इस्रायल राष्ट्रीय फुटबॉल संघ

(इस्रायल फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्रायल फुटबॉल संघ (हिब्रू: נבחרת ישראל בכדורגל; फिफा संकेत: ISR) हा पश्चिम आशियामधील इस्रायल देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला इस्रायल सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४५व्या स्थानावर आहे. आजवर इस्रायल १९७० ह्या एकमेव फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो एकाही युएफा युरोसाठी पात्र ठरलेला नाही.

१९५४ ते १९७४ दरम्यान इस्रायल आशियामधील ए.एफ.सी.चा सदस्य होता. त्याने १९६४ सालची ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धा आजोजीत केली होती व जिंकली होती. सतत चालू असलेल्या अरब–इस्रायल संघर्षामुळे अनेक आशियामधील मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत खेळण्यास नकार दिला. अखेर १९७४ साली इस्रायलची ए.एफ.सी.मधून हकालपट्टी करण्यात आली.

१९९४ साली इस्रायलला युएफाचे सदस्यत्व देण्यात आले.

बाह्य दुवे

संपादन