सदस्य चर्चा:Koolkrazy/जुनी चर्चा १
सहकार्य हवे
संपादनप्रशांत, आपण इंग्रजी विकिपीडियावरही चांगले काम केले आहे.इंग्रजी विकिपीडियात काम करणार्या मराठी विकिपीडियन्स साठी मी इंग्रजी विकिपीडियावर एक Template:User interwiki infoboard mr असा साचा मेंटेन केला आहे पण त्याला सध्या अपडेट करण्यात मी एकटाच पडतो. अधून-मधून Template:User interwiki infoboard mr साचा अपडेट करण्यास वेळ देता आला तर पहावेत हि विनंती. Mahitgar १३:३७, १० जुलै २००९ (UTC)
- मराठी विकिपीडियावर येथे काही आकडेवारी दिली आहे की किती मोठ्या प्रमाणात आपले(मराठी) लोक इंग्रजी विकिपीडिया वर जातात संपादनेही करत असतात पण एकतर त्यांना मराठी विकिपीडियाच्या अस्तीत्वाचीच कल्पना बराच काळ नसते किंवा इंग्रजी विकिपीडियावर संपादने चालू असताना मराठी विकिपीडियावर काय चालू आहे हे माहीत नसते.इंग्रजी शाळेत शिकलेली बरेच मराठी लोक मराठी Fluent नसल्यामुळे मराठी विकिपीडियात लिहित नाहीत परंतु ते आपण पुरेशी माहिती पुरवल्यास इंग्रजी विकिपीडियातच मराठी विकिपीडियाला उपयोगी बरीच कामे करू शकतात.
मराठी विकिपीडियास वेगवेगळ्या गोष्टीत इंग्रजी विकिपीडियातून सहकार्य पोहोचवले जाऊ शकते . जसेकी इंग्रजी विकिपीडियातील Templates आणि मराठीतील साचे यांचे इंग्रजी विकिपीडियात interwiki links देणे सध्या खूप critically आवश्यक आहे. तसेच सध्या निवडलेले मासिक सदर कोणत आहे इत्यादी माहिती मराठी विकिपीडियावर न येता इंग्रजी विकिपीडियातील स्वत:च्या user talk pagesवरच माहिती मिळावी असा Template:User interwiki infoboard mr चा उद्देश्य आहे.
- en:Category:User mr मधील बर्याच जणांच्या चर्चा पानावर हे Template लावलेले आहे.(ज्या इंग्रजी विकिपीडियातील मराठी लोकांच्या चर्चा पानावर हे पान नाही असे आढळेल त्यांच्या चर्चा पानावर हा साचा लावणे)
- एक तर ते Template सध्या वाचणार्यास समजत नाही. तर ते दिसण्यास चांगले करून हवे आहे.
- {{Infobox Language/Indic}} हा साचा ऊजवीकडीळ कोपर्यात Float व्हायला हवा.
- |- | colspan="3" | हे तीथे नको आहे पण ते काढणे माझ्या Template बद्दलच्या सिमीत ज्ञानामुळे जमले नाही.
Mahitgar १०:३४, २६ ऑगस्ट २००९ (UTC)
Template:User interwiki infoboard mr
व्यावसायिक सुविधा
संपादनचौगावात पिण्याच्या पाण्याच्या बर्याच सार्वजनिक नळ आणि सार्वजनिक विहिर सुविधा आहेत.चौगावात पिण्याच्या पाण्याचे पाच विहिर, दोन हात पंप आणि दोन विद्यूत पंप असे स्रोत उपलब्ध आहेत.
विभागाचा मथळा आणि उतार्यातील मजकुर जुळत नाही .
धन्यवाद
- Mahitgar १२:४९, १० जुलै २००९ (UTC)
- हो, मला महित आहे. मी अजुन माहिती शोधतो आहे. मिळाल्यावार नक्की टाकीण. धन्यवाद. प्रशांत शिरसाठ १२:५८, १० जुलै २००९ (UTC)
- Thanks Prashant, लेख चांगला झाला आहे.
साक्षरता
संपादनचौगावचा सरासरी साक्षरता दर ७०%, जो राष्ट्रीय साक्षरता दर ५९.५% पेक्षा अधिक आहे. पुरुषसाक्षरता ४०% आहे आणि महिला साक्षरता ३०% आहे.
