:Mahitgar यांनी वर तसे मत मांडलेले दिसतेय पण त्याखाली त्यांची सही नसल्याने तुमचा तसा समज झाला असावा.
- धन्यवाद -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:१८, २५ जानेवारी २०१७ (IST)
- @संतोष दहिवळ: @Mahitgar: @अभय नातू:
@Mahitgar:,@अभय नातू:,@Nitin.kunjir:, @Abhijitsathe:, @संतोष दहिवळ:,@Salveramprasad:, @ज:
काही दिवस मी विकिसुटीवर आहे.कालावधी नक्की नाही. बरेच दिवस झाले सतत कामच सुरु आहे. थोडे relax व्हायचे म्हणतो. अधूनमधून जसे जमेल तसे व संगणक/लॅपटॉप यांचे उपलब्धतेनुसार,येथे चक्कर तर मारीलच.
- काही कामे मनात होती व ती बाकी आहेत. एकतर काही विभाग,(मॉड्यूल) ते नीट काम करीत नाहीत.त्यांना तपासायला हवे. त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे सर्व साचेही काम करीत नाहीत/पार्स करीत नाहीत. सध्या येथे जूनी पद्धत व नवी पद्धत यांचे मिश्रण आहे. नेमकी कोणती पद्धत वापरावी व त्यांची कारणे काय? याचा उहापोह व्हावयास हवा असे वाटते. विशेषतः, विभाग-मेसेजबॉक्स , व त्याची उपपाने, विभाग-Protection Banner व त्याची उपपाने इत्यादी पण विशेषत्वाने तपासावयास हवेत. मी बराच प्रयत्न केला पण चूक सापडली नाही.त्यासाठी कालही बराच वेळ खर्ची घातला. असो.
दुसरे असे कि, ज्याप्रमाणे विभाग/साचे अद्ययावत होत आहेत, तद्वतच वर्ग पण होत आहेत. जे जूने पूर्वापार वर्ग सुरू आहेत ते बरेच बदलले आहे, त्यांची वर्णने बदलली आहेत, त्यांना बऱ्याच फांद्यापण फुटल्या आहेत.त्याबद्दलही विचारविनीमय व्हावयास हवा.
लेख बनविण्यासोबतच लगोलग त्याचे विकिडाटा कलमही अद्ययावत् करावयास हवे म्हणजे नंतर त्रास होत नाही. ते गौण दिसत असले तरीपण महत्त्वाचे काम आहे.
कोणासही, जसा वेळ मिळेल तसा, वर्ग-त्रुट्यांचे वर्ग याकडेही लक्ष्य द्यावे. त्यातील लेख कमीत-कमी व्हावयास हवेत असा उद्देश आहे. सांगकाम्यातर्फे ती कामे करता येऊ शकतात. जसे 'वर्ग-चुकीचे संरक्षण साचे लावलेली पाने' यात २०० च्यावर पाने आहेत. ती काढता येतील.
हे लेखन 'आपला विकि सर्वांगसुंदर कसा व्हावा' याच तळमळीने लिहीले आहे. त्याचा उद्देश इतकाच आहे.इतर कोणताही नाही. कृपया गैरसमज करू नये ही विनंती.पूर्वीच धन्यवाद देतो.
--वि. नरसीकर (चर्चा) ०७:४६, २३ जानेवारी २०१७ (IST)
येथे विनाकारण गोष्टींमध्ये गुंतण्यापेक्षा, येथील संपादनांवर लक्ष केंद्रीत केले तर आपण बरीच मजल मारू शकता. आपल्या जिद्दीला कन्सट्रक्टिव्ह अॅप्रोच मध्ये बदला. त्याचा आपले जीवनात व इतरत्रही फायदाच होईल. हा माझा अनाहूत सल्ला आहे. माझ्या सदैव शुभेच्छा आहेतच. अतिशय निकडीचे असेल तरच इतरांना संदेश द्यावा. त्यांचा, आपला, व पर्यायाने विकिचा वेळ वाया घालवू नये. चर्चापानावरची संपादने विकिच्या कन्सट्रक्टिव्ह कामात लावली तर? --वि. नरसीकर (चर्चा) ०७:५५, २३ जानेवारी २०१७ (IST)
- नरसीकरजी,
- थोडा आराम करुन नव्या दमाने परत लवकरच याल अशी आशा/अपेक्षा.
