बली
बली एक पौराणिक असुर राजा व सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. हा विरोचनाचा पुत्र व भक्त प्रल्हादाचा नातू होय. शुक्राचार्य हे त्याचे गुरू होते.प्रल्हादाचे हा आपल्या आजोबाप्रमाणे विष्णूचा भक्त होता. हा अतिशय दानी होता. ह्याच्या पित्याचा इंद्राने कपटाने वध केला. त्याचा सूड म्हणून ह्याने इंद्राशी युद्ध करून त्याला स्वर्गातून हाकलून लावले. पुढे इंद्राने विष्णूकडे बलीच्या वधासाठी विनंती केली. विष्णूने वामनावतार घेतला व बलीकडून स्वर्ग आणि पृथ्वीचे राज्य दानाच्या रूपात परत घेऊन बलीचा वध न करता त्याला पाताळात ढकलून दिले. तिथे तो लोकाचा राजा झाला.
हा लेख दैत्य राजा बली याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बळी.
पुढील श्लोकातील एक ओळ बलीच्या दानशूरतेबद्दल आहे. श्लोक असा :- अतिरूपात् हृता सीता | अतिदर्पाच्च रावणः | अतिदानात् बलिर्बद्धः | अति सर्वत्र वर्जयेत् ||