या आकडेवारीत काहीतरी गोची आहे Mahitgar १२:५४, १० जुलै २००९ (UTC)
- मी ही माहिती panchayat.gov.in वरुन काढली. तेथे हेच लिहिले आहे. धन्यवाद. प्रशांत शिरसाठ १३:००, १० जुलै २००९ (UTC)
डॅनियेल जेकब रॅडक्लिफ
संपादननमस्कार,
तुम्ही डॅनियेल जेकब रॅडक्लिफ पानावर पानकाढा संदेश टाकलेला पाहिला तसेच डॅनियल जेकब रॅडक्लिफ या पानावर काम केलेलेह पाहिले, परंतु नंतर तुम्ही डॅनियल जेकब रॅडक्लिफ पानावरही पानकाढा संदेश घातलात. दोहोंपैकी कोणता तरी एक लेख ठेवावा व दुसरा पुनर्निर्देशित करावा. सध्या डॅनियेल जेकब रॅडक्लिफ हा लेख पुनर्स्थापित केलेला आहे. सहसा Danielचा उच्चार डॅनियेल असा होतो पण जर या व्यक्तीचे नाव डॅनियल असे उच्चारित असेल तर डॅनियल जेकब रॅडक्लिफ लेख ठेवून डॅनियेल जेकब रॅडक्लिफ तिकडे पुनर्निर्देशित करावा.
अभय नातू १३:१२, १३ ऑगस्ट २००९ (UTC)
- पण सगळीकडे पात्राचे "पहिले नाव आडनाव" या format मध्ये लेख आहेत. म्हणुन मी डॅनियल जेकब रॅडक्लिफ पानावर पानकाढा संदेश टाकला.
- मराठी विकिपीडियावरील सर्वसाधारण संकेत असा आहे की लेख पूर्ण नावाचा असावा व इतर नावांचे पुनर्निर्देशन तेथे असावे. अर्थात, हा संकेत नेहमी पाळलाच जातो असे नाही. जेव्हा दोन वेगवेगळ्या व्यक्तींची नावे व आडनावे एकच असतात तेव्हा हा नियमवजा संकेत अत्युपयुक्त ठरतो. जर नाव निःसंदिग्ध असेल तर प्रथम नाव आडनाव असा लेख ठेवण्यासही हरकत नाही. अशा वेळी प्रथम नाव मधले नाव आडनाव येथून पुनर्निर्देशन द्यावे.
- तरी डॅनियेल जेकब रॅडक्लिफ किंवा डॅनियेल रॅडक्लिफ दोन्ही शीर्षके उपयुक्तच आहेत. मला वाटते डॅनियेल जेकब रॅडक्लिफ लेख ठेवून डॅनियेल रॅडक्लिफ कडून पुनर्निर्देशन द्यावे.
- आता शेवटी डॅनियल रॅडक्लिफ हा लेख ठेवला आहे. आणि Danielचे उच्चार डॅनियल असे आहे. डॅनियल असा उच्चार मी बर्याच वेळा TVवर ऐकला आहे
- यात मला वाटते उच्चारणपद्धतीमुळे (accent) गोंधळ होत असावा. इंग्लिश accent, अमेरिकन accent व युरोपीय accent मध्ये एकच नाव वेगवेगळ्या प्रकारे उच्चारले जाते. उच्चाराचा जर एखादा संदर्भ मिळाला तर तो उद्धृत करावा म्हणजे नंतर वाचणार्या लेखकांचा गोंधळ होणार नाही.
- अभय नातू १६:२१, १४ ऑगस्ट २००९ (UTC)
साचा दुरूस्ती करून हवी
संपादनसाचा:प्रकल्पलेख चर्चापान साचा आराखडा प्रमाणे {{Substविप्रवने लेखचर्चा पान तात्पूरता साचा}} बनवण्याचा प्रयत्न तसेच
- en:Template:WikiProject Plants प्रमाणे साचा:विकिपीडिया वनस्पती प्रकल्प प्रकल्पात अंतर्भूत करावयाच्या लेखांच्या चर्चा पानावर वापरला जातो एकाच वेळी बरीच वर्गीकरणे करतो त्यामुळे भाषांतरास उपयूक्त वाटतो इंग्रजी विकिपिडियावरील एका लेख चर्चा पानाचे उदाहरणen:Talk:Alchorneopsis floribunda
माझे हे प्रयत्न माझ्या प्रगतसाचे ज्ञानातील मर्यादांमुळे कुठे तरी फसत आहे त्यात दुरूस्ती साठी तातडीचे सहाय्य हवे आहे.
