इ.स. १९९४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ. स. १९९४ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९१ - १९९२ - १९९३ - १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १७ - नॉर्थरिज, कॅलिफोर्नियात ६.९ मापनाचा भूकंप.
- जानेवारी ३० - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रॅंडमास्टर झाला.
- फेब्रुवारी ८ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यू झीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
- मार्च ६ - मोल्डोव्हाच्या जनतेने निवडणुकीत रोमेनियात शामिल होण्यास नकार दिला.
- एप्रिल १२ - युझनेटवर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.
- एप्रिल २६ - चायना एरलाइन्सचे एरबस ए-३०० जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
- एप्रिल २७ - दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
- मे ५ - सिंगापुरमध्ये दोन मोटारींवर रंग फेकल्याबद्दल मायकेल पी. फे या अमेरिकन नागरिकास छडीने मारण्याची शिक्षा.
- मे ९ - नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै ७ - एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
- जुलै १७ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
- जुलै १८ - बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
- जुलै २५ - इस्रायेल व जॉर्डनमधले इ.स. १९४८ पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
- सप्टेंबर ९ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले.
जन्म
संपादन- जून १६ - आर्या आंबेकर, गायिका.
- नोव्हेंबर ४ - हश्मातुल्लाह शहिदी, अफगाणी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- जानेवारी ३ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार साहित्यिक.
- फेब्रुवारी ८ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार.
- मे १ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
- मे १५ - पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.
- मे १६ - माधव मनोहर, लेखक; समीक्षक.
- मे १९ - जॅकिलिन केनेडी-ओनासिस, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी.
- जून ३० - बाळ कोल्हटकर, मराठी नाटककार, कवी.
- जुलै ३० - शंकर पाटील, मराठी लेखक.
- सप्टेंबर १६ - जयवंत दळवी, मराठी लेखक.
- सप्टेंबर १८ - व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.