सप्टेंबर २८
दिनांक
(२८ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७० वा किंवा लीप वर्षात २७१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
इ.स.पू. पहिले शतकसंपादन करा
- ४८ - इजिप्तचा राजा टॉलेमीने पॉम्पेई द ग्रेटची इजिप्तमध्ये उतरल्यावर हत्या करवली.
अठरावे शतकसंपादन करा
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- १९२८ - युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा काढून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर जर्मनी व सोवियेत संघाने पोलंडचा आपसांत वाटणी करून घेतली.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सॉ काबीज केली.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने एस्टोनियातील क्लूगा कॉँसेन्ट्रेशन कॅम्पमधील कैद्यांची सुटका केली.
- १९५८ - फ्रांसने नवीन संविधान स्वीकारले. फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताकअस्तित्वात आले. गिनी या फ्रांसाधीन प्रदेशाने हे संविधान न स्वीकारता स्वतंत्र होण्याचे ठरवले.
- १९७१ - युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.
- १९९४ - एम.एस. एस्टोनिया ही फेरीबोट बाल्टिक समुद्रात बुडुन ८५२ व्यक्ती मृत्युमुखी पडले.
- १९९५ - कोमोरोस द्वीपांवर लश्करी उठाव.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००४ - कॅलिफोर्नियातील पार्कफील्ड शहराला रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का.
जन्मसंपादन करा
- ५५१ - कन्फ्यूशियस, चीनी तत्त्वज्ञानी.
- १८६७ - कीचिरो हिरानुमा, जपानी पंतप्रधान.
- १९०७ - भगतसिंग भारतीय क्रांतिकारक
- १९२५ - सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक.
- १९४६ - मजिद खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - शेख हसीना वाजेद, बांगलादेशची पंतप्रधान.
- १९६० - ऑगस्टिन लोगी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - इरफान भट्टी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - मीरा सोर्व्हिनो, अमेरिकन अभिनेत्री.
- १९७१ - मॅथ्यू इलियट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - कॅथ्रिन लेंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - कॉलिन स्टुअर्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - रणबीर कपूर, भारतीय अभिनेता
- १९८७ - हिलरी डफ, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यूसंपादन करा
- २३५ - पोप पॉँटियानस.
- ११०४ - पेद्रो पहिला, अरागॉनचा राजा.
- ११९७ - हेन्री सहावा, पवित्र रोमन सम्राट.
- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.
- १९७० - गमाल अब्दल नासर, इजिप्तचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९७८ - पोप जॉन पॉल पहिला.
- १९७९ - रोम्युलो बेटानकोर्ट, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८९ - फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९१ - माइल्स डेव्हिस, अमेरिकन जॅझ संगीतकार.
- २००० - पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- चेक राष्ट्र दिन - चेक प्रजासत्ताक.
- शिक्षक दिन - तैवान.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २६ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - सप्टेंबर महिना