माहीतगार ११:५८, २० ऑगस्ट २००९ (UTC)
विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनविकिपीडिया:भाषांतर प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनकाही नवे साचे
संपादन- विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/साचे येथे काही नवे साचे बनवून यादी केली आहे, कदाचित उपयोगी पडल्यास पहावे तसेच त्यांच्या द्वारे होणारे वर्गीकरण लेखात दिसत आहे पण वर्ग पानावर लेखाचे नाव दिसत नाही अशी समस्या काही साचांच्या बाबत बाकी आहे.
माहीतगार १३:०१, ९ सप्टेंबर २००९ (UTC)
धन्यवाद कसचे?
संपादनएकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ । मला जे बर्यापैकी जमते ते मी करतो. कधी मलापण मदत लागेल.ती तुम्ही करालच अशी अपेक्षा.आपले 'गुळपीठ' कायम ठेवा.कधी माझा गुळ तुमचे पीठ तर कधी तुमचा गुळ माझे पीठ. आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
V.narsikar ०५:४७, १० सप्टेंबर २००९ (UTC)
मुद्रण शुद्धी
संपादन- स्ट्रॅटेजी प्रस्ताव सहप्रकल्पास २१ सप्टे.च्या आधी १, २, ३, ४ येथे मराठी मुद्रण शुद्धी' (Proofreading) प्राधान्याने 'करून हवे . आहे यात आपले सहाय्य मिळाल्यास आभारी राहीन
माहीतगार १३:५४, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
शब्दोच्चारण
संपादननमस्कार,
- Remember = रिमेम्बर
- Rise = राइझ
- Revulsion = रिव्हल्झन
- Concerning Flight = कन्सर्निंग फ्लाइट
- Hunters = हंटर्स
- Unforgettable = अनफरगेटेबल
- Scientific Method = सायंटिफिक मेथड
असेच काम चालू ठेवा व मदत लागल्यास कळवा.
अभय नातू १५:१३, २३ सप्टेंबर २००९ (UTC)
तिठा, संगम
संपादनसंगम = merge तिठा = junction
सहसा दोन गतिमान fluid (प्रवाहीच असे नव्हे) entities (मराठी शब्द?) एकमेकांत मिसळून पुढे वाहतात तेथे दोन्हींचा संगम झाला असे म्हणतात. जेव्हा दोन स्थिर वस्तू (रस्ते, भिंती, सीमा) एकमेकांस मिळतात आणि पैकी एक तेथे थांबते त्यास तिठा म्हणतात.
भारतातील महामार्गांच्या यादीत सहसा तिठा शब्द बरोबर आहे. जेथे दोन रस्ते एकमेकांस मिळून पुढील रस्त्यास दोन्ही नावे (किंवा क्रमांक) दिला असेल तर त्यास संगम म्हणावे.
अभय नातू १५:३३, २३ सप्टेंबर २००९ (UTC)
राष्ट्रीय महामार्ग १ ए, बी, इ.
संपादननमस्कार,
मला वाटते महामार्गांच्या उपमार्गांना १ ए, १ बी.. ऐवजी १ अ, १ ब... अशी नावे द्यावी. तुमचे काय मत आहे?
अभय नातू १४:३०, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
रस्ते आणि महामार्ग मंत्रालय
संपादनGovernment Of India, Ministry of Road Transport & Highways = रस्ते आणि महामार्ग मंत्रालय (भारत) बरोबर वाटते. इतर नावांपासून पुनर्निर्देशने करावी.
अभय नातू १५:३४, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
भुपृष्ठ वाहतुक मंत्रालय?
संपादनhttp://en.wikipedia.org/wiki/Ministry_of_Surface_Transport_(India) कृपया हे बघा.
अल्पमती १५:४३, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
- Generally, the term Surface Transport encompasses transport on land and sea (over-water). Not sure if Ministry of Surface Transport oversees all that or just roads. The English wikipedia article does not cite a URL for the ministry. Perhaps they have a (hindi) name that we can use.
- अभय नातू १६:४४, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
- ह्या वेबसाईट वर हिन्दी मध्ये सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय असे लिहिले आहे. तूम्हाला काय वाटते? मला राष्ट्रीय महामार्ग १ ए ह्या पानावर बाह्यदुव्यांच्या संदर्भात लिहायचे आहे. सध्या मी भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ असे लिहिले आहे.
