भारत इतिहास संशोधक मंडळ

sanklpna

भारत इतिहास संशोधक मंडळ हे प्रामुख्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारे मंडळ आहे. या मंडळाची स्थापना ७ जुलै, इ.स. १९१० रोजी इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी पुणे येथे केली.

स्थापक विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.

इतिहास

संपादन

भारत इतिहास संशोधक मंडळाची विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात केली. पुढे ही संस्था पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाली. मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी ही भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. []

त्यानंतरही पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ इतिहास संशोधकांना मदत करण्यासाठी आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने पुढे चालूच राहिले. जनतेने मंडळाला दानादाखल पुस्तके आणि कागदपत्रे मिळवून देऊन खूप समर्थन दिले. राजवाडे यांचे शिष्य दत्तो वामन पोतदार, गणेश हरी खरे आणि वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी मंडळाच्या कामात स्वतःला झोकून देऊन मंडळाला समृद्ध करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

संसाधने

संपादन

भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये २०१९ साली १५ लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रे आणि मराठी (देवनागरी आणि मोडी), फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतली ३०,००० हस्तलिखिते आहेत. मंडळाच्या सुसज्ज संग्रहालयात चार हजाराहून अधिक जुनी नाणी एक हजार रंगीत चित्रे आणि काही शिल्पे व शिलालेख जतन करून ठेवली आहेत. मंडळाच्या ग्रंथालयातील २७,००० हून अधिक इंग्रजी-मराठी पुस्तके संशोधकांना तेथेच विनामूल्य वाचनासाठी किंवा घरी नेऊन वाचण्यासठी नाममात्र फीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ही संसाधने प्रामुख्याने मराठा साम्राज्य, मराठा संस्कृती आणि मराठी इतिहासावरची आहेत.भारतावरील मुगल आणि ब्रिटिश साम्राज्यावरील साहित्याचा मोठा संग्रहही त्यांत आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळाकडून एक त्रैमासिक नियतकालिकाही प्रकाशित केले जाते. या नियतकालिकात नवीन शोधांवरील निबंध आणि लेख सादर केले जातात. मंडळाने अनुभवी इतिहासकारांच्या वार्षिक परिषदांच्या आणि इतिहासकारांच्या अन्या बैठकीच्या अहवालांद्वारे लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. हे मंडळ वेळोवेळी तरुण संशोधकांसाढी आणि इतिहासकारांसाठी व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार आणि अभ्यासदौरा आयोजित करत असते.

मंडळाचे अध्यक्ष

संपादन

प्रकाशित ग्रंथ

संपादन
  • शिवचरित्र साहित्य, खंड १ ते १६
  • शिवाजी निबंधावली
  • शिवचरित्र निबंधावली
  • सम्पूर्ण भूषण - रामचंद्र गोविंद काटे, १९३०
  • दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने
  • पुणे नगर संशोधन वृत्त
  • शिवचरित्र वृत्त संग्रह, खंड १ ते ३
  • शिवभारत
  • शिवचरित्र प्रदीप
  • ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १ ते ६
  • ऐतिहासिक पोवाडे खंड १ व २
  • संभाजी कालीन पत्रसार संग्रह
  • मठगावचा शिलालेख
  • शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ ते ३
  • मूर्तीविज्ञान

मंडळाचे संशोधक

संपादन
  1. ^ https://marathi.abplive.com/news/maharashtra/india-first-film-released-first-cotton-mill-in-mumbai-birth-of-mahendra-singh-dhoni-today-in-history-1190414