जॅक सॉक ( २४ सप्टेंबर १९९२, लिंकन, नेब्रास्का) हा एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. याने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत बेथनी मॅटेक-सॅंड्सबरोबर मिश्र दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक तर स्टीव जॉन्सन बरोबर पुरुष दुहेरी प्रकारातील कांस्यपदक मिळवले.

जॅक सॉक

याशिवाय सॉक २०१४ विंबल्डन स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा खेळाडू व्हासेक पॉप्सिपिल सह पुरुष दुहेरीमधील विजेता आणि २०११ यू.एस. ओपनमध्ये मेलनी ऊडिनसह मिश्र दुहेरी प्रकारातील विजेता होता.