- --प्रशांत शिरसाठ ०५:१७, ३० सप्टेंबर २००९ (UTC)
The Rosetta Barnstar
संपादनमराठी विकिपीडिया ज्ञानकोशात अनुवाद/भाषांतरणे करून वैशिष्ट्यपूर्ण भर घातल्या बद्दल मी हे रोसेट्टा निशाण आपल्याला बहाल करत आहे. | ||
message Mahitgar ०८:४२, ३० सप्टेंबर २००९ (UTC) |
speed limit
संपादनबापरे ! 'महामार्ग' झाला म्हणुन काय एव्हढी speed ? तुम्ही तर पूर्ण भारताचेच दर्शन घडविले आज. 'अलीकडील बदल' या पानावर फक्त तुमचेच लेख व नाव आहे आज. Keep it up dear ! मनापासुन अभिनंदन. विकिपीडियावर तुमच्यासाठी एक नवा बार्नस्टार तयार करावा लागणार. Record break किंवा असाच काहीतरी.
V.narsikar
जिंदगीकी राहपर, आपके कभी न थिरके कदम । मंझिल ओर बढे चलो,सब साथ है हम ॥
V.narsikar
No speed limit!!
संपादनवा! काय झपाटा!!
अहो नरसीकर, यांना गतिमर्यादा ही संकल्पनाच माहिती नाही बहुतेक :-)
Keep it up. As alwasy, let us know if you need help.
अभय नातू १६:५२, ३० सप्टेंबर २००९ (UTC)
अभिनंदन
संपादन माझ्याकडून आपल्यासाठी ही छोटी भेट. आशा करतो की पार्टीला सगळ्यांना बोलवाल! Gypsypkd १०:३८, १ ऑक्टोबर २००९ (UTC)
पुन्हा एकदा अभिनंदन, आज मराठी विकिने २५००० चा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे, हा विशेष लेख तुम्ही संपादन केलेला आहे. KEEP IT UP. Gypsypkd ०९:५८, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
खरोखरीच मनःपुर्वक अभिनंदन ! आपल्या प्रत्येक कामात असेच उत्तरोत्तर यश मिळो व सर्व प्रांतात आपण सदैव अग्रेसरच रहा. चांगली बातमी दिल्याबद्दल धन्यवाद.
V.narsikar
- मराठी विकिपीडियास हे यश गाठण्याच्या टप्प्या तुम्ही जे महत्वपूर्ण योगदान केलेत त्याबद्दल तुमचे मनःपुर्वक अभिनंदन ! आपण फायरफॉक्स वापरता असे आपल्या सदस्यपानावरून आढळले.विकएडीट 1.4.0 हे ऍडऑन प्लगैन वापरून पहावा, खूप वेळ वाचेल Mahitgar १०:२३, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
प्रशांत,
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन या लेखाला विशेष लेखाचा दर्जा दिलेला आहे. यात माहिती भरुन तो लेख मोठा करता आला तर चांगलेच.
अभय नातू १५:३२, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
हो/नाही साचे
संपादनसाच्यात बदल करता येईल पण न करताही तुम्हाला इच्छित परिणाम मिळवता येतात. मी लेखात योग्य तो बदल केला आहे.
अभय नातू १६:३२, ८ ऑक्टोबर २००९ (UTC)
संस्था
संपादनसंस्था हे शुद्धलेखन बरोबर आहे.
अभय नातू १५:११, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)
हार्दिक शुभेच्छा
संपादनआपल्या लेखांमुळे, ३०,००० च्या ट्प्प्याकडे द्रुतगतीने वाटचाल होत आहे. हार्दिक शुभेच्छा. वि. नरसीकर (चर्चा) १०:४२, २० जानेवारी २०१० (UTC)
प्रताधिकार?
संपादनतुम्ही नुकत्याच चढवलेल्या हॅरी पॉटरविषयक १० संचिका प्रताधिकारमुक्त (कॉपीराइट-फ्री) नसाव्यात असे दिसते. पुस्तकांची मुखपृष्ठे/ मजकूर इत्यादी गोष्टी कायम प्रताधिकारित असतात. मूळ प्रताधिकार-मालकांकडून लेखी/ईमेलावर परवानगी न मिळवता अश्या संचिका विकिपीडियावर शक्यतो चढवू नयेत.
