ॲक्टिनियम
ॲक्टिनियम हा एक चंदेरी पांढऱ्या रंगाचा मऊ धातू आहे. त्याचे रासायनिक चिन्ह Ac हे आहे, व (अणुक्रमांक ८९) आहे. हा धातू किरणोत्सर्गी आहे. शुद्ध स्वरूपातील ॲक्टिनियम हवेशी संपर्क आल्यावर त्वरित गंजते, परंतु धातूवर आलेल्या ऑक्साईडच्या थरामुळे ॲक्टिनियमचे अधिक गंजणे थांबते.
ॲक्टिनियम खाणीत सापडलेल्या अशुद्ध युरेनियममध्ये अत्यंत अल्प प्रमाणात आढळते. एक टन युरेनियम खनिजामध्ये फक्त ०.२ मिलिग्रॅम ॲक्टिनियम असते. अतिशय महाग आणि दुर्मीळ असल्याने ॲक्टिनियमचा उद्योगधंद्यांत उपयोग करत नाहीत. सध्या त्याचा उपयोग फक्त न्यूट्रॉनचा स्रोत म्हणून आणि कर्करोगासाठी करण्यात येणाऱ्या किरणोत्सर्गी उपचारांमध्ये होतो.
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
साधारण अणुभार (Ar, standard) | ग्रॅ/मोल | |||||||
- आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
अणुक्रमांक (Z) | ८९ | |||||||
गण | अज्ञात गण | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
घनता (at STP) | ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |