कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ

(कतार फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

कतार फुटबॉल संघ (फिफा संकेत: QAT) हा पश्चिम आशियामधील कतार देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कतार सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०९ व्या स्थानावर आहे. कतारने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही परंतु २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेचा यजमान घोषित झाल्यामुळे ह्या स्पर्धेत कतारला आपोआप पात्रता मिळेल. कतार आजवर ९ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

कतारचा ध्वज

आशिया चषकांमधील प्रदर्शन

संपादन
वर्ष स्थान
  1956 सहभाग नाही
  1960
  1964
  1968
  1972
  1976 पात्रता नाही
  1980 साखळी फेरी
  1984
  1988
  1992
  1996 पात्रता नाही
  2000 उपांत्यपूर्व फेरी
  2004 साखळी फेरी
     2007
  2011 उपांत्यपूर्व फेरी
  2015 साखळी फेरी

बाह्य दुवे

संपादन