आमदार

राज्य विधानसभेचा सदस्य
(विधान सभा सदस्य या पानावरून पुनर्निर्देशित)

आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे.हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.

आमदाराचा कालावधी

संपादन

विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.विधानसभेची मुदत संपल्याने आमदारकीचा कार्यकाल संपतो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते, परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते, परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढविता येत नाही.आमदार होण्यासाठी किमान वयोमर्यादा ही २५ वर्ष असणे आवश्यक असते.

आमदारांची आकडेवारी

संपादन

सध्या उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक ४०३ आमदार आहेत.तसेच सिक्कीम राज्यातील विधानसभेत सर्वात कमी ३२ आमदार आहेत.संपूर्ण भारत देशात सध्या ४१२३ आमदार आहेत.

भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आमदारांची संख्या

संपादन
राज्य विधानसभा आमदारांची संख्या विधानपरिषद आमदारांची संख्या
अंदमान आणि निकोबार लागू नाही लागू नाही
आंध्र प्रदेश १७५ ५८
अरुणाचल प्रदेश ६० लागू नाही
आसाम १२६ लागू नाही
छत्तीसगड ९० लागू नाही
बिहार २४३ ७५
चंदिगढ लागू नाही लागू नाही
दादरा आणि नगर-हवेली लागू नाही लागू नाही
दमण आणि दीव लागू नाही लागू नाही
गोवा ४० लागू नाही
गुजरात १८२ लागू नाही
हरियाणा ९० लागू नाही
हिमाचल प्रदेश ६८ लागू नाही
जम्मू काश्मीर ९० लागू नाही
झारखंड ८१ लागू नाही
कर्नाटक २२४ ७५
केरळ १४० लागू नाही
लक्षद्वीप लागू नाही
मध्यप्रदेश २३० लागू नाही
महाराष्ट्र २८८ ७८
मणिपूर ६० लागू नाही
मेघालय ६० लागू नाही
मिझोरम ४० लागू नाही
नागालॅंड ६० लागू नाही
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली ७० लागू नाही
ओरिसा १४७ लागू नाही
पुदुच्चेरी ३३ लागू नाही
पंजाब ११७ लागू नाही
राजस्थान २०० लागू नाही
सिक्कीम ३२ लागू नाही
तमिळनाडू २३४ लागू नाही
तेलंगणा ११९ ४०
त्रिपुरा ६० लागू नाही
उत्तरप्रदेश ४०३ १००
उत्तराखंड ७० लागू नाही
पश्चिम बंगाल २९४ लागू नाही


संदर्भयादी

संपादन

१.https://en.m.wikipedia.org/wiki/Uttar_Pradesh_Legislative_Assembly २.https://en.m.wikipedia.org/wiki/State_legislative_assemblies_of_India