- अभय नातू (चर्चा) ०७:५८, २३ जानेवारी २०१७ (IST)
Yogeshs यांचा संदेश
संपादन_/\_ आलोच शून्य मिनिटात ....:)
Yogeshs (चर्चा) २१:०६, २१ मार्च २०१७ (IST) @ वि. नरसीकर, आपण केलेली विनंती अतिशय योग्य आहे. Yogeshs (चर्चा) १९:५७, २१ मार्च २०१७ (IST)
चर्चा:अमन लॉज रेल्वे स्थानक: या लेखात माहितीचौकट ही वरचे बाजूस हवी.--वि. नरसीकर (चर्चा) १६:३३, २१ मार्च २०१७ (IST)
आपण सुचविलेला बदल योग्य आहे. हा बदल होत नाहीये. कृपया आपण हा बदल केल्यास मदत होईल. धन्यवाद.
सदस्य:Yogeshs १७:०८, २१ मार्च २०१७ (IST)
ताजी बातमी
संपादनता. क.(जाता -जाता) - कृपया हा दुवा बघावा . त्यात पानाचे खालचे बाजूस ' इंटरनेटवर मराठी मजकूर अपलोड करा' या मथळ्याची बातमी वाचावी ही विनंती.
--वि. नरसीकर (चर्चा) ०८:३४, २३ जानेवारी २०१७ (IST)
चर्चा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके येथे आपण केलेली सुचना अशी आहे. "हा लेख पूर्ण झाल्यानंतर तशी सूचना चर्चा पानावर टाकावी म्हणजे काही स्थानकांच्या नावांत असणाऱ्या चुका दुरुस्त करता येतील".
परंतु अशी सुचना यापुर्वीच लेखकाने चर्चा पानावर चुका या सदरात केलेली आहे. आपणास नम्र विनंती आहे की पान 'व्यवस्थित' वाचुन सुचना करव्यात.
मराठी विकिपीडियावर बोलीभाषेतील लेखन
संपादन- विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#मराठी विकिपीडियावर बोलीभाषेतील लेखन चर्चेत सहभाग घ्यावा. शैक्षणिक ( अकॅडेमिक) विषय जसे कि गणित, विज्ञान, लेखा (अकाऊंट), व्यवस्थापन (मॅनेजमेंट), अशा प्रॅक्टीकल विषयांबद्दल एक-ते दोन परिच्छेद (पॅरेग्राफ) लेखन करणे बोलीभाषिकांसाथी प्रॅक्टीकली जास्त उपयोगी सिद्ध होईल. असे वाटते.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:५७, २५ जानेवारी २०१७ (IST)
अभिनंदन
संपादनटायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देत आहे. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हिमस्खलन, प्रता, अवसरण, इ.
संपादनहिमावसरण हा फार चांगला शब्द आहे, पण हिमस्खलन रूढ असल्याने वापरावा असे वाटते.
सरकारी कोशात हिमप्रपात असा शब्द दिला आहे. त्या कोशात दिल्याप्रमाणे, हिमपात किंवा हिमवर्षा म्हणजे snowfall आणि हिमप्रपात म्हणजे Avalanche किंवा Icefall; जलप्रपात म्हणजे waterfall, वगैरे. Glacierlला अर्थात हिमनदी हा शब्द दिला आहे. त्या कोशात हिमस्खलन आणि हिमावसरण हे दोन्ही शब्द नाहीत.