प्रताधिकार सूचना आणि विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे यात सहभागी होण्याचे निमंत्रण
संपादन
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२७, २० जानेवारी २०१० (UTC)
साचा:माहितीचौकट चित्रपट
संपादनप्रशांत,
साचा:माहितीचौकट चित्रपट पानाचे सुरक्षाकवच सैल केले आहे. योग्य ते बदल करावे.
अभय नातू २२:००, २० जानेवारी २०१० (UTC)
Hi
संपादनSorry for my mistake, I don't understand your language, so i can't read what you said, while monitoring recent changes of small wiki's i made the mistake reverting you (thought it was an IP blanking the page), sorry again, I will be more carefull the next time. --Egmontaz १३:५३, २१ जानेवारी २०१० (UTC)
You almost blanked the page (I suppose you made it a redirect) and I made the mistake and thought it was a total blanking (aka vandalism) so I reverted, but then I realized that you was the original editor and it was probably a redirect, so I reverted my reversion. I hope this was not a lot of trouble for you. :) And I said before, I will be more careful in the future. --Egmontaz १४:०१, २१ जानेवारी २०१० (UTC)
शब्दोच्चारण
संपादनप्रशांत,
सुधारित उच्चार खाली दिले आहेत.
- नाईट = Night - नाइट
- ड्रोन = Drone
- एक्सट्रिम रिस्क = Extreme Risk - एक्स्ट्रीम रिस्क (किंवा एक्स्ट्रीम र्हिस्क)
- ईन द फ्लेश = In the Flesh - इन द फ्लेश
- वन्स अपॉन अ टाईम = Once Upon a Time - वन्स अपॉन अ टाइम
- टाईमलेस = Timeless - टाइमलेस
- ईनफायनाईट रिग्रेस = Infinite Regress - इनफायनाइट रिग्रेस
- नथिंग य्हुमन = Nothing Human - नथिंग ह्युमन
- थर्टी डेज = Thirty Days - थर्टी डेझ
- काऊंटरपॉईंट = Counterpoint - काउंटरपॉइंट
- लेटेंट ईमेज = Latent Image - लेटंट इमेज
- ब्राईड ऑफ चॅकोटीका = Bride of Chaotica! - ब्राइड ऑफ केओटिका
- ग्रॅव्हिटी = Gravity
- ब्लिस = Bliss
- डार्क फ्रंटियर = Dark Frontier
- द डीसिज = The Disease - द डिसीझ
- कोर्सः ऑब्लिव्हीयन = Course: Oblivion - कोर्स ऑब्लिव्हियन
- द फाईट = The Fight - द फाइट
- थिंक टँक = Think Tank
- जगरनॉट = Juggernaut
- समवान टु वॉच ओव्हर मी = Someone to Watch Over Me - समवन टु वॉच ओव्हर मी
- रीलेटिव्हीटी = Relativity - रिलेटिव्हिटी
- वॉरहेड = Warhead
- ईक्विनॉक्स = Equinox - इक्विनॉक्स
- सर्व्हायव्हल इंस्टिंक्ट = Survival Instinct (किंवा इन्स्टिंक्ट
- बार्ज ऑफ द डेड = Barge of the Dead
- टींकर, टेनर, डॉक्टर, स्पाय = Tinker, Tenor, Doctor, Spy - टिंकर, डॉक्टर, स्पाय
- ऍलीस = Alice - ऍलिस (किंवा अॅलिस)
- रीडल्स = Riddles - रिडल्स
- ड्रॅगॉन्स तीथ = Dragon's Teeth - ड्रॅगन्स टीथ
- वन स्मॉल स्टेप = One Small Step
- द व्हॉयेजर कंस्पिरसी = The Voyager Conspiracy - द व्हॉयेजर कॉन्स्पिरसी
- पाथफाइंडर = Pathfinder
- फेयर हेवन = Fair Haven
- ब्लिंक ऑफ ऍन आय = Blink of an Eye
- व्हरट्युसो = Virtuoso - व्हर्च्युओसो
- मेमोरीयल = Memorial - मेमोरियल
- सूनकातसी = Tsunkatse - त्सुंकात्से (किंवा सुंकात्से)
- कलेक्टिव्ह = Collective
- स्पिरीट फोक = Spirit Folk - स्पिरिट फोक
- ऍशेस टु ऍशेस = Ashes to Ashes
- चाईल्डस प्ले = Child's Play - चाइल्ड्स प्ले
- गुड शेपर्ड = Good Shepherd - गुड शेफर्ड
- लिव्ह फास्ट ऍंड प्रॉस्पर = Live Fast and Prosper - लिव फास्ट अँड प्रॉस्पर
- म्युस = Muse - म्यूझ
- फ्युरी = Fury
- लाईफ लाईन = Life Line - लाइफ लाइन
- द हाँटिंग ऑफ डेक ट्वेलव्ह = The Haunting of Deck Twelve - द हाँटिंग ऑफ डेक ट्वेल्व
- युनीमेट्रिक्स झिरो = Unimatrix Zero - युनिमॅट्रिक्स झिरो
मदतीसाठी खूप खुप आभारी व तसदी बद्दल क्षमस्व.
