बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४-२५
बांगलादेश क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये भारत दौऱ्यावर आहे.[१][२] या दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळवले जातील.[३][४] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाचा भाग आहे.[५][६] जून २०२४ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[७]
बांगलादेश क्रिकेट संघाचा भारत दौरा २०२४-२५ | |||||
भारत | बांगलादेश | ||||
तारीख | १९ सप्टेंबर – १२ ऑक्टोबर २०२४ | ||||
संघनायक | रोहित शर्मा | नजमुल हुसैन शान्तो | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | यशस्वी जयस्वाल (१८९) | नजमुल हुसैन शान्तो (१५२) | |||
सर्वाधिक बळी | जसप्रीत बुमराह (११) रविचंद्रन अश्विन (११) |
मेहेदी हसन मिराझ (९) | |||
मालिकावीर | रविचंद्रन अश्विन (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | संजू सॅमसन (१५०) | तौहीद ह्रिदोय (७७) | |||
सर्वाधिक बळी | वरुण चक्रवर्ती (५) | तंझीम हसन साकिब (५) | |||
मालिकावीर | हार्दिक पांड्या |
१३ ऑगस्ट २०२४ रोजी, ड्रेसिंग रूममध्ये सुधारणा आणि नूतनीकरणाच्या कामामुळे बीसीसीआयने धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधून पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० चे ठिकाण ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये हलवले.[८][९]
संघ
संपादनभारत | बांगलादेश | ||
---|---|---|---|
कसोटी[१०] | आं.टी२० | कसोटी[११] | आं.टी२० |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, बांगलादेश ०.
२री कसोटी
संपादन२७ सप्टेंबर – १ ऑक्टोबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- पाऊस आणि ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ होऊ शकला आणि दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कोणताही खेळ होऊ शकला नाही.[१२][१३][१४]
- रवींद्र जडेजाने (भारत) कसोटी क्रिकेटमधील त्याचा ३००वा बळी घेतला.[१५]
- विराट कोहली (भारत) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (५९४ डावांमध्ये) सर्वात जलद २४,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज झाला.[१६][१७]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, बांगलादेश ०.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- नितीशकुमार रेड्डी आणि मयंक यादव (भारत) या दोघांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण.[१८][१९]
- या ठिकाणी खेळला जाणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करणारे हे भारतातील २६ वे आंतरराष्ट्रीय टी२० ठिकाण आहे.[२०]
२रा आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ही भारताची सर्वोच्च धावसंख्या होती.[२१]
३रा आं.टी२० सामना
संपादनवि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बांगलादेशच्या महमुदुल्लाहचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[२२]
- भारताच्या संजू सॅमसनचे आंतरराष्ट्रीय टी२० मधील पहिलेच शतक.[२३]
- भारताची आंतरराष्ट्रीय टी२० मधील ही सर्वोच्च,[२४] आणि पूर्ण सदस्य-राष्ट्राने केलेली सर्वोच्च धावसंख्या.[२५]
- भारताच्या रवी बिश्नोईचे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० बळी पूर्ण.[२६]
नोंदी
संपादन- ^ प्रत्येक कसोटी सामन्यासाठी पाच दिवसांचा खेळ नियोजित असताना, पहिल्या कसोटीचा निकाल चार दिवसांत लागला.
