गोपाळ देऊसकर
गोपाळ देऊसकर हे मराठी चित्रकार होते. १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९३६, १९३८ साली लंडनमधील चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे मांडण्यात आली होती. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. त्यांच्या चित्रकौशल्यामुळे बॉंबे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तिचित्रे अतिशय प्रसिद्ध आहेत. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.[१]
गोपाळ देऊसकर | |
पूर्ण नाव | गोपाळ दामोदर देऊसकर |
जन्म | सप्टेंबर ११, १९११ अहमदनगर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | फेब्रुवारी ८, १९९४ पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट |
शैली | वास्तववादी चित्रशैली |
वडील | दामोदर |
पत्नी | कमलिनी(प्रथम),जुईली(द्वितीय), माधवी(तृतीय) |
अपत्ये | सूदन |
जन्म व बालपण
संपादनदेऊसकर कुटुंब हे मूळचे देवास,मध्यप्रदेश येथील होते, पण नंतर अहमदनगर येथे स्थायिक झाले.तीन पिढ्यांपासून देऊसकर यांच्या घरात कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते.मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते. हैदराबाद येथील सालारजंग वस्तू संग्रहालयाच्या उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.म्युझियमचे ते पहिले क्युरेटर होते.
गोपाळ हे दोन वर्षाचे असताना आलेल्या फ्लूच्या साथीत आई आणि वडील यांचा मृत्यू झाला. ते आणि त्यांची मोठी बहिण शांता हिचा १९२१ पर्यंत नातेवाइकांनी सांभाळ केला.नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देउसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले. १९२७ साली त्यांनी मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला.सुरुवातीस ते खेतवाडी येथे ललितकलादर्श या नाटकमंडळीच्या बिऱ्हाडात राहिले.[१]
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ यावर जा a b बहुळकर, सुहास (२०१५). चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस. पुणे: राजहंस प्रकाशन. pp. १७, २०. ISBN 978-81-7434-850-0.