मॅग्नेशियम
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
(Mg) (अणुक्रमांक १२) धातुरूप रासायनिक पदार्थ. पृथीवर मुबलक प्रमाणात (२.३%) आढळणारा धातू म्हणून मॅग्नेशियमची ओळख आहे. मेंदेलेयेवच्या आवर्त सारणीतील केवळ ६ घटकच मॅग्नेशियमपेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. माणसाच्या शरीरातही मॅग्नेशियम असतेच, ६० कि. ग्रॅ. वजनाच्या माणासाच्या शरीरात सुमारे २५ ग्रॅ. इतके मॅग्नेशियम असते.
मॅग्नेशियमचे स्फटिक | ||||||||
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
दृश्यरूप | रूपेरी घन | |||||||
साधारण अणुभार (Ar, standard) | २४.३०५० ग्रॅ/मोल | |||||||
मॅग्नेशियम - आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | १२ | |||||||
गण | अज्ञात गण | |||||||
श्रेणी | अल्कमृदा धातू | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
रंग | रूपेरी | |||||||
स्थिती at STP | घन | |||||||
विलयबिंदू | ९२३ °K (६५० °C, १२०२ °F) | |||||||
घनता (at STP) | १.७३८ ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
मॅग्नेशियम हा रुपेरी शुभ्र रंगाचा अगदी हलका धातू आहे. त्याचे वजन तांब्याच्या १/५ आहे तर लोखंड त्याच्यापेक्षा ४.५ पट आणि ऍल्युमिनियम १.५ पट अधिक वजनदार आहे. मॅग्नेशियमचा वितळणबिंदू ६५०° से. असला तरी ५५०° से. तपमान होताच त्यातून ज्वाला बाहेर पडायला लागतात. मॅग्नेशियममधून निघणारा हा प्रकाश डोळे दिपविणारा असतो म्हणून शोभेच्या दारूकामात मॅग्नेशियमचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मॅग्नेशियमला फक्त पेटलेली काडी लागली तरी त्याच्या ज्वलनास सुरुवात होते. केवळ ४ ग्रॅम मॅग्नेशियम इंधनातून बाहेर पडणारी उष्णता पेलाभर थंडगार पाणी उकळण्यास पुरेशी ठरते. हवेशी संपर्कात आल्यावर मॅग्नेशियम निस्तेज बनते, त्यावर ऑक्साईडचा पापुद्रा तयार होतो आणि पुढील ऑक्सिडीकरण थांबते.
मॅग्नेशियमचे उत्पादन दोन पद्धतीनुसार केले जाते. (१) विद्युतऔष्णिक पद्धतीने, (२) विद्युतविच्छेदनाद्वारे. पहिल्या पद्धतीत मॅग्नेशियम ऑक्साईडचे कार्बन, ऍल्युमिनियम इ. पदार्थांच्या सहाय्याने क्षपण केले जाते, तर दुसऱ्या पद्धतीत वितळलेल्या मॅग्नेशियम लवणाचे विद्युतविच्छेदन करून ९९.९९ % शुद्ध मॅग्नेशियम धातू मिळविला जातो.
लिथियम, बेरिलियम, कॅल्शियम, सेरियम, कॅडमियम, टायटॅनियम हे मॅग्नेशियमचे मित्र धातू असून यापैकी प्रत्येकासह मॅग्नेशियम मिळून मिसळून राहते. तर लोखंड, निकेल आणि सिलिकॉन यांच्याशी मॅग्नेशियमचे जमत नाही.
उपयोग
संपादनऔषधी क्षेत्रात मॅग्नेशियम विस्तृत प्रमाणात वापरले जाते. शुद्ध मॅग्नेशियम ऑक्साईड जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आम्लाच्या विषारी परिणामांवर वापरले जाते. मॅग्नेशियम पेरॉक्साईड हे उत्कृष्ट जंतुनाशक संयुग जठराच्या तक्रारींवर वापरता. जरदाळू, पेर, फुलकोबी यात नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करतात. ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांच्या रक्तात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून येते म्हणून अशांना भाज्या, फळे, औषधांच्या माध्यमातून ते दिले जाते. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांना मॅग्नेशियम दिल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.
औद्यगिक क्षेत्रातही मॅग्नेशियम खूपच महत्त्वाची भूमिका बजावते. विविध यंत्रे, त्यांचे सुटे भाग, कॅमेरे, द्विनेत्री, पेट्रोल आणि इतर तेलवाहक टाक्या, रेल्वे डब्यांचे सांगाडे, अणुभट्ट्या, विमाने, अग्निबाण आदी सर्व ठिकाणी मॅग्नेशियम वापरलेले दिसून येते.