असे असले बर्फावा एखाद-दुसरा कडा कोसळणे याला हिमस्खलन हा शब्द योग्य वाटतो. पण हिमनदीतून एकापाठोपाट बर्फाचे खडक कोसळत असतील तर हिमप्रपात चालावा. (प्रपात म्हणजे धबधबा).
मराठीत अनेकवचनासाठी खालील नियम आहेत :
- आ-कारान्त पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन ए-कारांत होते. उदा० पिता-पिते, आत्मा-आत्मे, कोल्हा-कोल्हे, रस्ता-रस्ते, चुलता-चुलते, भाचा-भाचे, आजा-आजे, पुतण्या-पुतणे वगैरे. अपवाद - काका, मामा, दादा यांची अनेकवचनी रूपे काका, मामा, दादा अशीच होतात. असे असले तरी, अनादर दाखवण्यासाठी काके-मामे-बापदादे अशी अनेकवचने होतात. तुमचे बापदादे कधी घोड्यावर बसले होते का?. तुमचे काम विनामोबदला करायला हे कोण तुमचे काके मामे लागून राहिलेत का?
वडील आणि आजोबा या आदरार्थी अनेकवचनी शब्दांना एकवचन नाही.
- आ-कारान्त सोडून अन्य पुल्लिंगी शब्दांचेीकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. उदा० देव, स्तंंभ, खांब, सुतार, उंदी्र, दगड (अ-कारान्त); कवी, अग्नी, पक्षी, न्हावी, कोळी, धोबी (ई-कारान्त), हेतू, शत्रू, पेरू, लाडू, भाऊ (ऊ-कारान्त), टाहो, खोखो, फोटो, फोनो (ओ-कारान्त) हे शब्द अनेकवचन होताना तसेच राहतात.
स्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने :
- संस्कृत शब्द : अस्त्रविद्या, फलाशा, पाठशाला, चालीरीती, भीती, नारी, सुवासिनी आपत्ती, कृती, वधू या शब्दांचे अनेकवचन होताना मूळ शब्दात बदल होत नाही. अपवाद - नदी-नद्या, स्त्री-स्त्रिया, मादी-माद्या.
- मराठी शब्द : पाच प्रकार - १. माती-माती, रेती-रेती, गर्दी-गर्दी, सर्दी-सर्दी; २. भाकरी-भाकर्या, काठी-काठ्या, बी-बिया, भुवई-भुवया ३. वीट-विटा, चिंच-चिंचा. सून-सुना, ४.. भिंत-भिंती, वाघीण-वाघिणी, जात-जाती; ५. सासू-सासवा, जाऊ-जावा, पिसू-पिसवा वगैरे.
तेव्हा आपत्तीचे अनेकवचन आपत्ती हेच बरोबर, आपत्त्या नाही. ... ज (चर्चा) १५:३७, ३० जानेवारी २०१७ (IST)
- ज यांच्या वरील विवचनाशी सहमत. वर्गाचे नाव बदलावे.
