सप्टेंबर ७
दिनांक
(७ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५० वा किंवा लीप वर्षात २५१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- ११९१ - तिसरी क्रुसेड - इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२१ - ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९२९ - फिनलंडमध्ये जहाज बुडून १३६ मृत्युमुखी.
- १९४० - दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मनीची पूर्व आघाडीवरून पीछेहाट सुरू झाली.
- १९४३ - ह्युस्टनमध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले.
- १९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.
- १९७९ - क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
- १९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
- १९९९ - अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.
एकविसावे शतक
संपादन- २००४ - हरिकेन आयव्हन हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ ग्रेनडावर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.
- २००५ - इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
जन्म
संपादन- १५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
- १८३६ - हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८५७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७१ - जॉर्ज हर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९४ - व्हिक रिचर्डसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९११ - टोडोर झिव्कोव्ह, बल्गेरियाचा हुकुमशहा.
- १९१२ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
- १९१४ - नॉर्मन मिचेल-इनेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३० - बोद्वॉँ पहिला, बेल्जियमचा राजा.
- १९३३ - इला भट्ट, असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या.
- १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार.
- १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - केव्हन करान, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - नुरुल आबेदिन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - स्टीव जेम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - फरवीझ महरूफ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३१२ - फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.
- १४९६ - फर्डिनांड दुसरा, नेपल्सचा राजा.
- १५५२ - गुरू अनंग देव, दुसरे शीख गुरू.
- १६३२ - सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.
- १७७७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.
- १८०९ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.
- १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
- १९९७ - मोबुटु सेसे सेको, झैरचा हुकुमशहा.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ५ - सप्टेंबर ६ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ९ - सप्टेंबर महिना