प्राण क्रिशन सिकंद ((प्राणनाथ किशननाथ सिकंद-जन्म : दिल्ली, १२-२-१९२०; - मुंबई, १२-७-२०१३) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७०हून अधिक वर्षे घालवून ४००हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात इ.स. १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

प्राण क्रिशन सिकंद
जन्म प्राण क्रिशन सिकंद
१२ फेब्रुवारी १९२०
दिल्ली
मृत्यू १२ जुलै २०१३
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट जिस देश मे गंगा बहती है, उपकार, जंजीर
पुरस्कार दादासाहेब फाळके
वडील केवल
आई रामेश्वरी
पत्नी शुक्ला
अपत्ये अरविंद, सुनील, पिंकी
अधिकृत संकेतस्थळ http://www.pransikand.com/

पूर्वायुष्य

संपादन

प्राण यांचे वडील कंत्राटदार असल्यामुळे गावोगावी फिरत असत. प्राण हे रामपुरी चाकूसाठी प्रसिद्ध असलेल्या रामपूर येथून मॅट्रिक पास झाले. पुढे न शिकता त्यांनी दिल्लीत कॅनॉट प्लेसजवळील दास फोटोग्राफी स्टुडिओ या दुकानात नोकरी धरली. दाससाहेबांनी दुकानाची लाहोरला शाखा काढली आणि प्राणला तेथे नेमले. दुकानातले काम संपले की एका ठरावीक उपाहारगृहात प्राण आणि त्यांच्या मित्रांची मैफिल रंगायची.

एके दिवशी एक मुमताज शांती या त्या काळच्या आघाडेच्या अभिनेत्रीचे पती, आणि दलसुख पंचोली या चित्रपट निर्मात्याचे पटकथा लेखक वली हे प्राणच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी त्याला चित्रपटात काम देण्याची पक्की ऑफर दिली. दुसऱ्या दिवशी स्टुडिओत यायला सांगितले. मात्र प्राणसाहेबांनी या बोलावण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना चित्रपटात काम करण्याची मुळीच हौस नव्हती. नोकरीत मिळणारे २०० रुपये त्यांना पुरेसे वाटत होते. आठ दिवसांनी परत वली प्राणला भेटले, त्याला खूप बोलले आणि स्टुडिओत का आला नाहीस म्हणून जाब विचारला. प्राणसाहेब म्हणाले "मला काय माहीत की ही ऑफर खरी आहे?" मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी स्टुडिओत यायचे कबूल केले. पंचालींसमोर उभे राहिल्याबरोबर त्यांनी प्राणला ’जट यमला’या पंजाबी सिनेमासाठी करारबद्ध केले आणि हातावर आगाऊ म्हणून ५० रुपये ठेवले.

कारकीर्द

संपादन

’जट यमला’आणि’खानदान’ या चित्रपटांत त्यांच्या मते कशातरी भूमिका केल्यावर प्राणसाहेबांचा भाव वाढला आणि त्यांना चित्रपटाचे पाच हजार आणि पुढे नऊ हजार मिळू लागले. पण... भारताची फाळणी झाली आणि प्राण यांना मुंबईत यावे लागले. पुढचे ३०० दिवस प्राण बेकार होते, आणि एके दिवशी त्यांना देव आनंद नायक असलेल्या ’जिद्दी’मध्ये काम मिळाले. फक्त ५०० रुपये एकूण रकमेचा करार आणि त्यातले १०० रुपये आगाऊ. १९४८मध्ये प्रकाशित झालेल्या त्या ’जिद्दी’मध्ये प्राणसाहेबांनी खलनायकाची अशी जिद्दीने भूमिका केली की त्यांच्यापुढे चित्रपटांची रांग लागली. अपराधी (नायिका मधुबाला), बडी बहन या चित्रपटांनंतर, ’बहार’पासून प्राणसाहेबांनी आपल्या कामाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली.

दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, बलराज सहानी यांच्याबरोबर काम करताना आपले शिक्षण आणि वाचन कमी असल्याचे प्राण यांना जाणवले. आपल्याला रंगमंचावर काम करण्याचा अनुभव नाही, त्यामुळे असल्या नायकांबरोबर टिकून राहायचे असेल तर खूप मेहनत केली पाहिजे, आणि आपल्या भूमिकेत वेगळेपणा आणला पाहिजे याची त्यांनी खूणगाठ बांधली. मग ते पटकथा लेखकांशी आणि दिग्दर्शकांशी चर्चा करून भूमिका समजावून घेऊ लागले आणि आपल्या परीने त्यांत लकबींचा वापर करू लागले. ’जिस देश में गंगा बहती है’ मध्ये राकाच्या मनातली फाशीची भीती दाखवणारी गळ्यावरून बोट फिरवायची त्यांची लकब राज कपूरला खूप आवडली. अशाच वेगवेगळ्या लकबी त्यांच्यातील खलनायकाने चित्रपटांमधून वापरल्या.

प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटांतील खलनायकाला ’स्टार’ बनवले. राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टारबरोबर त्याच्या बेशिस्तपणामुळे काम न करण्याची प्रतिज्ञा प्राण यांनी शेवटपर्यंत पाळली.

देशाच्या फाळणीला त्यांच्या मते जबाबदार असलेल्या भारतातील काँग्रेस या राजकीय पक्षाचा प्राण यांना अतिशय राग होता. त्या पक्षाच्या इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध त्यांनी देव आनंद आणि विजय आनंद या बंधूंना घेऊन चित्रपट कलाकारांचा राजकीय पक्ष काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

प्राण यांचा एक मुलगा इंग्लंडमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक आहे.

प्राण यांचा अभिनय असलेले चित्रपट

संपादन

अ ते औ

संपादन
चित्रपट वर्ष
ॲन इव्हिनिंग इन पॅरिस (१९६७)
अपराधी (१९४९)
अफसाना (१९५१)
अमर अकबर ॲंथनी (१९७७)
आझाद (१९५५)
आदमी (१९६८)
आह (१९५३)
उपकार (१९६७)

क ते घ

संपादन
चित्रपट वर्ष
कर्ज (१९८०)
कश्मीर की कली (१९६४)
खजांची (१९४१)
खानदान (१९४२)
गुमनाम (१९६५)
गृहस्थी (१९४८)

च ते झ

संपादन
चित्रपट वर्ष
चोरीचोरी (१९५६)
चौधरी (?)
छलिया (१९६०)
जंगल में मंगल (१९७२)
जंजीर (१९७३)
जब प्यार किसीसे होता है (१९६१)
जॉनी मेरा नाम (१९७०)
जिद्दी (१९४८)
जिस देश में गंगा बहती हैं (१९६०)

ट ते ढ

संपादन

त ते न

संपादन
चित्रपट वर्ष
दिल दिया दर्द लिया (१९६६)
दिल ही तोहै (१९६३)
दुनिता ()
देवदास (१९५५)
नसीब (१९८१)

प ते म

संपादन
चित्रपट वर्ष
पत्थर के सनम (१९६७)
परिचय (१९७२)
पिलपिली साहेब (१९५४)
बडी बहू (१९५४)
बरसात की एक रात (१९४८)
बॉबी (१९७३)
ब्रह्मचारी (१९६८)
मजबूर (१९७४)
मधुमती (१९५८)
मुनीमजी (१९५५)

य ते ज्ञ

संपादन
चित्रपट वर्ष
यमला जट (पंजाबी -१९४५)
राजा और राणा (१९८४)
राम और श्याम (१९६७)
शराबी (१९८४)
शहीद (१९६५)
हलाकू (१९५६)
हाफ टिकीट (१९६०)

प्राण यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट

संपादन
  • आ अब लौट चले

पुरस्कार

संपादन
  • प्राण यांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत मिळालेल्या पुरस्कारांनी, स्मृतिचिन्हांनी, पदकांनी आणि करंडकांनी त्यांच्या बंगल्यातील दोन दिवाणखाने भरले आहेत.
  • प्राण हे, चित्रपटसृष्टीत सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके[१] पुरस्काराचे २०१३ सालचे मानकरी आहेत.

प्राण यांची चरित्रे

संपादन
  • प्राण (लेखक - स्वप्निल श्रीकांत पोरे)

बाह्य दुवे

संपादन


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "अभिनेता प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार". 2016-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-27 रोजी पाहिले.