यू.एस. ओपन
यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
यू.एस. ओपन | |
---|---|
सुरुवात | इ.स १८८१ |
स्थान |
न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क राज्य अमेरिका |
स्थळ | यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर |
कोर्ट पृष्ठभाग | हार्ड कोर्ट |
बक्षीस रक्कम | $ २,२०,६३,००० |
ड्रॉ | १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी |
सद्य विजेते |
ॲंडी मरे (एकेरी) बॉब ब्रायन/माइक ब्रायन (दुहेरी) |
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे | रिचर्ड सीयर्स (७) |
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे | रिचर्ड सीयर्स (६) |
ड्रॉ | १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी |
सद्य विजेत्या |
सेरेना विल्यम्स (एकेरी) सारा एरानी/रॉबेर्ता व्हिंची (दुहेरी) |
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे | ख्रिस एव्हर्ट (६) |
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे | मार्टिना नवरातिलोव्हा (९) |
ड्रॉ | ६४ |
सद्य विजेते | इकॅटेरिना माकारोव्हा/ब्रुनो सोआरेस |
२०१३ यू.एस. ओपन |
सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
विजेते
संपादनखुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रास व जिमी कॉनर्स ह्या टेनिसपटूंनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सहा वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. महिला दुहेरीमध्ये मार्टिना नवरातिलोव्हाने यू.एस. ओपनचा चषक ९ वेळा उचलला आहे.
स्पर्धा | विजेता | उप-विजेता | स्कोर |
---|---|---|---|
पुरुष एकेरी | नोव्हाक जोकोविच | रफायेल नदाल | 6–2, 6–4, 6–7(3–7), 6–1 |
महिला एकेरी | समांथा स्टोसर | सेरेना विल्यम्स | 6–2, 6–3 |
पुरुष दुहेरी | युर्गन मेल्त्सर / फिलिप पेट्झश्नर | मारियुझ फ्रायस्टेनबर्ग / मार्सिन मात्कोव्स्की | 6–2, 6–2 |
महिला दुहेरी | लीझेल ह्युबर / लिसा रेमंड | व्हानिया किंग / यारोस्लावा श्वेदोव्हा | 4–6, 7–6(7–5), 7–6(7–3) |
मिश्र दुहेरी | मेलनी ऊडिन / जॅक सॉक | जिसेला डुल्को / एदुरादो श्वांक | 7–6(7–4), 4–6, [10–8] |
बाह्य दुवे
संपादन40°44′59.26″N 73°50′45.91″W / 40.7497944°N 73.8460861°W
मागील विंबल्डन |
ग्रॅंड स्लॅम स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर |
पुढील ऑस्ट्रेलियन ओपन |