संदर्भ
संपादन- ^ "Bangladesh to tour India for 2 tests, 3 T20Is" [बांगलादेशचा २ कसोटी, ३ टी२० सामन्यांसाठी भारत दौरा]. द डेली मेसेंजर (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "২ টেস্ট, ৩ টি-টোয়েন্টি খেলতে ভারতে যাবে বাংলাদেশ" [बांगलादेश २ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळण्यासाठी भारतात जाणार]. आरटीव्ही (Bengali भाषेत). २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "India announce international fixtures for home season 2024-25" [भारताचे २०२४-२५ च्या घरच्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय सामने जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to tour India in September, no ODIs" [बांगलादेश सप्टेंबर मध्ये भारताचा दौरा करणार, एकदिवसीय सामने नाहीत]. क्रिकेट९७ (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "India to host Bangladesh, New Zealand and England during 2024-25 home season" [भारत २०२४-२५च्या घरच्या हंगामात बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे यजमानपद भूषवणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "BCCI announces fixtures for Team India (Senior Men) international home season 2024-25" [बीसीसीआयने टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) आंतरराष्ट्रीय होम सीझन २०२४-२५ साठी सामन्यांची घोषणा केली]. बीसीसीआय. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Dharamsala T20I between India and Bangladesh moved to Gwalior" [भारत आणि बांगलादेश यांच्यातील धर्मशाला येथील आंतरराष्ट्रीय टी२० ग्वाल्हेरला हलवला]. क्रिकबझ्झ. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "BCCI makes changes to India's home season schedule" [बीसीसीआय कडून भारताच्या घरच्या मोसमाच्या वेळापत्रकात बदल]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "India's squad for the 1st Test of the IDFC FIRST Bank Test series against Bangladesh announced" [बांगलादेश विरुद्ध आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर]. बीसीसीआय. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "जाहीर | भारत २०२४ दौऱ्यासाठी बांगलादेश कसोटी संघ". बांगलादेश क्रिकेट बोर्ड. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Heavy rain calls off first day after Bangladesh lose three" [बांगलादेशचे तीन गडी बाद झाल्यानंतर पहिल्या दिवशी मुसळधार पाऊसामुळे खेळ थांबला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Rain forces washout on second day in Kanpur" [पावासामुळे कानपुर येथील दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द]. क्रिकबझ्झ. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Day 3 of India vs Bangladesh 2nd test washed out due to wet outfield" [ओल्या मैदानामुळे भारत वि बांगलादेश २ऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द]. द हिंदू. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Ravindra Jadeja becomes second fastest to the 300 Wickets/3000 Runs grand double, behind Ian Botham" [रवींद्र जडेजा इयान बॉथमनंतर ३०० बळी/३००० धाव करणारा करणारा दुसरा सर्वात वेगवान खेळाडू ठरला.]. द इंडियन एक्सप्रेस. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "IND vs BAN, 2nd Test: Kohli becomes fastest player to reach 27,000 international runs" [भा वि बां, दुसरी कसोटी: कोहली सर्वाधिक जलद २७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला]. स्पोर्टस्टार. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Virat Kohli becomes fastest to 27,000 runs in international cricket" [विराट कोहली सर्वाधिक जलद २७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला]. टाइम्स ऑफ इंडिया. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "भा वि बां: अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीचे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० दरम्यान भारताकडून पदार्पण". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). चेन्नई. ७ ऑक्टोबर २०२४. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "'आयपीएल दुखापतीनंतर क्रिकेट खेळलो नाही आणि थेट भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले': मयंक यादवची चार महिन्यांच्या रिकव्हरी कालावधीवर प्रतिक्रिया". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). नोएडा. ७ ऑक्टोबर २०२४. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ग्वाल्हेर येथे भारत विरुद्ध बांगलादेश १ला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होणार". द न्यू इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). चेन्नई. १८ सप्टेंबर २०२४. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि बांगलादेश, दुसरा आंटी२० सामना: भारताने बांगलादेशविरुद्ध सर्वोच्च टी२० धावसंख्या नोंदवली". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). चेन्नई. ९ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "महमुदुल्ला भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होणार". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "सॅमसनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० शतकाने भारताचा मालिकेत विजय". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "हैदराबादमध्ये भारताचा टी२० मध्ये नवा विक्रम, ३०० धावांचा टप्पा थोडक्यात हुकला". आयसीसी (इंग्रजी भाषेत). दुबई. १२ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि बांगलादेश, तिसरा आं.टी२० : पूर्ण-सदस्य राष्ट्राकडून भारताची आं.टी२० मध्ये सर्वोच्च धावसंख्या". स्पोर्टस्टार. चेन्नई. १२ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "IND vs BAN: Ravi Bishnoi becomes joint-second fastest Indian to pick 50 T20I wickets". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). चेन्नई. १५ ऑक्टोबर २०२४. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.