किर्गिझस्तान

मध्य आशियातील एक देश
(किर्गि‍झस्तान या पानावरून पुनर्निर्देशित)


किर्गिझस्तान (किर्गिझ: Кыргызстан ; ), अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक (किर्गिझ: Кыргыз Республикасы ; रशियन: Кыргызская Республика ), हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

किर्गिझस्तान
Кыргыз Республикасы (किर्गिझ)
Кыргызская Республика (रशियन)
किर्गिझ प्रजासत्ताक
किर्गिझस्तानचा ध्वज किर्गिझस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: किर्गिझ प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत
किर्गिझस्तानचे स्थान
किर्गिझस्तानचे स्थान
किर्गिझस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बिश्केक
अधिकृत भाषा किर्गिझ, रशियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख अल्माझेक अताम्बायेव्ह
 - पंतप्रधान झांतोरो सतिबाल्दियेव्ह
महत्त्वपूर्ण घटना
 - कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त १४ ऑक्टोबर १९२४ 
 - किर्गिझ सोसाग ५ डिसेंबर १९३६ 
 - स्वातंत्र्य घोषणा ३१ ऑगस्ट १९९१ 
 - मान्यता २५ डिसेंबर १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,९९,९०० किमी (८६वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.६
लोकसंख्या
 -एकूण ५३,५६,८६९ (११०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १३.१२५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,३७२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५९८ (मध्यम) (१०९ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन सोम
आंतरराष्ट्रीय कालविभाग किर्गिझस्तान प्रमाणवेळ (यूटीसी + ५:०० ते + ६:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ KG
आंतरजाल प्रत्यय .kg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

संपादन

वर्तमान किर्गिझस्तानाच्या भूभागावर प्राचीन काळी सिथियन टोळ्यांची वस्ती होती [ संदर्भ हवा ].

अरबांशी व्यापार करणाऱ्या तुर्क व्यापाऱ्यांमार्फत इ.स.च्या ७व्या शतकापासून मध्य आशियात इस्लाम पसरू लागला. इ.स. ८४० साली जॉर्डन राजाच्या आधिपत्याखाली किर्गिझ लोकांनी उय्गुर खाखानतीवर विजय मिळवला व राज्याच्या सीमा पूर्वेकडे विस्तारल्या. पुढील दोनशे वर्षे थ्यॅन षान पर्वतरांगांपर्यंतच्या भूप्रदेशावर किर्गिझांची हुकमत अबाधित राहिली. मात्र १२व्या शतकात मंगोलांच्या आक्रमणापुढे किर्गिझांची पीछेहाट होत, आल्ताय आणि सायान पर्वतरांगांच्या प्रदेशापुरतीच त्यांची सत्ता उरली. इ.स.च्या १३व्या शतकात मंगोल साम्राज्याच्या उदयामुळे किर्गिझांनी दक्षिणेस स्थलांतरे केली. चंगीझ खानाने इ.स. १२०७ साली किर्गिझांवर विजय मिळवला.

किर्गिझ टोळ्यांवर आणि त्यांच्या मुलखावर इ.स.च्या १७या शतकात मंगोल ओइरातांचे, इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यास मांचू छिंग साम्राज्याचे आधिपत्य होते. इ.स.च्या १९व्या शतकाच्या पूर्वार्धात या प्रदेशावर कोकंदाच्या उझबेक खानतीची सत्ता राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रशियन साम्राज्य आणि चिनी छिंग साम्राज्यादरम्यान झालेल्या दोन तहांद्वारे वर्तमान किर्गिझस्तानाचा बह्वंशी भूभाग रशियास तोडून देण्यात आला. किर्गिझिया या तत्कालीन रशियन नावाने ओळखला जाणारा हा भूभाग रशियन साम्राज्यात इ.स. १८७६ साली अधिकृतरित्या सामील करण्यात आला. पुढे झारशाही उलथून सोव्हिएत राजवट आल्यावर सोव्हिएत रशियाचे कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त या नावाने या भूभागास ओब्लास्ताचा दर्जा मिळाला. दशकभराने ५ डिसेंबर, इ.स. १९३६ रोजी किर्गिझ सोव्हिएत समाजवादी गणराज्य या रूपाने यास प्रजासत्ताकाचा दर्जा मिळाला.

इ.स. १९९०-९१ दरम्यान किर्गिझ सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकात किर्गिझस्तान लोकशाहीवादी चळवळ जोर धरू लागली. इ.स. १९९१ साली मार्च ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींची परिणती म्हणजे ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी किर्गिझस्तानाचे प्रजासत्ताक सोव्हिएत संघातून फुटून स्वतंत्र झाले.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: