थ्यॅन षान (लेखनभेदः तियान शान, थ्यॅन शान; चिनी: 天山; फीनयीन: Tiān Shān ; मंगोलियन Тэнгэр уул; उय्गुर: تەڭرى تاغ ; अर्थ: दिव्य पर्वतरांगा) ही मध्य आशियातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. ७,४३९ मी. उंचीवरील चंगीश चोकुसू हे थ्यॅन षानमधील सर्वात उंच शिखर आहे.

थ्यॅन षान पर्वतरांगेमधील ७,०१० मी उंचीचे खान टेंगरी हे शिखर

थ्यॅन षान पर्वतरांग कझाकस्तान, किर्गिझस्तानचीनच्या शिंच्यांग ह्या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर पसरली आहे. हिच्या आग्नेयेस ताक्लामकान वाळवंट पसरले असून ही दक्षिणेस पामीर पर्वतरांगेस जोडली गेली आहे. तसेच हिचा एक भाग शिंच्यांग व पाकिस्तानच्या उत्तर भागातून हिंदुकुश पर्वतरांग पर्वतरांगेशी जोडला गेला आहे.

चित्रदालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • "थ्यॅन षान पर्वतरांगेविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)