प्राण

(जीव या पानावरून पुनर्निर्देशित)

प्राण ही पहिली प्रधान ऊर्जा होय.'प्रा' म्हणजे प्रधान व 'ण' म्हणजे ऊर्जा मोजण्याचे सर्वात लहान परिमाण.ऊर्जा प्रवाहाचा आण्विक किंवा प्राथमिक प्रारंभ म्हणजे प्राण होय.विश्वात जे जे काही कंपन पावते ते प्राणच असते - प्रकाश, उष्णता, नाद, चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण,विद्युत, शक्ती, जोम, जीवन व उत्साह ही सारी प्राणाचीच रूपे आहेत.प्राण म्हणजे एक प्रकारची संमिश्र, बहुआयामी ऊर्जा असे वर्णन करण्यात येते. ही बहुआयामी ऊर्जा विद्युत, चुंबकीय, प्रकाशीय व औष्णिक ऊर्जांचे एकत्रीकरण असते.प्राण अतिशय सूक्ष्मरूपाने विद्यमान असतो व कोणत्याही उपलब्ध वैज्ञानिक अवजारांनी व पद्धतीने त्याचे आत्तापर्यंत मापन केले गेलेले नाही.प्राण अणुपेक्षाही सूक्ष्म असतो कारण अणूच्या आत दडलेला प्राण म्हणून तोच सर्व अणुमध्ये विद्यमान असतो. संपूर्ण विश्वात सजीव वस्तूंमध्ये व्यापून राहिलेली एक मूलभूत, अनादी शक्ती.

शरीरातील इडा, पिंगलासुषुम्ना या तीन नाड्यांमधून ही शक्ती कार्य करते. श्वासाने या शक्तीचे नियमन करता येते.