काहीच तसदी नाही.
अभय नातू १७:३५, २५ जानेवारी २०१० (UTC)
डेल्टा/आल्फा
संपादनप्रशांत,
चुकले काहीच नाही!! कोणी वाचक डेल्टा क्वाड्रंट नावाने शोध घेणे शक्य असल्यामुळे मी ते पान डेल्टा क्वाड्रन्टकडे पुनर्निर्देशित केले इतकेच. आता डेल्टा क्वाड्रंट आणि डेल्टा क्वाड्रन्ट दोन्ही नावाने तोच लेख उपलब्ध आहे. तेच बिटा/बीटा क्वाड्रन्ट बद्दल.
अभय नातू ०६:३३, २६ जानेवारी २०१० (UTC)
सुधारणा
संपादननमस्कार प्रशांत! संदेश वाचला; धन्यावादांबद्दल धन्यवाद :) चुका सुधारायला आपण सर्वजणच काम करत आहोत (आणि करत राहू).. आपलं कामच आहे ते. तुमच्या उत्साही सहभागामुळे नवीन लेखांची भर पडत आहे, याबद्दल आनंद वाटतो.
बाकी, साचा:माहितीचौकट स्टार ट्रेक कथानकातील प्रजाती साच्यात 'मुळग्रह' हा पॅरामीटर लिहायला चुकलाय. शुद्धलेखनानुसार तो 'मूळ ग्रह' असा लिहायला हवा. जमल्यास, वेळेनुसार ही सुधारणा राबवावी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:००, २७ जानेवारी २०१० (UTC)
- सहसा अमराठी शब्दांचे अगदी बिनचूक नसलेले अन्य लेखनभेदही मराठी विकिपीडियावर पुनर्निर्देशित पाने म्हणून ठेवले जातात; कारण तश्या पद्धतीने काही लेखक मराठी विकिपीडियावर लिहीत असतील, तर त्यांना कायम लाल दुवा दिसून पुन्हा तसेच चुकीच्या लेखनाची पाने बनवण्याचे प्रकार टळतात. उदा.: कारडॅसियन या शब्दाऐवजी कोणी कारडॅसीयन असा दुवा नोंदवला, तर तो निळा दिसेल आणि मूळ शीर्षक वाचून बिनचूक लेखन/शुद्धलेखन काय, तेही समजेल.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:१८, २७ जानेवारी २०१० (UTC)
शब्दोच्चार व लेखन
संपादननमस्कार! काही लेखनांमध्ये सुधारणा सुचवू इच्छितो :
- नथिंग ह्यूमन = Nothing Human
- युनिमॅट्रिक्स झीरो = Unimatrix Zero
लेखांमधल्या शुद्धलेखनाच्या चुका सुधारणे सोपे असते. मात्र साचे लिहिताना शुद्धलेखन तपासून मगच वापरत जावेत; कारण एकदा साचे वापरले गेले, की एखाद्या पॅरामीटरातील दुरुस्ती तो साचा वापरला गेलेल्या सर्व लेखांमध्ये जाऊन करावी लागते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:१७, २८ जानेवारी २०१० (UTC)
वरील संदेशात यादीतल्या सुधारणा सांगितल्या आहेत व साच्यांतील शुद्धलेखनाचा मुद्दा फक्त अधोरेखित केला आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३८, २८ जानेवारी २०१० (UTC)
मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख
संपादननमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:४०, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
अभिनंदन
संपादननमस्कार प्रशांत, विकिपीडियावर सहज फिरता फिरता आपल्या लेखांवर लक्ष गेले,आणि आपले अभिनंदन करावेसे वाटले,म्हणून हा पत्रव्यवहार. आपले विकिपीडियावरील योगदान अतिशय बहूमूल्य आहे,आणि आपला उत्साह अगदीच दांडगा दिसतोय,लिखाणाचा वेग,शैली खूपच कौतुकास्पद आहे,परंतु वाचतांना एक गोष्ट जराशी खटकली ती म्हणजे "शुद्धलेखन",ह्या बाबतीत आपले लेख कृपया त्या विभागातून तपासून घ्या म्हणजे लेखाचा दर्जा नक्कीच उंचावेल,इंग्रजीतील शब्दांची मराठी समरूपे तपासून योग्य पद्धतीने लिहिल्यास लेखक अधिक वाचनीय आणि सुंदर होईल ह्यात शंकाच नाही.बाकी काम अतिशय योग्य दिशेने आणि सातत्याने चालू आहे.उदा.म्हणून देतो, आपण "हर्मायोनी" असे लिहिले आहे ते "हर्मायनी" तर नाहीना?कारण "योनी" वगैरे असे देशी शब्द उगाचच ऐकतांना भासवतात व आपण सरसकट तेच असावे अशा आविर्भावात सहसा तसेच लिहितो ,आणि दुसरे असे जर आपण हिंदी भाषेतील शब्द जशेच्या तसे घेत असाल तर मात्र काळजीपूर्वक शब्द निवडा,कारण देवनागरी हिंदीत शब्द लिहिण्याचे नियम हे मराठी पेक्षा नक्कीच भिन्न आहेत.बाकी, ऑल इज वेल.कळावे,लोभ असावा.चे.प्रसन्नकुमार १२:४७, ४ जून २०१० (UTC)
नमस्कार
संपादनकाही विशेष नाही.फक्त नमस्कार! बर्याच दिवसांनी झळकलात म्हणुन.माझ्या शुभेच्छा सदैव आहेतच.
वि. नरसीकर (चर्चा) १३:५०, २४ ऑगस्ट २०१० (UTC)
साचा रंग
संपादननमस्कार,
खूप दिवसांनी तुम्हाला येथे पाहून आनंद झाला.
तुम्ही सुचवलेल्या साच्यात मी काही बदल करुन सदस्य:अभय नातू/धूळपाटी येथे घातला आहे. यात तुम्हाला वाटतील ते बदल करुन मूळ साचा बदलावा.
अभय नातू १५:२४, २४ ऑगस्ट २०१० (UTC)
विनंती
संपादननमस्कार ! बरेच दिवसांनी दिसलात.व्यस्त होतात वाटते.
विकिच्या पायंड्याप्रमाणे स्वागत साचा नविन सदस्याच्या चर्चापानावर लावावयाचा असतो हे अत्यंत नम्रपणे सुचवितो.यापुढे तो लावतांना ते लक्षात घ्यावे ही विनंती.चर्चा पानावर लावल्यावर त्या सदस्यास संदेश मिळतो.
वि. नरसीकर (चर्चा) १०:४२, २३ नोव्हेंबर २०१० (UTC)
नॅवबॉक्स साचा
संपादननमस्कार प्रशांत!
तुम्ही म्हणताय तो फरक मलाही आढळला होता.. तुम्ही निदर्शनास आणून दिल्यामुळे पुन्हा याकडे लक्ष देऊन आणखी विश्लेषण करतो आणि सर्व गोष्टी स्वच्छ जाणल्यावर बदल करतो.
बाकी, फारा दिवसांनी तुम्ही विकिपीडियावर परतल्याचे व पुन्हा सक्रिय झाल्याचे बघून आनंद वाटला. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:२१, २ डिसेंबर २०१० (UTC)
- जबरी! साच्यांच्या सीएसएस कोडात बदल करून मार्गक्रमण साचे नीट दिसताहेत. मी जेवढे अर्धवट धुंडाळले होते, त्यावरून मी भरकटत गेलो होतो आणि काहीतरी जावास्क्रिप्ट कोडाची गडबड असावी, असे समजत होतो (अर्थात मी चिकाटीने पुरेसे संशोधन केले नाही, हेही खरे.). तुम्ही नेटाने खटपटी करून मार्ग काढल्याचे दिसते... त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक कौतुक करतो. :)
- बर्याच मार्गक्रमण साच्यांमध्ये तुम्ही केलेल्या दुरुस्त्या टाकावयाच्या आहेत. मी रात्री यासाठी काम करून सुधारणा करेन.. किमान तेवढातरी माझ्यातर्फे खारीचा वाटा. :)
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:४९, २१ फेब्रुवारी २०११ (UTC)
विचीत्र समस्या!
