कानपूर

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
(कानपुर या पानावरून पुनर्निर्देशित)


कानपूर (हिंदी: कानपुर; उर्दू: کانپور) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे तर भारत देशातील १२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. कानपूर नगर जिल्हाकानपूर देहात जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय असलेले कानपूर दिल्लीखालोखाल उत्तर भारतातील सर्वात मोठे औद्योगिक शहर मानले जाते. कानपूर उत्तर प्रदेशच्या मध्य भागात गंगा नदीच्या पश्चिम काठावर वसले असून ते लखनौच्या ९५ किमी नैऋत्येस तर आग्र्याच्या २८० किमी आग्नेयेस स्थित आहे.

कानपूर
उत्तर प्रदेशमधील शहर


कानपूर is located in उत्तर प्रदेश
कानपूर
कानपूर
कानपूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान
कानपूर is located in भारत
कानपूर
कानपूर
कानपूरचे भारतमधील स्थान

गुणक: 26°27′N 80°20′E / 26.450°N 80.333°E / 26.450; 80.333

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा कानपूर नगर जिल्हा
कानपूर देहात जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ४०४ फूट (१२३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २७,६५,३४८
  - महानगर २९,२०,४९६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कानपूरला मानाचे स्थान आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान नानासाहेबाने कानपूराला वेढा देऊन ब्रिटिश सैन्याला अडचणीत आणले होते.

वाहतूक

संपादन

कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक उत्तर भारतातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. कानपूर विमानतळ अस्तित्वात आहे परंतु येथे कोणत्याही कंपनीद्वारे विमानसेवा पुरवली जात नाही. लखनौचा चौधरी चरणसिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ कानपूरपासून ७५ किमी अंतरावर आहे. दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग २ कानपूरमधूनच धावतो.

कानपूरचे ग्रीन पार्क हे मैदान भारतातील पहिल्या काही कसोटी क्रिकेट मैदानांपैकी एक असून ते उत्तर प्रदेशातील एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान आहे.

शिक्षण

संपादन

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपूर ही भारतामधील आघाडीची तंत्रज्ञान शिक्षण व संशोधन संस्था मानली जाते. येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ हे आशिया खंडातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.