- अभय नातू (चर्चा) १०:०८, ३१ जानेवारी २०१७ (IST)
अध्यक्षा वगैरे
संपादनअध्यक्ष, राष्ट्रपती, ग्रंथपाल इत्यादींची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे अध्यक्षा, राष्ट्रपत्नी, ग्रंथपालिका अशी होत नाहीत, निदान अशी करू नयेत. ‘मास्तरीण’प्रमाणे अध्यक्षीणबाई होईल, पण अध्यक्षा होऊ नये. ग्रंथपालचे पुल्लिंग ग्रंथसरडा होत नाही; माशीचे पुल्लिंग माशा किंवा मासा होत नाही; सशाचे स्त्रीलिंग सशी होत नाही. निष्कर्ष असा की प्रत्येक पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंग होतेच असे नाही, आणि प्रत्येक स्त्रीलिंगी शब्दाला पुल्लिंग असतेच असे नाही. ... ज (चर्चा) १६:३६, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)
@ज: खूपच छान. वाचुन करमणूकही झाली, विशेषत्वाने, ग्रंथपाल-ग्रंथसरडा . नेहामीप्रमाणेच आभारी आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १६:४१, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)
- ग्रंथपालचे पुल्लिंग ग्रंथसरडा होत नाही
- @ज: :-D :-D :-D
- अभय नातू (चर्चा) २०:२८, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)
मांग
संपादनमांग हा मराठी लेख माझ्याकडून अंग्रेजी लेख Mang (Cast) ऐवजी Mang या लेखाशी जोडला गेलाय. कृपया तो तेथून हटवून Mang (Cast) लेखाशी जोडा. संदेश हिवाळे (चर्चा) ११:५५, ११ फेब्रुवारी २०१७ (IST)
अद्वैत
संपादनद्वैत समजलो, अद्वैत दिसे मज |
काल पडली भवसागरी या उमज ।|
बुद्धीभेद दूर अचानक जाहला |
नमस्कार माझा शिरसा गुरूला ||
(अर्थ: ज्याला आजवर दोन समजत होतो तो एकच आहे असे दिसले. या भवसागरात मला काल ते उमजले. माझा बुद्धीभ्रम अचानक दूर झाला. (ज्या गुरूमुळे हे घडले) त्याला माझा शिरसाष्टांग नमस्कार.)
सहज सुचले म्हणून.--वि. नरसीकर (चर्चा) १५:११, १३ फेब्रुवारी २०१७ (IST)
शुभेच्छा
संपादनव्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार V.narsikar, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
सांगकाम्या
संपादन@संतोष दहिवळ: @अभय नातू: @Mahitgar: वर्ग:अवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने, या वर्गात असणारी पाने ही सांगकाम्या लावून दुरुस्त करता येतील काय? सदस्य:WOSlinker व मी आज केलेली संपादने कृपया बघावित ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) १०:३४, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
- कोणती खूणपताका अवैध आहे हे कळल्यास बघता येईल. दर वेळी करता येईल का नाही हे प्रत्येक टॅगवर अवलंबून असेल. वरील पान बघतो.
- अभय नातू (चर्चा) २०:१२, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
- नको, सध्याच नको. मी संदेश टाकल्यावर सदस्य:WOSlinker महोदय यांनी तशी बरीच संपादने केलीत. ते काम बऱ्याच वेगात करीत आहेत. मला वाटते, ५-६ दिवसांत ते आपले काम आटोपतील. करु द्या त्यांना. आपला वेळ अधिक विधायक कामात वापरता येईल.धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) २२:०५, २० फेब्रुवारी २०१७ (IST)
मराठी भाषा गौरव दिन
संपादनगौरव हा शब्द मी चुकीची लिहिली परंतु तुम्ही त्याला दुरुस्त केल्याबद्दल आभार. गैरसोयीबद्दल क्षमस्व...--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:५७, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)
मराठी भाषा गौरव दिन
संपादननमस्कार नर्सीकर जी, आपल्या संदेशाबद्दल धन्यवाद, आपला लोभ असाच असावा - राहुल देशमुख १८:०२, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)
चर्चेसाठी संपर्क
संपादननमस्कार, मला आपल्याशी महत्वाची चर्चा करायची आहे. मला subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवून संपर्क करावा हि नम्र विनंती.
सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२२, ६ मार्च २०१७ (IST)
साचा:माहितीचौकट चित्रपट
संपादनसाचा:माहितीचौकट चित्रपट यात भाषेत काही गडबड आहे double येते ते.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३२, ९ मार्च २०१७ (IST)
- @Tiven2240:उदाहरण देता येईल काय? यात अभयनी काही बदल केलेले आहेत. त्यांनाच विनंती करावी असे वाटते.--वि. नरसीकर (चर्चा) १६:५५, ९ मार्च २०१७ (IST)
लायन (२०१७ चित्रपट) आणि तू माझा जीव पहा. -टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:००, ९ मार्च २०१७ (IST)
- @Tiven2240:मूळ साच्यात भाषा१,भाषा२,भाषा३,भाषा४ असे बदल करावे लागतील असे माझे मत आहे.पण एक प्रोटोकॉल म्हणून अभय नातूंनाच ते करु द्यावे.कारण त्यांनी केलेले बदलात मी फेरफार करणे बरोबर नाही.आपण त्यांनाच विनंती करावी.--वि. नरसीकर (चर्चा) १७:१६, ९ मार्च २०१७ (IST)
Ok तुमचे वेळ देण्यास धन्यवाद--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:१८, ९ मार्च २०१७ (IST)
भारतीय संस्कृतीतील संख्या संकेत
संपादनअयने हेच योग्य. अयन म्हणजे शास्त्र (उदा० रंगायन, ज्योति़षायन), मार्ग, काळ, कक्षा, सहा महिन्यांचा काळ, वगैरॆ.... ज (चर्चा) २२:४६, १३ मार्च २०१७ (IST)
- @ज:आभारी आहे.--वि. नरसीकर (चर्चा) ०९:२२, १४ मार्च २०१७ (IST)
गुढीपाडवाचे शुभेच्छा!
संपादन
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे..!! 💐💐💐💐💐💐💐💐
|
|
संदर्भ हवा साचा
संपादननरसीकरजी,
आपण साचा:संदर्भ हवा यात अलीकडे काही बदल केलेले पाहिले. हा साचा लावलेल्या पानावर Pages with template loops असा वर्ग येत आहे. आपण केलेल्या बदलांमुळे तर असे झाले नाही ना याची खात्री करावी ही विनंती.
धन्यवाद.
सोशल मीडिया
संपादनसर आपले मत विकिपीडिया:चावडी/सोशल मीडिया अपेक्षित आहे. कृपा आपले मत द्यावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१६, २० एप्रिल २०१७ (IST)
हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया
संपादनमराठी विकिपीडिया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला मराठी विकिपीडियाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. २००३ साली या दिवशी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाले. वसंतपंचमी हा आपला पहिला लेख होता.
मार्च २०१७ बाबत शुभेच्छा
संपादननमस्कार V.narsikar,
विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे पाचवे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.
|
---|
कसे आहात?
संपादनखुप दिवसात काही खबरबात नाही? कसे आहात साहेब? निनाद ०८:२५, १९ मे २०१७ (IST)
@Katyare: सादर नमस्कार. एकदम उत्तम. फिरतीवर आहे. तितकासा वेळ मिळत नाही व मोबाईलवरून काम करणे तेवढे जमत नाही. आशा आहे आपणही आलबेल असालच. विचारपुस केल्याबद्दल धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) १०:१६, २० मे २०१७ (IST)
मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप
संपादनमराठी विकिपीडियनस व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा !!
नमस्कार V.narsikar,
मराठी विकिपीडियाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी मी व अन्य विकिसदस्य तुम्हाला आमंत्रित करित आहोत. मराठी विकिपीडियाला पुढे नेण्यासाठीचे हे एक पाऊल वा प्रयत्न आहे. तुम्हीही आमच्यासोबत जोडून घ्या.
असुर, दैत्य, दानव, राक्षस
संपादननमस्कार नरसीकरजी,
तुम्ही दानव, दैत्य, राक्षस या पानांपासून असुर लेखाकडे पुनर्निर्देशन केलेले पाहिले. वस्तुतः हे तिन्ही गण असुरांसारखेच वर्णिलेले असले तरीही ते असुर नव्हेत. दैत्य हे दितीचे पुत्र होत. दानव हे दनुचे पुत्र होत. राक्षस हे भीषण दिसणारे लोक या दोन गणांशी निगडीत नाहीत.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:५४, १५ ऑगस्ट २०१७ (IST)
@अभय नातू:
- पुनर्निर्देशने वगळलीत.आभारी आहे.--वि. नरसीकर (चर्चा) २०:५९, १५ ऑगस्ट २०१७ (IST)