भूपरिवेष्टित देश

(भूवेष्टित देश या पानावरून पुनर्निर्देशित)
जगातील ४८ भूपरिवेष्टित देश

भूपरिवेष्टित देश म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेलेला देश. अशा देशाला समुद्रकिनारा असलाच तर तो एखाद्या बंदिस्त समुद्राचा असतो. जगात ४८ भूपरिवेष्टित देश आहेत.

ऐतिहासिक काळापासून भूपरिवेष्टित असणे तोट्याचे मानले गेले आहे. समुद्रकिनारा नसल्यामुळे अशा देशांना सागरी वाहतुकीपासून वंचित राहावे लागते तसेच समुद्राच्या इतर संपत्तीचा देखील वापर करून घेता येत नाही. आजवर अनेक देशांनी भूपरिवेष्टित होण्यापासून टाळण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला आहे.


जगातील भूपरिवेष्टित देशांची यादीसंपादन करा

देश क्षेत्रफळ (km²) लोकसंख्या
  अफगाणिस्तान 647,500 29,117,000
  आंदोरा 468 84,082
  आर्मेनिया 29,743 3,254,300
  ऑस्ट्रिया 83,871 8,396,760
  अझरबैजान[a] 86,600 8,997,400
  अझवाद[c]
  बेलारूस 207,600 9,484,300
  भूतान 38,394 691,141
  बोलिव्हिया 1,098,581 10,907,778
  बोत्स्वाना 582,000 1,990,876
  बर्किना फासो 274,222 15,746,232
  बुरुंडी 27,834 8,988,091
  मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक 622,984 4,422,000
  चाड 1,284,000 10,329,208
  चेक प्रजासत्ताक 78,867 10 674 947
  इथियोपिया 1,104,300 85,237,338
  हंगेरी 93,028 10,005,000
  कझाकस्तान[a][b] 2,724,900 16,372,000
  कोसोव्हो[c] 10,908 1,804,838
  किर्गिझस्तान 199,951 5,482,000
  लाओस 236,800 6,320,000
  लेसोथो[d] 30,355 2,067,000
  लिश्टनस्टाइन 160 35,789
  लक्झेंबर्ग 2,586 502,202
  मॅसिडोनिया 25,713 2,114,550
  मलावी 118,484 15,028,757
  माली 1,240,192 14,517,176
  मोल्दोव्हा 33,846 3,567,500
  मंगोलिया 1,566,500 3,000,000
  नागोर्नो-काराबाख[c] 11,458 138,000
  नेपाळ 147,181 29,331,000
  नायजर 1,267,000 15,306,252
  पेराग्वे 406,752 6,349,000
  रवांडा 26,338 10,746,311
  सान मारिनो[d] 61 31,716
  सर्बिया 88,361 7,306,677
  स्लोव्हाकिया 49,035 5,429,763
  दक्षिण ओसेशिया[c] 3,900 72,000
  दक्षिण सुदान 619,745 8,260,490
  स्वाझीलँड 17,364 1,185,000
  स्वित्झर्लंड 41,284 7,785,600
  ताजिकिस्तान 143,100 7,349,145
  ट्रान्सनिस्ट्रिया[c] 4,163 537,000
  तुर्कमेनिस्तान[a] 488,100 5,110,000
  युगांडा 241,038 32,369,558
  उझबेकिस्तान[b] 447,400 27,606,007
  व्हॅटिकन सिटी[d] 0.44 826
  झांबिया 752,612 12,935,000
  झिम्बाब्वे 390,757 12,521,000
एकूण 16,963,624 470,639,181
जगाशी तुलना 11.4% 6.9%
a कॅस्पियन समुद्राचा किनारा आहे.
b अरल समुद्राचा किनारा आहे.
c वादग्रस्त व अमान्य भूभाग
d दुसऱ्या देशाच्या संपूर्णपणे अंतर्गत