संपादनतुमचा अभयच्या चर्चापानावरचा संदेश पाहिला. तुम्ही सध्या गुगल क्रोम बाउजर वापरता आहेत का ?
Maihudon १२:१३, १८ फेब्रुवारी २०११ (UTC)
- Since Day before yesterday I am also facing the same problem , I am accessing it by disabling Java from the browser. Problem needs to be addressed on priority is true माहितगार १४:५५, १८ फेब्रुवारी २०११ (UTC)
- प्रशांत,
- माहितगारांनी केलेल्या बदलानंतर तुमची समस्या हल झाली का? असली/नसली तरी कळवावे म्हणजे अजून काही उपाय करावे लागतात का हे ठरवता येईल.
- अभय नातू १७:३०, १८ फेब्रुवारी २०११ (UTC)
- Abhay, while I disabled Marathi Transliteration here I am also still facing the problem I am still accessing it by disabling Java Script from browser. माहितगार १९:२३, १८ फेब्रुवारी २०११ (UTC)
- प्रशांत, माहितगार,
- तुमच्या ब्राउझरची सय घालवून (cache), ब्राउझर बंद करुन पुन्हा एकदा सुरू करुन पहा.
- मला वाटते संकल्पने (फोनेटिक) मराठी टायपिंग पुन्हा सुरू केले आहे.
- अभय नातू ०४:४३, २१ फेब्रुवारी २०११ (UTC)
Subtype of a road
संपादनकोणत्या संदर्भात शब्द वापरणे अपेक्षित आहे? National Highway, State Highway, Other Highway -- असे का?
अभय नातू ०६:०७, २३ फेब्रुवारी २०११ (UTC)
Production team
संपादननमस्कार,
प्रॉडक्शन टीमसाठी अभिप्रेत अर्थानुसार अनेक शब्द योजता येतील.
- निर्माते, निर्मातागण - एक-दोन व्यक्तींनी सहनिर्माण केले असले तर.
- निर्माता संघ निर्माता चमू - यात एखादा व्यक्ती पुढारी असून त्याच्या हाताखाली काम करणारे अनेक निर्माते असू शकतात.
स्टार ट्रेक:व्हॉयेजर साठी मला वाटते निर्माते हा शब्द ठीक राहील.
अभय नातू १७:५७, २६ एप्रिल २०११ (UTC)
कोरे लेख ?!
संपादननमस्कार कूलक्रेझी !
आपण गेल्या दोनेक दिवसांत बरेच कोरे लेख बनवल्याचे दिसते. मराठी विकिपीडियावर आधीच वाचनीय आशयाच्या नावाने बोंब आहे, त्यात अश्या कोर्या लेखांची भर घालण्याचे प्रयोजन कळले नाही. नवे लेख बनवताना त्यात कृपया दोन-तीन वाचनीय, माहितीपूर्ण वाक्ये लिहावीत, अन्यथा मराठी विकिपीडिया 'फुसक्या लेखांचा ढिगारा' म्हणून कुख्यात होईल, यात शंका नाही. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०२, ३ मे २०११ (UTC)
प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा
संपादननमस्कार,
चावडी ध्येय आणि धोरणे वर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरु आहे. जेष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे भाषा निर्देश आपल्या लेख द्वारे सदर चावडीवर मांडले आहेत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चाविडी ध्येय आणि धोरणे वर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कमी अमुल्य योगदान करावे हि विनंती. राहुल देशमुख ०२:२९, १८ जुलै २०११ (UTC)
- आपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.
चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल
संपादननमस्कार, विकिपीडिया:कौल#चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल प्रस्ताव मांडला आहे त्यात आपले मत द्दावे. आपल्या अभिप्राय आणि समर्थनाचा प्रार्थी आहे. -रायबा
विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा
संपादनआपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते.
त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५९, ११ जून २०१२ (IST)
संचिका परवाने अद्ययावत करा
संपादननमस्कार Koolkrazy/जुनी चर्चा १,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Koolkrazy/जुनी चर्चा १,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.