दशावतार
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दशावतार हे विष्णूने १० वेळा घेतलेले आहेत.
हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात[१]
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥
दशावतार | |
विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | दशावतार |
संस्कृत | दश अवताराः |
निवासस्थान | क्षीरसागर स्वर्ग आकाश जल |
लोक | वैकुंठ |
वाहन | गरुड, शेष नाग |
शस्त्र | सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख |
पत्नी | लक्ष्मी |
अन्य नावे/ नामांतरे | केशव, नारायण, माधव, गोपाळ, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ, पुरुष, उपेंद्र |
या देवतेचे अवतार | मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कल्की, दत्तात्रेय, धन्वंतरी,मोहिनी अवतार ,सूर्य |
या अवताराची मुख्य देवता | विष्णू,नारायण, |
मंत्र | ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः, ॐ नमो नारायणाय |
नामोल्लेख | श्रीमद भागवत, विष्णु पुराण |
तीर्थक्षेत्रे | तिरुपती, पंढरपूर |
संदर्भित अन्वयार्थ
भारत = हे भारता(भरतवंशी अर्जुना), यदा यदा = जेव्हा जेव्हा, धर्मस्य = धर्माची, ग्लानिः = हानि, (च) = आणि, अधर्मस्य = अधर्माची, अभ्युत्थानम् = वृद्धी, भवति = होते, तदा हि = तेव्हा तेव्हा, अहम् = मी, आत्मानम् = आपले रूप, सृजामि = रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो ॥ ४-७ ॥ (अर्थ- हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.)
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
साधूनाम् = साधूंचा म्हणजे चांगल्या मनुष्यांचा, परित्राणाय = उद्धार करण्यासाठी, दुष्कृताम् = पापकर्म करणाऱ्यांचा, विनाशाय = विनाश करण्यासाठी, च = आणि, धर्मसंस्थापनार्थाय = धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी, युगे युगे = युगायुगात, सम्भवामि = मी प्रकट होतो ॥ ४-८ ॥ (अर्थ- सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.)
अर्थात : हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहश्च वामनः रामो रामश्च रामश्च कृष्ण: कल्किच ते दश।
मासा ,कासव , वराह, मानवी सिंह, वामन (बटू ब्राह्मण), परशुराम, दशराथी राम, बलराम,आणि कल्की ते दहा.
-सॅन्टकम प्रवेशद्वार, आदिवराह गुफा (7 वे शतक), महाबलीपुरम;
श्री देवविष्णू एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.
विष्णूचे २४ अवतार
संपादन- सनकादि
- पृथु
- वराह
- यज्ञ (सुयज्ञ)
- कपिल
- दत्तात्रेय
- नर-नारायण
- ऋषभदेव
- हयग्रीव
- मत्स्य
- कूर्म
- धन्वन्तरि
- मोहिनी
- गजेन्द्र-मोक्षदाता
- नरसिंह
- वामन
- हंस
- परशुराम
- राम
- वेदव्यास
- बलराम
- कृष्ण
- बुद्ध
- कल्कि
विष्णूचे दशावतार
संपादनदशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे[२] आधुनिक जीवशास्त्राचे असे म्हणणे आहे कि सर्वप्रथम पृथ्वीवरचा एकपेशीय जीव पाण्यात जन्मला. तो पेशींची विभागणी करून प्रजोत्पादन करू लागला. त्यातूनच मग बहुपेशीय सजीव निर्माण झालेत व ते लैंगिक प्रजोत्पादन करणारे जीव होते. मत्स्य हा त्यातील सर्वात विकसित जीव आहे. याचे प्रतिक म्हणून प्रथम अवतार हा मत्स्यावतार आहे. हा वैदिक प्रजापती व विष्णूचा पहिला अवतार आहे.[३]
