१९६० ए.एफ.सी. आशिया चषक

१९६० ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दुसरी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या सोल शहरात १४ ते २३ ऑक्टोबर इ.स. १९६० दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ चार देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. गतविजेत्या दक्षिण कोरियाने ही स्पर्धा पुन्हा जिंकली.

१९६० ए.एफ.सी. आशिया चषक
AFC Asian Cup Korea 1960
1960년 AFC 아시안컵 대한민국
स्पर्धा माहिती
यजमान देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
तारखा १४ ऑक्टोबर२३ ऑक्टोबर
संघ संख्या
स्थळ १ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (२ वेळा)
उपविजेता इस्रायलचा ध्वज इस्रायल
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल १९ (३.१७ प्रति सामना)