मांग

महाराष्ट्रातील एक क्ष‌‌‍‌त्रिय वर्णी जात

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.


मांग
वादक मांग (रूसेल १९१६)
एकूण लोकसंख्या

भारत: सुमारे २७,००,००० (२०१८)

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख : महाराष्ट्र

इतर : मध्य प्रदेश  • कर्नाटक  • आंध्र प्रदेश  • तेलंगाणा  • गुजरात  • छत्तीसगड

भाषा
मुख्यः- मराठी, हिंदी, पारूषी
धर्म
हिंदू धर्म, [[१]
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक


उत्पत्ती

मांग मातंग हा समाज आदिजांबव ऋषी यांना आपला आदीमुळ पुरुष मानतो तर ऋषी मातंग हे या जातिचे कुळ पुरुष आहे मातंग उत्पत्ती ची कथा डक्कलवार समाज सांगत असतो हनुमान,बाली सुग्रीव हे याच समाजाचे होते आणि बलशाली राजे होते हे या समाजाकडुन आवर्जून सांगितले जाते मांग किंवा मातंग हा भारतातील अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला एक समाज आहे. हा समाज मुळात क्षत्रिय इक्ष्वाकु आहे पण या जातीसमुहाला मध्ययुगीन काळात बहिष्कृत मानले गेले होते. या समुहाची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ मध्ये, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या सुमारे २५ लाख असावी.

मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यांत मातंग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ केले आहे.[२][३]

इतिहास

शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची व सुभेदारकिचि जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण देणे अनेक शूर वीर या क्रांतीवीराच्या तालमीतून तयार झाले होते .

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविलेल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य महारांसोबत मातंगांचाही सहभाग होता.

व्यवसाय

मातंग हे बारा बलुतेदारांपैकी एक समजले जात.केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मातंगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते; पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मातंगांचे रोजगार रूपांतरीत झाले.

गावातील शुभप्रसंगी, मिरवणुकांमध्ये मातंगांनी हलगी वाजवण्याची प्रथा होती . मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होते . 'कुणब्याघरी दाणं अन, मांगाघरी गाणं' अशी एक म्हण होती.आज २१ व्या शतकात ही हलगी न प्रतिष्ठा मिळाली आहे.

मातंग समाज त्यांचा दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज २१व्या शतकात इतर क्षेत्रांमध्येही आपले रांगडेपण सिद्ध करीत आहे.


लोकसंख्या

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज हा लोकसंख्येने महारांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या इतकी २०,०३,९९६ होती. मातंग लोक महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळतात.

२०१७ पर्यंत, मांग समुदायाला ११ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते: आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दमण आणि दीव, ओडिसा, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आणि तेलंगाणा.

२००१ च्या जनगणनेनुसार मातंगांची लोकसंख्या[४]:

धर्म

मातंग समाज हा पारंपरिकरीत्या हिंदू धर्मीय मानला जातो. .[५] हिंदू धर्मिय मांग हे 'अनुसूचित जाती' प्रवर्गात समाविष्ट आहेत

पोटजाती

मांग जातीत १५ पोटजाती आहेत, त्या अशा: मातंग, मादीग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे.

उल्लेखनीय व्यक्ती

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ https://joshuaproject.net/people_groups/17463/IN
  2. ^ "List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India". socialjustice.nic.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-16 रोजी पाहिले.
  3. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-07. Archived from the original on 2013-02-07. 2018-03-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  4. ^ "Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)". 2013-02-07. Archived from the original on 2013-02-07. 2018-03-16 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  5. ^ बातमी|url=https://joshuaproject.net/people_groups/17463/IN%7Ctitle=Matang[permanent dead link] (Hindu traditions) in India|last=Project|first=Joshua|access-date=2018-03-16|language=इंग्रजी}}