मत्स्यावतार हा भगवान विष्णूचा अवतार आहे त्याच्या दहा अवतारांपैकी पहिला आदिअवतार आहे. विष्णू हा एक पालनकर्ता आहे, म्हणून ते विश्वाचे रक्षण करण्यासाठी विविध अवतार धारण करतात.या अवतारामध्ये सत्ययुगात् प्रभु विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. सत्यव्रत मनु सकाळी सूर्यदेवला अर्घ्य देत होता तेव्हा त्याच्या कमंडलमध्ये लहान मासा अचानक आला. मासा पाण्यात परत फेकून देण्याच्या वेळी, मनुला असे वाटत होते की इतर राक्षस , त्याला खाईल. त्यामुळे मनुने मासा एका छोट्या कलशामध्ये ठेवला. दया आणि धर्मानुसार हा राजा आपल्या कमंडलुमध्ये मासा घेऊन राजवाड्याचे दिशेने निघाला, पण, रात्रीच्या वेळी, मासा मोठा झाला आणि म्हणून त्याला एका कलशमधुन हलवावे लागले. मोठा कुंभामध्ये ठेवला तरीही मासा वाढतच राहिला आणि म्हणून मनुने तळ्यात फेकला. तथापि, मासा वाढतच गेला आणि विशाल आकारात वाढला की मनुला समुद्रात टाकण्यास भाग पाडले गेले. माशाने नंतर एक भविष्यवाणी केली की सात दिवसांत मोठा पूर येईल परंतु या आपत्तीबद्दल मनू काळजी करू नको मग माशाने त्याला .विशाल मोठी बोट पाठविली . माशाने मनुला जगातील सर्व प्राण्यांच्या जोड्या आणि सर्व वनस्पतींचे बियाणे भरण्यास सांगितले,पुराच्या वेळी, वासुकी सापाला दोर वापरून माशाला बांधली
त्यानंतर विष्णू विशाल माशाच्या रूपात पुन्हा दिसला, यावेळी सोनेरी तराजू आणि एकच शिंग घेऊन जहाज घेऊन गेले. सर्व तातडीने त्याच्या प्रचंड सर्व प्रजाती प्राण्यांच्या चढले काही काळानंतर, जसा माशाच्या अंदाजानुसार महासागर हळू हळू आणि अविश्वसनीयपणे उठला आणि जगाला पूर आला. आणि म्हणूनच, पूरातून वाचून,पृथ्वीवरील जीवनाच्या सर्व प्रजाती आपत्तीजनक पूरातून वाचल्या आहेत,पुर कमी झाल्यावर ,निर्सगमय प्रदेशात नेल .मानवजातीचा संस्थापक बनला.[४]
प्रथम उद्भवलेल्या जलचर प्राण्यांतून उत्क्रांती होत-होत मग उभयचर प्राणी निर्माण झालेत.कूर्म हा एक उभयचर प्राणी होता. त्याचे प्रतिक म्हणून कूर्मावतार.कूर्माचे आयुष्यपण इतर प्राण्यांपेक्षा जास्तच असते.[ संदर्भ हवा ] तैत्तरीय आरण्यक आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथात याचा उल्लेख सापडतो.
समुद्रमंथनाचे वेळी जेंव्हा मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य हे त्यास घुसळू लागले, तेंव्हा मेरू पर्वताची उंची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली.त्यामुळे मेरू पर्वत बुडू लागतो. तेंव्हा विष्णूने कूर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्यास तोलून धरले अशी आख्यायिका आहे.
जामिनीवर राहणारे प्राणी मग उभयचरांतून उत्क्रांत झाले. त्यातील वराह हा तिसरा अवतार होय. हा प्राणी आपल्या खास चार वैशिष्ट्यांमुळे सर्व प्राण्यात उठून दिसतो.१. त्याची प्रजननशक्ती २. त्याचे तीक्ष्ण घ्राणेंद्रीय जे सुमारे ८ ते १० किमी अंतरावरील तसेच जमिनीच्या खाली सुमारे ८ मीटर अंतरावरील वस्तूसुद्धा वास घेऊन हुडकू शकते.म्हणजेच माग काढण्याचे कौशल्य. ३.झाडांना आपल्या सुळ्याद्वारे समूळ उखडून टाकण्याचे कौशल्य. समूळ उच्चाटन करणे हा भाव. व ४. हाडांचादेखील चूरा करू शकणारा मजबूत ताकतीचा जबडा. वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे. राजाच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यात आहेत असा समज आहे.
नरसिंह म्हणजे अर्धा नर व अर्धा सिंह(वनचर). या अवतारात श्रीविष्णूने आपल्या प्रल्हाद या भक्ताची जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ही श्रद्धा व धारणा नक्की केली.
वामन म्हणजे बुटका, बुद्धीचा वापर करणारा असा वामनाअवतार.त्याने आपल्या बुद्धीने पौराणिक बली असुर राजा पातळात धाडले.
बंगाली लोक्खी कथा मध्ये बली राजाचा द्वारपाल झाला
पुढे मानवात अजून उत्क्रांती होत गेली.तो जीवनापयोगी व जीवन राखण्यास आवश्यक ती साधने बनवू लागला. त्याने धातूचा वापर सुरू केला.परशुसाठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम.त्यांनी या परशुच्या जोरावर २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली.तसेच भारतातील कोकण गोवा व केरळ ही किनारपट्टी मागे हटवून स्वतःसाठी भूमी तयार केली.भीष्म द्रोण व कर्ण यांना धनुर्विद्या शिकविणारे हेच होते. हा अवतार म्हणजे ब्राह्मतेज व क्षात्रतेज याचा मिलापच होता.
परशु हे शस्त्र असे आहे कि त्याचा शत्रुवर फार जवळून वापर करावा लागतो.त्यामध्ये शत्रुचा वार आपल्यावर देखील होण्याचा संभव असतो. यासाठी स्वतःस सुरक्षित ठेवून, दूरवर मारा करता येण्याजोगे शस्त्र धनुष्य व बाण वापरणारा हा राम.ही देखील पुढची उत्क्रांती.राम व कृष्ण यांना पूर्णावतार म्हणतात कारण यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले.जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था पार केल्या.रामबाण हा प्रख्यात शब्द रामाच्या बाणावरूनच आला.अचूक वेध घेण्याचे कौशल्य असा याचा अर्थ होतो.
श्री विष्णूचा आठवा अवतार मानला जातो.
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरे कडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.
लग्न झाल्यानंतर कृष्णाची माता देवकी आणि पिता वसुदेवला मथुरेचा राजाकंस रथात घेऊन जातात. मग आकाशवाणीत "देवकीचा पुत्र तुझा वध करेल" हे ऐकून मामा कंस भयभीत होऊन , देवकी आणि वसुदेवला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सहा[५] अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र गोपमहाराज नंदचा घरी नेले.
श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो.होता.पराक्रमी,मुष्टीयोद्धा,उत्कृष्ट सारथी,सखा, तत्त्वज्ञानी होता.
मोहिनी अवतार हा श्री विष्णूचा नववा अवतार मानला जातो.
इतर
संपादन- हिंदू धर्म आणि सदभक्तांचे रक्षण करून सत्य श्रेष्ठ हिंदू धर्माची पुनः स्थापना करण्यासाठी श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या (ईश्वराच्या ) आद्नेने क्षत्रियाद्य श्रीहरी ने धारण केलेले १० शाश्वत आणि मूळ अवतार . या सर्व अवतारांत श्री हरी आपल्या पूर्ण सच्चिदानंद स्वरूपांत प्रकट झाला आहे . या सर्व अवतारांसंबंधी माहिती सांगणारा श्लोक "कलियुगाचे युगनेमस्त सत्य श्रेष्ठ ईश्वरीय ज्ञान उपदेशक श्रीमत सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी" महाराजांच्या "श्रीजातवेद महावाक्यांग " या ग्रंथा मध्ये त्यांनी निरुपण केला आहे तो असा
"मच्छा पासुनी चार स्वामी हरी 'जो अवतार घेतो कृती ' त्रेती वामन फर्श राम 'तिसरा श्रीराम सीतापती ' द्वापारी कृष्णनाथ बौध्य दुसरा 'पाळी स्वयें पांडवा ' कलीत अवतार एक हरीचा' कलंकी नमो केशवा "
याचा अर्थ कि आजवर क्षत्रीयाद्य श्रीहरीने कुता युगात मच्छ ,कच्छ ,वराह ,नृसिंह त्रेतायुगात वामन ,परशुराम आणि श्रीराम त्याचप्रमाणे द्वापार युगात श्री कृष्ण आणि बौध्य म्हणजे बोधराज स्वामी श्री विठ्ठल (बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध आणि बौध्य हे वेगळे शब्द आहेत . बौध्यचा अर्थ गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे असा आहे कि विशाल भाल असलेला ,संपूर्ण मौन धारण केलेला ,कटी कर ठेवून भक्त रक्षणासाठी उभा असलेला असा तो .पण सध्याचे आध्यात्मिक गुरू आणि धर्मप्रचारक यांच्या मौना मुळेच हरीचा ९वा अवतार लोक गौतम बुद्धाला मानतात पण गौतम बुद्ध हा हरी अवतार नाही
अर्थात, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते म्हणजेच लोक धर्माचरण सोडून भ्रष्टाचारी ,व्यसनी होतात आणि वेद-शास्त्र , गोमाता ,यज्ञ -याग या सर्वांचा लोकांना विसर पडून दहशतवाद उफाळू लागतो तेव्हा आणि जेव्हा अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी या भारतवर्षात अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
चित्र सज्जा
संपादन-
मत्स्यावतार.
-
कूर्मावतार.
-
वराहावतार.
-
नरसिंहावतार.
-
वामनावतार.
-
परशुरामावतार.
-
रामावतार.
-
कृष्णावतार.
-
कल्की अवतार.
संदर्भ यादी
संपादन- ^ "श्रीमद्भगवद्गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)". श्रीमद्भगवद्गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग).
- ^ शिवजागर. "शिवजागर: डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या पुराणात दशावताराच्या रुपात खूप आगोदर सांगितला गेला आहे". शिवजागर. 2019-09-24 रोजी पाहिले.
- ^ "Matsya". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-15.
- ^ "Hindu Mythology, Vedic and Puranic: Chapter V. The Incarnations or Avatāras of Vishnu: 1. The Matsya or Fish Avatāra". www.sacred-texts.com. 2019-09-24 रोजी पाहिले.
- ^ "Devaki". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-12-11.