शिसे
शिसे (चिन्ह: Pb ; इंग्लिश: Lead, लेड ; अणुक्रमांक: ८२) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक मूलद्रव्य आहे. हे मूलद्रव्य गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगे आहे. याचा रंग निळा-राखाडी असून, या मूलद्रव्याची गणना धातूमधे होते.
![]() शिसे | ||||||||
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
साधारण अणुभार (Ar, standard) | २०७.२ ग्रॅ/मोल | |||||||
शिसे - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | ८२ | |||||||
गण | अज्ञात गण | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
स्थिती at STP | घन | |||||||
विलयबिंदू | ६००.६ °K (३२७.५ °C, ६२१.४ °F) | |||||||
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) | २०२२ °K (१७४९ °C, ३१८० °F) | |||||||
घनता (at STP) | ११.३४ ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
इतिहाससंपादन करा
हा धातू किमान ५ हजार वर्षांपासून मानवास माहीत आहे.
वापरसंपादन करा
शिशाचा वापर यापूर्वी इमारतींचे बांधकाम साहित्यात, सॉल्डरिंग करण्यासाठी, चिनी मातीच्या वस्तू चमकविण्यासाठी, रंगकामात आणि पाणी वाहून नेणाऱ्या नळांमध्ये मध्ये केला जात असे. सध्या त्याचा प्रमुख वापर शिसे व अल्क प्रकारच्या विद्युतघट संचात केला जातो. वाहने, जहाजे आणि विमाने यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टम या संचांवर चालतात आणि अवलंबून असतात. काही वेळा तर संचातूनच प्रत्यक्ष ऊर्जेचा पुरवठा होतो. कार्यालयीन इमारती, शाळा इत्यादींना यांना ध्वनिरोधक करण्यासाठीही याचा वापर होतो. इस्पितळामध्ये एक्स-रे आणि गामा-किरण रोखण्यासाठी शिसाचे पत्रे उपयोगी पडतात. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून तसेच अण्वस्त्र साहित्याची वाहतूक करताना शिसे वापरतात. दारूगोळा, रंग, काच, रबर, पोलाद इत्यादी उत्पादनांमध्ये या खनिजाचा उपयोग होतो.
आढळसंपादन करा
भारतसंपादन करा
भारतात प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत शिशाच्या खाणी आहेत. याशिवाय गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यांत काही प्रमाणात शिसे सापडते.
पुनर्वापरसंपादन करा
भारतात शिशाच्या साठ्यांची कमतरता असल्याने येथे शिशाची आयात आणि शिशाचा पुनर्वापर करावा लागतो.
बाह्य दुवेसंपादन करा
- "एमसीएक्स बाजाराच्या संकेतस्थळावरील शिश्याच्या मालव्यापारासंबंधीचे पान". Archived from the original on 2016-04-01. 2011-06-20 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |