राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित (रा.द्रु.रे.म.म ) भारतातील द्रुतगती रेल्वे मार्गांसाठी वित्तपुरवठा, बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापन या उद्देशाने विधिसंस्थापित करण्यात आले. राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादितची स्थापना रेल्वे मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. रेल्वे महामंडळ, भारत सरकार आणि दोन राज्य सरकार - गुजरात सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या समभागात भाग घेणाऱ्या संयुक्त क्षेत्रातील महामंडळ एक 'विशेष उद्देश वाहन' आहे.

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित
प्रकार सार्वजनिक क्षेत्र उपक्रम
उद्योग क्षेत्र द्रुतगती रेल्वे
स्थापना १२ फेब्रुवारी २०१६
मुख्यालय नवी दिल्ली, भारत
महसूली उत्पन्न ६८.२७ कोटी (US$१५.१६ दशलक्ष) (2019) []
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
६२.९५ कोटी (US$१३.९७ दशलक्ष) (2019)[]
निव्वळ उत्पन्न ४६.०९ कोटी (US$१०.२३ दशलक्ष) (2019)[]
एकूण मालमत्ता ३,२६०.०१ कोटी (US$७२३.७२ दशलक्ष) (2019)[]
एकूण इक्विटी ३,१२४.४७ कोटी (US$६९३.६३ दशलक्ष) (2019)[]
मालक भारत सरकार (५०%) ,
गुजरात सरकार (२५%)
महाराष्ट्र सरकार (२५%)
कर्मचारी २१२ (मार्च २०१९) []
पालक कंपनी भारतीय रेल्वे
संकेतस्थळ nhsrcl.in

प्रकल्प

संपादन

मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग

संपादन

हा भारतातील प्रथम द्रुतगती रेल्वेमार्ग आहे ज्याच्या अंमलबजावणी साठी जपान सरकार तांत्रिक आणि आर्थिक मदत करेल,आणि या मार्गावर एकूण बारा स्थानके महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये आणि दादरा आणि नगर हवेलीच्या केंद्रशासित प्रदेशात असतील. द्रुतगती रेल्वे मार्गाची लांबी ५०८.१७ किमी असेल, महाराष्ट्र राज्यात १५५.७६ किमी (मुंबई उपनगरात ७.०४ किमी, ठाणे जिल्ह्यात ३९.६६ किमी आणि पालघर जिल्ह्यात १०९.०६ किमी), दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशात ४.३ किमी आणि गुजरात राज्यात ३४८.०४ किमी.

मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर (महाराष्ट्रात), वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती (गुजरात मध्ये) अशी एकूण १२ स्थानके या द्रुतगती रेल्वेमार्गावर येणार आहेत. द्रुतगती रेल्वेमार्गाची मर्यादित थांबा (सूरत आणि वडोदरा येथे) सेवा १ तास आणि ५८ मिनिटांमध्ये मध्ये मार्ग व्यापेल. सर्वस्थानकांवर थांबणारी सेवा हा मार्ग व्यापण्यासाठी २ तास ५७ मि घेईल.

द्रुतगती रेल्वेमार्ग मुंबई मध्ये भूमिगत २६ कि.मी. सोडून उन्नत मार्गावर असलेल्या (जमिनीच्या वर १० ते १५ मीटर) रुळांवर ३२० किमी / तासाच्या वेगाने कार्यरत असेल. मुंबईचे भूमिगत वांद्रे कुर्ला संकुल स्थानक वगळता सर्व स्थानके उन्नत असतील.

हे बांधकाम एप्रिल २०२० मध्ये सुरू झाले असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावर जपान रेलवे शिन्कानसेन ई ५ मालिका इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट वापरण्यात येईल .

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन